मंगलवार, 6 फ़रवरी 2018

धनु कोष्ठक - 19



23.16

ह्याच्यानंतर ती “कपितोनव!” म्हणून नाही ओरडली, आणि ओरडतंच नाही.
आणि मग

23.28
ती म्हणते (कारण की कॉरीडोरमधे काही लोक हल्ला करतात आहेत:
“हे आपले लोक, बैन्क्वेटहून.”
आपले लोक, बैन्क्वेटहूनचालताना कोणच्यातरी मह्त्वपूर्ण विषयावर बोलंत आहेत – कोणाला निवडलंय आणि जेवणाबद्दल...
ती टैक्सी बोलावते.
“आर यू श्यूअर?”
“अगदी. मी रात्री घरींच झोपते.”
तेवढ्यांत

23.32

भिंतीच्या पलिकडचा शेजारी – तोपण बैन्क्वेटहून परतलांय.
“काळ-भक्षक, तो सारखा ओका-या काढंत असतो,” कपितोनव म्हणतो.
“माहितीये, माहितीये...अरे, माझे टाइट्स फाटले आहेत.”
कपितोनवनेपण कपडे घातले, कपितोनवला तिला सोडायला जायचंय.
“मला इथे कोणीतरी थर्मल्स विकलेत, बेलारशियन प्रॉडक्शन. ग्यारंटी देतात की चालतांना हे घर्षण कमी करतांत. मी तर तपासून नाही बघितलं.”
“आठवणीसाठी देशील?”
“ओके, गुड लक. चालतांना घर्षण कमी करतात – ही तर चांगली गोष्ट आहे.”
“पुरुषांचे. म्हणजे, आठवणीखातर...दे.”
23.56

जिना उतरताना ती त्याला म्हणते:

“तुला कधी असं नाही वाटंत का, की खरोखरंच त्याला कुणी खातंय, किंवा, माहीत नाही, पूर्ण खाऊन टाकेल कां?”
“तू काळाबद्दल म्हणते आहेस कां?”
“हो, वैयक्तिक काळाबद्दल, जो आपल्या सागळ्यांना दिलेला आहे. कोणी त्याचा सपूर्ण गर खातोय, रसाळ गर, आणि शिल्लक उरतो भुसा. फक्त भुसा, घटनांचा भुसा. आणि बस.”
“जर तू त्याच्याबद्दल बोलते आहेस, जो माझ्या भिंतीच्या पलिकडे आहे, तर मला वाटतं की त्याचं असं नाहीये. असं नाही वाटंत की तो चविष्ठ वस्तू खात असेल. तू तर ऐकलंस की तो कसा ओका-या काढतो...”
“नाहीं, मी सामान्यपणे बोलंत होते.”
“आणि माझ्यासाठी हे दोन दिवस अंतहीन होते. ते कदाचित अश्यासाठी, की, कदाचित, मी झोपंत नाही. किंवा, कुणास ठाऊक, कदाचित, हे त्याने माझ्या आतड्यांना इतकं पिळून टाकलं असावं...”
“माफ कर, कपितोनव, पण तुझ्या चेह-यावर फार थकवा दिसतोय.”
“दिवस संपता संपत नाहीये.”
“सगळं संपेल, घाबरू नको.”
आणि खरोखरंच हे त्यादिवसाचे शेवटचे शब्द होते.
आगमन झालं

सोमवारचं.

00.00

बर्फ पडूं लागला होता. टैक्सीवाला वाट बघतोय, इंजिन बंद न करतां, आणि विंडस्क्रीनवर वाइपर्स फिरतात आहे.
“तुझ्यासमोर कबूल करतेय, मी, कदाचित, तुझ्यांत अशी बुडाले नसते, जर तू हे नसतं केलं. फक्त मी तुला नीट बघूं शकले नाही. तसा, हा तुझा गेमनव्हता, पण त्याच्या नियमांवरपण तू मस्त खेळलास. तू तलावला अजूनही ओळखलं नाहीस? हे सगळं त्याचंच केलेलं होतं. तलावफक्त मिलनसार दिसण्याचा प्रयत्न करंत होता, खरं म्हणजे तो फार वाईट माणूस होता, एकदम पोकळ, दुष्ट, असहनीय. मला ही गोष्ट दुस-यांपेक्षां जास्त चांगली माहीत आहे. त्याने तुझापण उपयोग केला. तुझा पत्ता लावला, मॉस्कोहून इथे खेचून आणलं, त्या स्टोर-रूममधे ओढून घेऊन गेला. तुला काय खरंच काही कळंत नाहीये? ही आत्महत्या होती! तू, त्याच्यासाठी होता...एखाद्या सोन्याच्या पिस्तौल सारखा! तू स्वतःला बिल्कुल दोष नको देऊंस. तू कोणत्याही सोन्याच्या पिस्तौलपेक्षा जास्त चांगला आहेस! तू अतुलनीय होतास, फक्त अतुलनीय! मानवतेच्या दृष्टीने मला तलावबद्दल दुःख आहे, पण एका महिलेच्या दृष्टीने – बिल्कुल नाही. आपली काळजी घे, कपितोनव. नीनेलची आठवण ठेव. बाय, कॉम्रेड! मी कधीही मारेक-यासोबत झोपले नव्हते.”

कपितोनव नजरेने जाणा-या कारला बघंत राहिला. हॉटेलमधे परत जाण्याची इच्छा नाहीये. तो बेचैन आहे, जणु त्याने एखादा वजनदार स्क्रू गिळला असावा. तो लैम्पच्याखाली बेंचवर बसून राहिला असता, पण तो भुरभुरणा-या बर्फाने झाकला गेलाय.

त्याच्यावर नजर ठेवली जात आहे.      

तो झर्रकन् वळतो – हळू-हळू येत असलेल्या कारकडे: ही जुनी झिगूलीहोती, हेडलैम्प फुटला होता. त्याने तिला तेव्हांच बघितलं होतं, जेव्हां नीनेल जाताना तलावच्या नीचतेबद्दल आपलं स्वगत भाषण देत होती, - तेव्हां कार इथून अशीच हळू-हळू जात होती, जशी आता जाते आहे, पण विरुद्ध दिशेंत, आणि चौरस्त्यावर झिगूलीपरंत वळते.

