शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

धनु कोष्ठक - 18




बहुमताने बोर्डच्या कार्यकारिणीची पुष्टि झाली आहे. सगळ्यांचं अभिनंदन करतो.”
माइक्रोफोनजवळ माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी प्रकट होतो.
“मला वाटतं, की आपली कॉन्फ्रेन्स संपंत आलीये, आपण आपल्या वैयक्तिक समस्यांवर फारंच जास्त वेळ दिला. पण आपण राष्ट्रीय स्तरावर कागदपत्रांच्या अत्यधिक प्रवाहाची/ नासाडीची निंदा करण्याचा प्रस्ताव पारित नाही केला...”
हॉलमधे टाळ्या वाजू लागल्या, आणि त्याच्यासाठीसुद्धां टाळ्या वाजूं लागल्या. माइक्रोमैजिशियन रीख्लीला माइक्रोमैजिशियन अदिनोच्नीला माइक्रोफोनपासून दूर करण्यास जराही प्रयत्न नाही करावा लागला.
“आपल्या मेंढ्यांकडे वळतो...हे काय चाललंय, महाशयांनो? तुम्हांला हे विचित्र नाही वाटंत कां? तपास अजून सुरू झालेला नाहीये, आणि आपल्या कार्यकारिणीत असा सदस्य आहे, जो तपासाच्या वर्तुळांत येणार आहे! मी प्रस्ताव ठेवतो, की ही भयानक चूक सुधारण्यांत यावी, आणि कपितोनवला आपल्या कार्यकारिणीचा सदस्य मानूं नये. कमींत कमी तपासाचं काम पूर्ण होईपर्यंत!”
“मानूं नये – म्हणजे काय? काढून टाकावें?”
“काढून टाकावें! काढून टाकावें!” ज्युपिटेर्स्कीच्या ग्रुपचे लोक ओरडतांत.
श्याम-वनच्या ग्रुपचे लोकं उत्तरादाखल शिट्ट्या वाजवतांत आणि हूटकरतात.
“प्लीज़, मला माझी उमेदवारी परंत घ्यायची परवानगी द्या,” कपितोनव उठतो.
“अरे, तुम्हीं बसून जा नं, हा तुमचा प्रश्न नाही राहिलाय, इथे सिद्धांताचा प्रश्न आहे!”
“शांति! शांति!” अध्यक्ष व्यवस्था राखण्याची अपील करतो. “मलापण समजंत नाहीये, की आपण निर्दोषितेचा अनुमानह्या सिद्धांताकडे कां दुर्लक्ष करतो आहे. त्या खोलींत कपितोनव आणि तलावच्या मधे काहीही झालं असो, अजूनपर्यंत कोर्ट-केस झालेली नाहीये आणि आपल्याला फक्त अविश्वासाच्या आधारावर कपितोनवबद्दल मत बनवण्याचा हक्क नाहीये.”
आता माइक्रोफोनजवळ व्लादिस्लाव हेर्त्स येतो, हा जादुगारांच्या त्या ग्रुपचा लीडर आहे, ज्याला तलावप्राइवेट वार्तालापांत जुगारी म्हणायचा.
“हे बरोबर आहे, आपल्याला कायद्याचा सम्मान करायला हवा. निर्दोषितेचा अनुमान – ही पवित्र गोष्ट आहे. पण ह्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीनेपण पाहूं या. आपल्या सहयोग्याने सुमारे दोनंच तासांपूर्वी” त्याने घड्याळाकडे नजर टाकली.