कपितोनवच्या जवळ येऊन कार थांबते, आणि ड्राइवर वाकून कपितोनवसाठी दार उघडतो.
“मालक, चलायचं! कुठे?”      
हे आहे उदाहरण असंगठित कैब्सवर टैक्सी नावाच्या संस्थेच्या विजयाचं.

कपितोनवला फक्त बसायचं आहे.

दार पहिल्या प्रयत्नांत बंद नाही होत – आणखी जोराने बंद करावं लागतं.

पूर्वेकडील माणूस कपितोनवकडे बघून स्मित करतोय, वाट बघतोय.

“एक मिनिट,” कपितोनव म्हणतो. “विचार करून सांगतो,” काही विचार करतो, विचारतो:
“तुझं नाव काय आहे?”
“तुर्गून.”
“तुर्गून, तू काय ब-याच दिवसांपासून आहे पीटरमधे?”
“एक वर्ष आणि पाच महिने झालेंत.”
“कन्स्ट्रक्शन साइटवर काम करायचा कां?”
“नाही, भावाकडे.”
“पहाडांची आठवण येते कां?”
“कुटुम्बाची आठवण येते. बहिणींची. आमच्या तिकडे पहाड नाहीयेत.”
“तुला पीटरबुर्ग आवडतं कां?”
“चांगलं शहर आहे, मोट्ठं. खूप थण्डं. कुठे जायचंय?”
“कुठेच नाही,” कपितोनव दोन नोट काढतो. “तू मला बस, असंच घुमवून आण.”
“नाही, मी नाही! मी दारुड्यांना नाही!”
कपितोनव त्याच्या खिशांत नोट कोंबतो.
“तुर्गून, मी तुझ्याशी माणसासारखा वागतोय. तू माझी गोष्ट ऐकतोयंस कां? मला पीटरबुर्ग बघायचंय. ब-याच काळापासून मी इथे नाही आलो. आठवण यायची. तुला सेन्ट इसाकोव्स्की-कैथेड्रल माहीत आहे? एडमिरैल्टी – चिमुकल्या जहाजासकट? मला फक्त नेशील? नेवा, मोयका, ग्रिबोयेदोव-कनाल...जर तुझी एखादी आवडीची जागा असेल, तर तिथेपण घेऊन चल. जिथे वाटेल, तिथे घेऊन चल. माझी फ्लाइट उद्या आहे, माहीत नाही, पुन्हां केव्हां येणं होईल?”
“दूर जातांय कां? अमेरिकेला चालले आहांत?”
“कुठली अमेरिका?” कपितोनव पुटपुटतो, असा अनुभव करंत की त्याने तुर्गूनशी जागा बदलली आहे, आता प्रश्न तो विचारतोय. “जवळंच जायचंय. अमेरिकेलाच कशाला जायला पाहिजे?”
“काय सकाळ पर्यंत जात राहायचंय?”
“जो पर्यंत कंटाळा नाही येत.”

निघाले. तुर्गूनला अजूनपर्यंत आपल्या सफलतेचा विश्वास नव्हता झाला – तो पैसेंजरकडे बघतो: त्याचं मत बदललं तर, पैसे परंत मागू लागला तर...
इथे किंचित ऊब आहे. कपितोनव ओवरकोटाचे बटन काढतो आणि स्कार्फ काढतो. हिवाळ्याच्या बर्फाळ रात्री पीटरबुर्ग बघणं – कपितोनवची हीच सर्वांत मोठी इच्छा होती. कोणच्यातरी गोष्टीची आठवण येऊन, किंवा कशातरीबद्दल कल्पना करून, तो डोळे बंद करतो, आणि लगेच झोपून जातो.

0.41


“मालक, पोहोचलो.”
“आँ? काय?”
“इसाकोव्स्की-कैथेड्रल.”
“कुठे?”
“हे राहिलं. इसाकोव्स्की-कैथेड्रल.”
“तुर्गून, तू – तुर्गून?… तुर्गून, हे इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, हे ट्रिनिटी-कैथेड्रल आहे, ह्यालांच इज़माइलोव्स्की म्हणतात...आणि मी काय झोपलो होतो?”
“झोपले होते, आपण जात होतो तेव्हां.”
“तू मला कां उठवलंस?”
“इसाकोव्स्की-कैथेड्रल, स्वतःच तर सांगितलं होतं न, दाखवायला.”
“ट्रिनिटी, मी तुला समजावतो. हे पण मोठं आहे, पण इसाकोव्स्कीपेक्षां किंचित कमी. इसाकोव्स्कीच घुमंट सोन्याचं आहे. तू पण काय...जर मला इसाकोव्स्की दाखवायचं आहे, तर लेर्मोंतोव्स्कीवर वळून जा, आणि तिथे रीम्स्की-कोर्साकोववर, आणि मग ग्लिन्का स्ट्रीटवर बल्शाया-मोर्स्काया स्ट्रीटपर्यंत...काही असंच, किंवा इज़माइलोव्स्की वर, पण तिथे वज़्नेसेन्स्की प्रॉस्पेक्टवर ट्रैफिन वन-वे आहे, सादोवायावर बल्शाया पोद्याचेस्कायावर निघावं लागेल, आणि फनार्नीपर्यंत...पण जर मी झोपलो, तर मला उठवायची गरंज नाहीये.”
“झोपणार आहेस कां?”
“नाही, तुर्गून, माझ्याकडे झोपायला जागा आहे. मी तुला ह्यासाठी नाही घेतलं. मी तीन रात्री झोपलेलो नाहीये, मी थोडा वेळ झोपूं नाही शकंत कां? कळलं? मी एका माणसाला, म्हणू शकतो, की त्या जगांत पाठवून आलोय. सकाळी इन्वेस्टिगेटर मला वैताग आणेल. कदाचित, मला कुठेही जातांच येणार नाही, कळलं? आणि तू म्हणतो झोपणार आहेस कां. तू मला ओळखंत नाहीस, तुर्गून,, मला जादू नाही आवडंत. पण फक्त येवढं समजून घे, की जर अचानक मी झोपून गेलो, तर लक्षांत ठेव, की मी सगळं बघतो आहे, मला स्वतःलाच माहीत आहे, की मला कुठे उठायचंय.”
कपितोनव एखाद्या नेविगेटरसारखा लक्षपूर्वक पाहतो, की तुर्गून लेर्मोन्तोव्स्कीवर वळला की नाही. जेव्हां ते पुलावरून जातांत, तेव्हां तो उत्साहाने तुर्गूनला म्हणतो : “कारंज, बघतोय, पूर्णपणे बर्फाखाली आहे...” पण सादोवायाच्या आधी, जेव्हां सिग्नलजवळ थांबतात, तेव्हां कपितोनवचे डोळे पुन्हां बंद होतांत, आणि तो रीम्स्की-कर्साकोव प्रॉस्पेक्टचं वळण नाही बघूं शकंत.
क्यूकोव कैनालच्या वरचा पुल तुर्गून खूप हळू-हळू पार करतो – त्याला वाटतं की पैसेन्जरने उंच घण्टा बघावी, पण त्याला उठवायची हिम्मत नव्हती. हे राहिलं घुमटांचं मंदिर, आणि सगळं झगमगत्या प्रकाशाने आलोकित आहे, पण तुर्गूनला माहीत आहे की हेसुद्धां इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, - कैथेड्रलबद्दल त्याला सगळं पाठ होतं, पण ट्रिनिटी-कैथेड्रलला इसाकोव्स्की-कैथेड्रल अश्यासाठी समजला की ट्रिनिटी-कैथेड्रलच्या जवळ ट्रिनिटी-मार्केट आहे, जिथे तुर्गून आपल्या भावाची मदत करायचा.           
डावीकडे वळून तुर्गून ट्रामचे रूळ पार करतो – कदाचित पैसेंजरला दोन स्मारकं बघायला आवडेल – एक उभं आहे, आणि दुसरं बसलं आहे, विशेषकरून बसलेलं जास्त चांगलं आहे – त्याच्या डोक्यावर मोट्ठी बर्फाची टोपी होती. पण, पुढे आणखी ही मनोरंजक गोष्टी असतील, आणि ह्या रस्त्याला तुर्गून भर्रकन् पार करतो – विरघळंत असलेला बर्फ जितकी परवानगी देईल तितक्या वेगाने.
बल्शाया-मोर्स्कायावर बर्फ तोडणारे काम करंत होते. पण इथे समुद्र कुठे आहे, हे तुर्गूनला नाही माहीत. पीटरबुर्गमधे दीड वर्षापासून राहतोय, पण आज पर्यंत समुद्र नाहीं पाहिला.
हे राहिलं ते – इसाकोव्स्की-कैथेड्रल, आणि त्याच्यापुढे घोड्यावर स्वार स्मारक, आणि त्याच्यामागे दुसरं स्मारक – घोड्यावर : तुर्गून हळू-हळू जातोय, जणु पैसेंजरला दाखवतोय ती वस्तू, जी त्याला बघायची होती – पीटरबुर्गचे हे महान दर्शनीय स्थळं. मोठ्या मुश्किलीने तुर्गून स्वतःला थांबवतो, ज्याने कपितोनवची झोप मोडणार नाही. आता त्याच्या समोर आहे नेवा. आकाशाच्या अंधारांत त्याबाजूची मीनार चमचमतेय.
तुर्गून स्वतः थोडा-थोडा कपितोनव झाला आहे – ह्या दृष्टीने नाही, की त्यालाही झोपायचं आहे, तर असा, की हे सगळं त्याच्या नजरेने बघायचा प्रयत्न करतोय, जो बराच काळ ह्या सगळ्यासाठी तडफडला होता. आणि, जेव्हां तो ब्लागोवेश्शेन्स्की ब्रिज पार करतो, तर नेवाकडे अशी दृष्टी टाकतो, जणु झोपलेल्या कपितोनवसाठी तिला बघतोय.
तुर्गून खूपंच सुरेख ठिकाणांवर गाडी नेतो, आणि जेवढं सुरेख ते ठिकाण असेल, तितकीच हळूं गाडी चालवतो. बुरूज आहे उजवीकडे, आणि डावीकडे – म्यूजियम, आणि इथे, तोपेच्या फेन्सिंगच्यामागे, आणि, आणखीही इतर काही ठिकाणांवर तो जवळ-जवळ थांबूनंच जातो. विश्वास करणं कठीण आहे, की ह्या पैसेंजरने कुणाला तरी मारून टाकलं आहे, - तुर्गूनला, कदाचित, पैसेंजरचे शब्द बरोबर कळले नसावेत. कदाचित कोणीतरी ह्याच्याच जीवावर टपलं होतं, ह्याने कुणाला नव्हतं मारलं. हे बघा, तो आत्ता झोपलांय.
ह्यानंतर ते मशिदीकडे येतात. तुर्गून थांबतो, आणि दुर्घटनेच्या दिव्यांना ऑन करतो, कारण की इथे पार्किंगची परवानगी नाहीये, आणखी एका मिनिटासाठी इंजनसुद्धां बंद करतो ह्या अपेक्षेने की पैसेंजर जागा होईल, आणि स्वतःच त्याच्यासाठी सम्मानपूर्वक मशिद बघूं लागतो.
बर्फाने झाकलेल्या गल्ल्यांमधून होत तो जुन्या युद्धपोताकडे जातो, जिथून इथे क्रांतीचा प्रारंभ झाला होता. आणि पुन्हां, पुल पार केल्यावर, ज जाणे कुणीकडे जाऊं लागला. पैसेंजरला इथे आवडलं नसतं, आणि तुर्गून पटकन ह्या इण्डस्ट्रियल एरियातून निघून जातो.
पैसेंजर तरीही नाही उठंत, जेव्हां पेट्रोल पम्पाजवळ तुर्गून गाडी थांबवतो, आणि, जरी कारच्या शैफ्टमधे काही खराबी आहे, तुर्गून पैसेंजरला नेवाच्या किना-यावर घुमवणं आपलं कर्तव्य समजतो. आधी ते नेवाच्या काठाकाठाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात (ह्या वेळेस


03.10


नेव्स्की प्रॉस्पेक्टवर फारंच कमी गाड्या जाताहेत आणि पाई जाणारे तर बिल्कूलंच नाहीयेत), आणि मग तो पैसेंजरला नेवाच्या काठा-काठाने पश्चिमेकडून पूर्वेकडे घेऊन जातो. पूर्वी टोकावर त्याला आठवतं, की ह्या रस्त्यावर, ज्याला कोन्नाया स्ट्रीट म्हणतात, एक प्रसिद्ध इमारत आहे. तशी तर ही एखाद्या साधारण इमारतीसारखीच आहे, असल्या इमारती पीटरबुर्गमधे अगणित आहेत, पण त्याच्यासाठी ही खास आहे. तिच्या भिंतीवर स्ट्राने साबणाचे बुडबुडे उडवंत असलेल्या मुलाचं चित्र आहे. पीटरबुर्गमधे तर सगळंच खूप कठोर आहे, पण तुर्गूनला हे चित्र गुदगुल्या करून गेलं आणि आता तो


04.02

हळूच हसतो.

कपितोनव डोळे उघडतो.
तुर्गून बोटाने नक्काशीकडे खूण करतो, पण शब्दांने समजावू शकंत नाही. तो फक्त एकंच शब्द म्हणतो:
“चित्र.”
कपितोनव नजर उचलतो – बघतो – डोकं हालवतो.
आणि म्हणतो:
“चल, घरी घेऊन चल.”             
“समर-गार्डन दाखवूं कां?”
“ठीक आहे,” कपितोनव म्हणतो, आणि डोळे बंद करतो.

04.51

“तुर्गून, मी तुला पैसे दिलेत कां?”
“हो, हो, चांगलेच पैसे दिलेत.”
“तुझं नाव खूप भक्कम आहे – तुर्गून. तुला माहीत आहे कां, की ह्याचा काय अर्थ आहे?”
“माहीत आहे,” तुर्गून उत्तर देतो. “जो जिवन्त आहे.”
“फक्त जिवन्त आहे?”
“जो जिवन्त आहे, जमिनीवर चालतो.”
“असंच असायला पाहिजे. आणि मला वाटलं, कुणी लीडर असेल. विजेता.”
“नाही. जो जिवन्त आहे.”
“बरंय, असाच राहा, जो जिवन्त आहे. थैंक्यू.”

कपितोनवला आठवंत नाही की तो आपल्या खोलीपर्यंत कसा पोहोचला आणि, फक्त ओवरकोट काढून बिछान्यांत लपून गेला.

10.00

ब्रेकफास्ट झोपेमुळे गेला. बाकीच्या गोष्टीपण त्याने झोपेमुळे गमावल्या असत्या.

11.09

कागदावर नजर टाकून कपितोनव खिडकीकडे येतो:
“मला इन्वेस्टिगेटर च्योर्नोवला भेटायचंय.”
“काय सम्मनवर?”
“नाही, इन्वेस्टिगेशन आहे.”
कपितोनवचं पासपोर्ट बघितल्यावर ड्यूटी-ऑफिसर रिसीवर उचलतो, थोडा वेळ कुणाशीतरी बोलतो.

“रूम नंबर 11.”
इन्वेस्टिगेटर च्योर्नोव, मेयर ऑफ जस्टिस, ऑफिसच्या टेबलाशी बसला आहे, त्याच्यासमोर कम्प्यूटर ठेवलेला आहे. इन्वेस्टिगेटरच्या पाठीमागे, खोलीच्या   कोप-यांत घाणेरड्या-हिरव्या रंगाची भली मोट्ठी सेफ ठेवलेली आहे, तिच्यावर माइक्रोवेव आणि इलेक्ट्रिक-केटल आहे. इन्वेस्टिगेटरचा चेहरा हायपर टेंशनच्या पेशन्टसारखा सुजलेला आहे.
“बसा, येव्गेनी गेनाद्येविच. हे तर चांगलं झालं की तुम्हीं पळून नाही गेलेत. पण उशीर करणं – चांगलं नाहीये.”
कपितोनव रिकामी खुर्ची टेबलापासून दूर सरकवून तिच्यावर बसून जातो. खोलीत आणखी एक खुर्ची आहे, पण तिच्यावर बैग ठेवली आहे.
“तुम्हीं तर उद्या जाणार आहे नं, टिकिट विकंत घेतलंय कां?”
“उद्या कां? आजंच.”
“आज,” इन्वेस्टिगेटरने निःसंकोच म्हटलं. “हे काही कळंत नाहीये...”
कपितोनव चूप राहतो. हे सांगणं ठीक नाहीये, की फ्लाइट अडीच तासानी आहे, खतरनाक झालं असतं, त्याला धरून बंदसुद्धा करूं शकंत होते.
“आधी मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या. काय तलावशी तुमचे संबंध अप्रिय होते?”
“नाही, आमचे संबंध अप्रिय नव्हते.”
“तर मग सांगा, तुम्हां दोघांमधे तिथे काय चाललं होतं. आणि हेपण, थोडक्यांत, की तुम्हीं दोघंच तिथे, स्टोर-रूममधे, कसे पोहोचले, कोणी प्रत्यक्षदर्शी असल्याशिवाय.”
“माहीत आहे, मी दोन अंकांच्या संख्या ओळखतो.”
“हो, मला त्याबद्दल सांगितलंय.”
“कॉन्फ्रेन्स होती. इंटरवल होता. इंटरवल संपंत आला होता, सेशन सुरू व्हायला फक्त पाच मिनिट शिल्लक होते. तलावमाझ्याकडे आला आणि म्हणाला, की अजून बरांच वेळ आहे दाखवण्यासाठी...म्हणजे, ते, ज्याचं मी प्रॉमिस केलं होतं...ह्याआधी...स्क्रीन ठेवून. आणि त्या खोलींत होतं एक पार्टीशन, एक बुलेटिन-बोर्ड, ज्याच्यावर नवीन वर्षाची जाहिरात लटकंत होती...”
“नवीन वर्षाची?”
“हो, जुनी. आणि हे पार्टीशन, ‘तलावच्या मते, आमच्यासाठी स्क्रीनचं काम करूं शकंत होतं. तलावला असं वाटायचं, की त्याच्या चेह-यावर, जणु काही, लिहिलेलं असतं, की तो काय विचार करतो आहे...आणि मला हे वाचतां येतं, की त्याने कोणची संख्या मनांत धरलीये. म्हणून स्क्रीनची गरंज होती. म्हणजे, त्या परिस्थितीत, ते पार्टीशन...आम्हीं त्याला सरकवून खोलीच्या मधोमध आणलं. तलावत्याच्या मागे गेला, मी ह्या बाजूला राहिलो. मी त्याला दोन अंकांची संख्या मनांत धरायला सांगितलं, नेहमीसारखीच. त्याने धरली 21. मग त्याने आणखी एक संख्या धरली, आणि मी तीपण ओळखली, आता लक्षांत नाहीये, की ती कोणची होती.”
“आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्हांला लक्षांत नाहीये.”
“पण मी कशाला लक्षांत ठेवूं? 21सुद्धां मला अश्यासाठी लक्षांत राहिली, की ती ब्लैकजैक35 आहे. आम्हीं त्याबद्दल वाद सुद्धां केला, तो पत्त्यांची जादू करायचा, आणि त्याच्यासाठी ह्या संख्येचं महत्व होतं. पण, त्याला असं वाटंत होतं की तो कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपलं गुपित उघड करतो आहे. काही संदर्भांनी, जसं नजरेने, आवाजाने...तिस-यांदा आम्हीं हे ठरवलं, की तो पार्टीशनच्या मागे गप्प राहील, आणि मी बोलंत राहीन, जसं नेहमी करतो. मी त्याला बघंत नाहीये, किंवा ऐकंत नाहीये, असा प्रयोग, समजतां आहांत नं? आणि त्याने धरली : 99.”
इथे विस्ताराने सांगा,”
“मी पार्टीशनच्या मागून त्याला एखादी संख्या मनांत धरायला सांगतो, दोन अंकांची. तो गप्प राहातो. मग मी त्यांत पाच जोडायला सांगतो. तो गप्पंच आहे, मी थोडा वेळ वाट पाहातो आणि ह्या बेरिजेतून तीन वजा करायला सांगतो. मग मी चूप राहातो आणि म्हणतो : तुम्हीं धरली होती 99. आणि तेवढ्यांत फरशीवर धम्म् असा आवाज ऐकतो.”
“समजलं. एक गोष्ट लक्षांत नाही आली. तुम्हांला कसं माहीत की त्याने 99च धरली होती?”
“माहितीये, बस, येवढंच.”
“म्हणजे, तुम्हांला हे म्हणायचं आहे की त्याला तुमच्या दोन 9ने मारून टाकलं?”
“पहिली गोष्ट, माझे नाही, तर त्याचे, आणि दुसरं, अशी कोणतीही गोष्ट मला म्हणायची नाहीये. तुम्हीं माझ्यावर ते विचार थोपतांय, जे माझे नाहीयेत.”
“ठीक आहे. आणि तुम्हीं कां त्याला आधी पाच जोडायचा आणि मग तीन वजा करायचा हुकूम दिला?”
“हुकूम नाही दिला, तर विनंती केली.”
“हो, कां?”
“मी ह्याचं उत्तर नाही देऊं शकंत.”
“कां नाही देऊं शकंत?”
“ऊफ़, चला, असंच समजा. हा माझा प्रोग्राम आहे. फक्त माझा, लेखकाचा. तो कॉपीराइटच्या नियमाने सुरक्षित आहे. प्लीज़, माझ्यावर हे समजावण्यासाठी दडपण नका आणूं की कां आणि किती जोडायला सांगतो, आणि कां आणि किती वजा करायला सांगतो.”
“तुमचं सीक्रेट आहे.”
“जवळ-जवळ असंच समजा.”  
“मलापण एक जादू येते. बघा.”
मेयर पेन्सिल उचलतो आणि दोन्हीं तळहातांना एक एकावर एक ठेवून तिला अंगठ्यांनी दाबतो. नंतर तळहातांना अश्या प्रकारे फिरवतो की एक अंगठा दुस-याचा चक्कर लावतो – ह्या प्रक्रियेंत पेन्सिल 180 डिग्री फिरते आणि ती खालून दोन्हीं अंगठ्यांनी तळहातांच्या मधे दबलेली भासते – टेबलाच्या समांतर पातळीवर आणि कपितोनवकडे ताणलेली.
“तुम्हीं करा.”
कपितोनव इन्वेस्टिगेटरच्या हातांतून पेन्सिल घेतो आणि तीच ट्रिक करूं नाही शकंत. त्याची मनगट वेडे-वाकडे फिरतात.
“ह्याच कारण फक्त हे, की तुमच्या हातांची मूवमेन्ट कोण्या दुस-या तळावर होते आहे,” मेयर आपला आनन्द लपवूं शकत नाही. “तुमची गतिविधि डावीकडे होते, तर माझी – उजवीकडे. हो ना?”
कपितोनवने चुपचाप पेन्सिल टेबलवर ठेवून दिली.
“बघा, तुम्हांला विश्वास नव्हता की आपल्या हातांची गतिविधि वेगवेगळ्या स्तरांवर होत असते, तर मी कां विश्वास करू, की त्याने 99हीच संख्या मनांत धरली होती.”
“त्याने काय फरक पडतो, की त्याने कोणची संख्या धरली होती. भली ही 27 कां नसो.”
“आता तुम्हीं विषयापासून दूर जात आहांत.”
कपितोनव गप्प राहतो, पण इन्वेस्टिगेटरला एखाद्या जोरदार प्रतिक्रियेची अपेक्षा होती.
“दाखवा, प्लीज़.”
“काय दाखवूं?”
“तुमची ट्रिक. तुम्हीं आणखी काय दाखवूं शकता?”
“मी वचन दिलंय, की आता कधीही ती दाखवणार नाही.”
“तुम्हीं मला कोणतंही वचन नाही दिलं. ह्याला इन्वेस्टिगेटिंग एक्सपेरिमेन्ट समजा.”
“मी दाखवण्यासाठी बाध्य आहे कां?”
“ओह, अचानक हे बाध्यकशाला? असं केलं तर आपल्या दोघांसाठी जास्त चांगलं होईल. तुमच्यासाठी – विशेषकरून.”
“प्रामाणिकपणे सांगायचं, तर इच्छा नाहीये.”
“समजायचा प्रयत्न करा. इच्छा नाहीयेला सोडा. आपण काही मुलांचे खेळ तर नाही खेळंत आहोत.”
“कोणतीही संख्या मनांत धरा,” थकलेल्या आवाजांत कपितोनव म्हणतो, “दोन अंकांची.”
“आणि?”
“त्यांत सात जोडा.”
“पाच कां नाही?”
“कारण की सातंच जोडायचे आहेत.”
“जोडले.”
“दोन वजा करा.”
“समजूं या.”
“काय समजूं या? तुम्हीं 99 ही संख्या धरली होती.”
“ह्यांत काय जादू आहे?”
“तुम्हीं 99 धरली होती,” कपितोनव पुन्हां म्हणाला.
“हे तर एक साळूसुद्धां समजूं शकतो. जे काही झालंय, त्यानंतर मी दुसरी कोणची संख्या मनांत धरली असती.
“जे काही झालं, त्यानंतर तुम्हीं 99चा अंक मनांत धरला, ह्यांत माझा काही दोष नाहीये.”
“मी तुम्हांला दोषी म्हणंतसुद्धां नाहीये.”
हे शेवटचं वाक्य थोडं जास्त कठोरपणे म्हटलं होतं – त्याचा स्वर अर्थाशी विसंगत होता.
“आधी कुणीही 99चा अंक नव्हता धरला. तो पहिला होता.”
पण हे स्वीकारोक्तीसारखंच भासलं. कपितोनवला स्वतःच अश्या स्वराची अपेक्षा नव्हती.
“मी दुसरा आहे,” इन्वेस्टिगेटर म्हणतो. “तर एक लहानशी प्रॉब्लेम आहे. त्याने धरला 99 – आणि तो शवागारांत आहे, आणि मी धरला – 99 – आणि तुम्हीं बघतांय, की मी जिवन्त आहे, धडधाकट आहे, टेबलाशी बसलोय आणि ह्यापुढेही जगायची इच्छा आहे. हे तुम्हांला विचित्र नाही वाटंत?”
“तुम्हांला माझ्या तोंडून काय ऐकायचंय? तुम्हांला काय पाहिजे? तुम्हांला माझ्याकडून काय काढायचंय?”
“नाही, काहीही काढायचं नाहीये. फक्त, ह्याच गोष्टीवर जोर देणं, की त्याने 99च धरला होता – वेडेपणा होईल. तुम्हीं ह्याबद्दल फारंच विचार करतांय.”
“आशा करतो, की तपास पूर्ण झाला असेल. मृत्युच्या कारणाचा पत्ता लागला?”
“मृत्युच्या कारणाचं इथे काय काम आहे? त्याबद्दल तर तुमच्याशिवाय ही निर्णय घेऊं.”
इन्वेस्टिगेटर टेबलाचा खण बाहेर काढतो, तिथून हाइजिनिक नैपकिन्सचा एक पैक काढतो, एक नैपकिन काढून त्यांत नाक शिंकरतो, डस्ट-बिनमधे फेकतो.
“आयडिया असा आहे की तुमच्याकडून ग्यारंटी घ्यायची, की तुम्हीं शहर सोडून नाही जाणार. पण, तुम्हीं इथे, माझ्यासमोर, आलेच कशाला? जा आपल्या...माहीत नाही, कुठे. पण आधी लिहून – सगळं, जसं झालं होतं.”

      
कपितोनवसमोर कोरा कागद पडला आहे.
“थांबा. मला समजतंय, की तुम्हीं काय लिहिणार आहे. नंतर प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. तुम्हीं लिहा – थोडक्यांत, ठळकपणे. बोलंत होतो. आणि अचानक त्याची तब्येत बिघडली, तो मेला.”
“बिना जादूचं?”
“अगदी बिना जादूचं,” इन्वेस्टिगेटर म्हणतो.
कपितोनव चार वाक्यांत घटनेचं स्पष्टीकरण देतो – थोडक्यांत, स्पष्टपणे.
“आणि हे कशाला? हे कोष्ठक?” – इन्वेस्टिगेटरने मजकुराच्या आधी आणि मग शेवटीही धनु-कोष्ठक पाहिले. सहीचं काय झालं? तुम्हीं काय नेहमी धनु-कोष्ठकांच्यामधे सही करता? कां?”
“चालतं,” कपितोनव म्हणतो.


13.45

आश्चर्याची गोष्ट ही नव्हती की तो विमानतळावर वेळेच्या आधी पोहोचला, आश्चर्याची गोष्ट ही होती की मेटल-डिटेक्टरच्या स्प्रिंगच्या पलिकडे जाणं शक्य होत नाहीये. त्याने मोबाइल फोन बाहेर काढून ठेवला आहे, आणि खिशांतून सगळी चिल्लरसुद्धां बाहेर काढली आहे, आणि बेल्टपण काढला आहे, पण ही मूर्ख स्प्रिंग वाजतंच आहे, वाजतंच आहे.
“कदाचित तुमच्या शरीरांत एखादा धातु फिक्स केलेला असेल?

आणि इथे कपितोनव क्षणभरासाठी घाबरला – त्याला शंका वाटली की कुठे हे वेषांतर केलेले माइक्रोमैजिशियन्स त्याला फेस-, मेटल- वगैरे तपासांतून जायला सांगतील: आणि, खरंच, पोटांत वजनदार नट शोधून काढतील, ज्याच्याबद्दल एक वाईट विचार त्याला त्रस्त करंत होता.

हातातल्या मेटल-डिटेक्टरमधून जाताना कपितोनवच्या शरीराच्या एकही भाग झणझण नाही करंत – जणु कपितोनवच्या आंत कोणचीतरी प्रतिक्रिया प्रारंभ झाली आहे, जी संदेहास्पद कारणांना निष्क्रिय करंत आहे.    
पण सगळ्याच कारणांना नाही.                   
इन्ट्रोस्कोपतून जातांना पर्स उघडायला सांगण्यांत आलं. त्यांत लहानशी ब्रीफकेस कां ठेवली आहे? कारण, की पूर्णपणे आत आली, आणि कपितोनवने एक लगेज कमी करण्याचा निर्णय घेतला.
हे तर बरं झालं, की ब्रीफकेसमधे अशी काही वस्तू नाहीये – कैबेजचे कटलेट्ससुद्धां नाहीयेत.
कपितोनवला स्वतःलापण माहीत नाहीये, की ही ब्रीफकेस तो मॉस्कोला कां घेऊन जातो आहे. त्याला ह्या ब्रीफकेसची गरंज आहे कां? पण आता हिला विमानतळाच्या बिल्डिंगमधेपण तर नाही सोडता येत.
तो तिथून दूर नाही जाऊ शकला – विचित्रसा यूनिफॉर्म घातलेल्या गस्त घालंत असलेल्या दोघांनी त्याला पासपोर्ट दाखवायला सांगितलं. त्यापैकी एकाच्या हातांत साखळीने बांधलेला कुत्रा होता, जो काहीतरी करूं शकंत होता – कमीतकमी असंख्य पैसेंजर्सचं लक्ष आपल्याकडे नाही खेचलं, तरी पुष्कळ आहे.

“माझ्यांत काही विचित्र दिसतंय का?” कपितोनव स्वतःकडे लक्ष न देण्याचा, आणि आपणहून कुत्र्याचं लक्ष आकर्षित न करण्याच्या प्रयत्नांत विचारतो.
“तुम्हांला खात्री आहे कां, की हा पासपोर्ट तुमचांच आहे?”
“तिथे माझा फोटो आहे!”   
“फक्त ह्याच कारणामुळे?”
हे तर बरं आहे, की कुत्रा त्याच्याकडे लक्ष नाही देत आहे.
“आणि सही!”
धारकाला पासपोर्ट परंत करतांत:
“हैप्पी जर्नी, येव्गेनी गेनाद्येविच.”
रजिस्ट्रेशन काही भानगड न होतां पूर्ण झालं. कॉफी पिण्याइतका वेळ आहे, पण एका फेस-टू-फेस मीटिंगने ह्यापासूनही परावृत्त केलं:
“वॉव! काय योग आहे?”
ज़िनाइदा आणि झेन्या, तिचा डाउनमुलगा.
“तुमची मैथेमैटिक्सची कॉन्फ्रेन्स कशी झाली?” ज़िनाइदा उत्सुकता दाखवते.
“चांगली झाली. आणि तुम्हीं इथे काय करतांय?”
“हो, बघा, सगळी गडबड झाली, बहिणीला स्ट्रोक आला, लगेच वोरोनेझची फ्लाइट पकडायची आहे. आणि तिथून घरी, जसं शक्य होईल तसं.”
“काय म्हणता! थांबा, तुमची बहीण तर पीटरबुर्गमधे आहे.”
“ही दुसरी आहे.”
“दिलगीर आहे,” कपितोनव म्हणतो. “असं वाटतं की तुम्हीं फक्त एकंच दिवस पीटरबुर्गमधे होत्या?”
“कआब्लिक, कआब्लिक!” त्याच्याच नावाचा येव्गेनी उद्गारतो.
कपितोनव त्याला विचारतो:
“कआब्लिक बघितलं?”
“तू कआब्लिक पाहिलं?” प्रश्न कपितोनवकडे वळतो.
“कसा नाही पाहणार,” कपितोनव म्हणतो.
आठवतंय.
“ही घे. आता ही तुझी झाली.”
छडी घेऊन, लहानगा झेन्या तिला असं झटकतो, जणु ती थर्मामीटर आहे, आणि काही स्वतःचंच, न कळण्यासारखं बडबडूं लागतो.
कपितोनव ज़िनाइदाला सांगतो:
“लिहिलं आहे, की जादूची आहे.”
“मला कळतंय, - ज़िनाइदा हरवल्यासारखी स्मित करते. “पण तुम्हीं फक्त एक दिवसकां म्हटलं? आम्हीं तर इथे एका आठवड्यापेक्षां थोडं जास्तंच राहिलो.”
“मी तुमच्या बरोबर इथे परवांच नाही आलो कां – ह्या शनिवारी?”
“ह्या शनिवारी कसे?...ह्या शनिवारी नाही, तर त्या शनिवारी...तुम्हीं गम्मत करतांय कां?”
कपितोनव गंमत नाही करंत. जेव्हां बाकीचे लोक गंमत करतात, त्याने, कदाचित, समजणं बंद केलंय. तो निरोप घेऊन तिथून निघतो.

14.18
कपितोनव डिपार्चर हॉलमधे बसला आहे, मुलीला मैसेज पाठवायचा आहे. माहीत नाही कां, त्याला वाटतं की पोहोचंत असल्याबद्दल तिला कळवायला पाहिजे, काही तरी असं: “फ्लाइटने येत आहे.: किंवा असं: “डिपार्चर हॉल. लवकरंच.”
लवकरंच सगळे इलेक्ट्रिक उपकरण बंद करण्यासंबंधी घोषणा केली जाईल.
डिपार्चर हॉलमधे काही लोकांना लवकर-लवकर, समाधान होईपर्यंत, गोष्टी करायच्या आहे. फुकट वर्तमानपत्राजवळच्या स्टैण्डच्या जवळ मुलं धावाताहेत. काचेच्या पलिकडे काळं आकाश आहे. विमान प्रत्येक ऋतूंत टेक-ऑफ करतात.

{{{‘तलावकोण आहे?}}}

ही मरीना आहे.
हिला माहीत आहे की तुमची विकेट कशी डाउन करायची असते. कपितोनव लगेच उत्तर नाही देत.
{{{ तो मेला. तू कां विचारते आहेस?}}}
मरीना – त्याला:
{{{ तो जिवंत आहे.}}}

त्याला पुन्हां असा भास होतो, की पोटांत एक वजनदार नटआहे.

{{{ तुला खात्री आहे कां?}}}
वाट बघतो. उत्तर येतं.

{{{तो माझ्या मूखिनचा भाऊ आहे आणि ते दोघं मंगोलियांत राहतांत, खाणीत काम करतांत.}}}

“दैवी क्षेत्र,” कपितोनव जोराने परक्या आवाजांत म्हणतो.
मैसेज येतो:
{{{ थैन्क्यू.}}}
{{{ कशासाठी?}}}

उत्तर येतं:

{{{प्रत्येक गोष्टीसाठी.}}}
      
कपितोनव मोबाइल स्विच ऑफ करतो. काही तरी करायला बघतो. पुन्हां ऑनकरतो.

आन्काला लिहितो:

{{{तुझ्यावर खूप प्रेम करतो}}}
काय पापाशब्द लिहायचा? पण विचार करतो, की तिला कळेल.

फ्लाइट तीस मिनिट उशीराने जाण्याची घोषणा होते.

आता हे आणखी कशाला? काय झालं? काय होतंय?
“आणि मी पण तुझ्यावर खूप खूप.”

फक्त टेक्स्ट – कोष्ठकांशिवाय.

तो उठून हॉलमधे हिंडू लागतो – ह्या डिपार्चर हॉलमधे, वाट पाहतोय. घड्याळीकडे बघतो.

******
                            
           
  

संदर्भ

1.सप्सानमॉस्को ते पीटर्सबर्ग जाणारी फ़ास्ट ट्रेन.
2. एडमिरैल्टी – पीटर महान द्वारा निर्मित एक बिल्डिंग, जिच्या सोनेरी घुमटावर एक लहानसं जहाज़ आहे.

3.ईवेंट्स-आर्किटेक्ट – ह्या व्यक्तिने आपलं आडनाव हेच सांगितलं आहे.

4.तलाव – रशियनमधे हे नाव आहे वोदोयोमोव, ज्याचा अर्थ आहे तलाव. कादम्बरींत असे अनेक आडनावं आहेत, ज्यांचा त्या वस्तूचा गुणांशी संबंध आहे, म्हणून भाषांतरकाराने नावांचंपण भाषांतर केलं आहे.

5. नेक्रोमैन्सर - ओझा

6.काळ-भक्षक   हा खरोखरंच काळ भक्षण करंत होता.

7.श्याम-वन – ह्या जादुगाराचंपण खरं नाव दिलेलं नाहीये.

8.कार्ड – रशियन शब्द आहे ‘कार्ता’ ज्याचा आणखी एक अर्थ असतो – नकाशा. जेव्हां ह्याच्याबरोबर ‘खेळायचे’ जोड़तात तेव्हां हा ‘खेळायचा पत्ता’ होतो.

9.एव्गेनीला प्रेमाने संक्षिप्तपणे ‘झेन्या’, ‘झेनेच्का’पण म्हणतात.

10.पीटरबुर्गला सहसा रोजच्या भाषेंत पीटर म्हणतात.

11. योगूर्त – इथे संदर्भ तोडोरच्या अस्खलित उच्चारणाचा आहे, म्हणून ह्या शब्दाला तसंच राहू दिलेलं आहे, जसं मूळ पाठांत आहे. ‘दही’ शब्दाच्या प्रयोगाने स्वराघाता मुद्दा स्पष्ट नसता झाला.

12.आइसिकल्स - क्रमशः टपकणारे पाण्याचे थेंब जमल्याने बनलेली बर्फाची छड़ी.

13.लैब्नित्ज़ (6146-1716) – प्रसिद्ध जर्मन दार्शनिक आणि गणितज्ञ, मैथेमेटिक्सच्या इतिहासांत ह्याला महत्वपूर्ण स्थान आहे.
14.रीगेंट - एक रासायनिक पदार्थ
15.सार्डीन – एक प्रकारचा लहान मासा, जो साधारणतः डबा-बंद केला जातो.
16. ‘सेका’ – पत्त्यांचा एक खेळ जो सोवियत संघात लोकप्रिय होता.

17. “फूल” – हासुद्धां पत्त्यांचा एक सोपा खेळ आहे.

18.एक हाताचा डाकू – कैसीनोत खेळला जाणारा जुगाराचा. ह्याला ऑनलाइनपण  खेळतात.

19.माशी – रशियनमधे माशीसाठी शब्द आहे – मूख़ा. मूखिनची उत्पत्ति ह्याच शब्दाने झाली आहे.

20.लूडोमैनिया – लूडो खेळण्याची सणक

21.रूलेट – जुगाराचा का एक खेळ-विशेष

22.ज़्याब्लिक – चैफ़िन्च ( ब्रिटेन) मधे आढळणारा छोटीसा गाणारा पक्षी.

23.नार्सिसिस्ट – स्वतःवरंच मोहित होणारा.

24.कपितोन – इथे कपितोनवशी तात्पर्य आहे.

25.आर्टिस्ट-पेरेद्विझ्निक – एकोणीसाव्या शतकातील रशियन वास्तववादी स्कूलचे पेंटर, ज्यांच्यांत लोकतंत्रिक कल पण होता.

26.फ़िबोनाची क्रम लिओनार्दो फिबोनाची द्वारा आविष्कृत संख्यांच्या निम्नलिखित अनुक्रमाला फिबोनाची श्रेणी (Fibonacci number) म्हणतात:
0,\;1,\;1,\;2,\;3,\;5,\;8,\;13,\;21,\;34,\;55,\;89, \ldots.
परिभाषेनुसार, पहल्या दोन फिबोनाची संख्या 0 आणि 1 आहेत. ह्यानंतर येणारी प्रत्येक संख्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज आहे. काही लोक आरंभिक 0 सोडून देतात, ज्याच्या ऐवजी दोन 1 पासून अनुक्रमाची सुरूवात केली जाते.

27.एमिल्या  - ‘मूर्ख एमिल्या और मासा’ नामक रूसी लोककथेचं पात्र.

28.श्राम – ह्या शब्दाचा अर्थ आहे – जखमेची खूण

29.फ़ेरो ख़ुफ़ू – प्राचीन इजिप्टचा शासक, ज्याला पिरामिड्स निर्मितीचं श्रेय दिलं जातं.

30.बोत्तिचेल्ली (1445-1510) – रेनासां कालखण्डाचा प्रसिद्ध इटालियन चित्रकार.

31.मेदूसा गॉर्गोन – ग्रीक पौराणिक कथांची एक पात्र, जी सैतान होती. तिच्या डोक्यावर केसांच्या जागेवर साप होते. जो पण तिच्याकडे बघायचा, तो दगड होऊन जायचा. पर्सियस ने तिचं डोकं कापून आपल्या शत्रूंच्या विरुद्ध त्याचा ढालीसारखा उपयोग केला होता.

32. ब्लैकजैक – कैसिनोत खेळला जाणारा पत्त्यांचा लोकप्रिय खेळ.