19.25

“...ओके, कदाचित तीन...सगळ्या लोकांच्या उपस्थितीत एक गंभीर घोषणा केली होती. त्याने म्हटलं होतं: मी पुन्हां कधीही हा जादू नाही दाखवणार. आणि, जर परिस्थिति अशी आहे, तर काय हे नॉनसेन्सनाहीये, की तो माणूस, ज्याने आपलं प्रोफेशन सोडून दिलंय, बोर्डाच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे?”
ह्या तर्काचा ऑडिटोरियमवर प्रभाव पडतो – काही लोक उत्तेजित होतात आणि ओरडूं लागतात : नॉनसेन्स! नॉनसेन्स!’, काही लोक हताश होतात आणि त्यांचे विरोधात्मक नो! नो!आधीच्या लोकांच्या आरड्या-ओरड्यांत दबून जातांत. माइक्रोमैजिशियन ज़्वेनिगरोद्स्की माइक्रोफोन काबीज करतो:
“इथे कायदेशीर तपासाचं आणि त्याच्या परिणामाचं गाणं गात आहेत, पण, प्लीज़, हे सांगा, सिद्धांततः परिणाम, मग तो कसाही परिणाम कां न असो, आपल्या कॉन्फ्रेसच्या शिवाय तेवढ्यांच स्पष्टतेने ह्या गोष्टीवर प्रकाश टाकू शकतो का, जिला आपल्या कॉन्फ्रेन्सने...आपल्या कार्यकलापाच्या दरम्यान...इतक्यांतंच इतकं स्पष्ट केलेलं आहे? मी कशाबद्दल बोलतोय? ह्याबद्दल! कपितोनवकडे कारण होतं!...हो, हो, आपल्या सगळ्यांच्या डोक्यांत तो भयंकर शब्द घुमंत होता, पण कोणालातरी त्याचा फक्त उच्चारंच करायचा होता!”
इतक्यांत माइक्रोफोनजवळ हेरा-फेरी करणारा जादुगार पेत्रोव दिसतो:
“शुद्धीवर या, मित्रांनो! अमानुष नका होऊं! आपण इतक्यांतच तलावच्या स्मृतीत एका मिनिटाचं मौन पाळलं होतं. कार्यकारिणीसाठी कपितोनवच्या नावाचा प्रस्ताव कुणी आणखी नाही, तर तलावनेच ठेवला होता. तलावच्या आठवणीखातर, तुम्हांला विनंती करतो, की हा विषय इथेंच संपवावा! कपितोनव तसला माणूस नाहीये, जो कार्यकारिणींत जाण्यासाठी तलावचं प्रेत ओलांडून जाईल!”
माइक्रोमैजिशियन पाव्लेन्कोने लगेच ह्याचा विरोध केला:
“मीपण निर्दोषितेचा अनुमान” ह्या सिद्धांताचा सम्मान करतो, पण त्याबद्दल माझ्या मनांत प्रेम असूनही, मला वाटतंय की तुम्हीं आतां जे म्हटलंय, ते फक्त चिथवणारं आहे, आणि असं सांगून तुम्हीं तलावच्या स्मृतिचा अपमान करतांय!”       
कुठूनतरी एक पांढरं कबुतर प्रकट होतं, ते एका भिंतीकडून दुस-या भिंतीकडे उडतंय.
अध्यक्ष उठून उभा राहतो:
“आता जर एकही ससा, मिट्ठू किंवा आणखी असलीच वस्तू दिसली, तर मी कॉन्फ्रेन्स संपवून टाकेन!”
कबुतर उडून त्याच्याकडे जातो आणि खांद्यावर बसतो. अध्यक्षाला कबुतराला पळवायचं नाहीये, तो त्याच्यासकट सावधानीने आपल्या खुर्चीवर बसतो.
“त्याचा बहिष्कार करण्याच्या प्रस्तावावर मतदान केलं पाहिजे!” हॉलमधून लोक ओरडून म्हणतात.
“नाही, नका करूं!”                     
“बहिष्कार! बहिष्कार!”
खांद्यावर कबुतर घेऊन अध्यक्ष म्हणतो:
“कार्यकारिणीतूंन कपितोनवच्या बहिष्काराच्या प्रस्तावावर मतदान करण्यास माझं काहीच जात नाही, पण मला पूर्ण विश्वास आहे, की कार्यकारिणीतूंन – जिचं अनुमोदन आपण इतक्यांतच झालेल्या निवडणुकीच्या परिणामांच्या आधारावर केलेलं आहे – कुणाच्याही बहिष्काराचा प्रस्ताव आपल्या राजनैतिक अपरिपक्वतेचं प्रमाण आहे. चला, आधी एक कमिटी बनवूं या, आचार संहितेवर, हे कठीण नाहीये आणि हे आवश्यक आहे, तिलाचं...”
त्याला आपलं म्हणणं पूर्ण करूं देत नाही:
“कमिटीची काही गरज नाहीये!”
“चांगलं ओळखतो आम्ही ह्या कमिटींना!”
कबुतर अध्यक्षाच्या खांद्यावरून फडफडंत उडालं, आणि दोनदा हॉलचा चक्कर मारून कपितोनवपासून दोनशे मीटर्सदूर खिडकीच्या चौकटीवर बसलं. 
कपितोनव गहि-या नजरेने कबुतराच्या नजरेंत अडकला. ते कपितोनवकडे तिरपं उभं राहून एका डोळ्याने बघतंय. कपितोनव बरांच वेळापासून कॉन्फ्रेन्सच्या कारभारावर लक्ष नाही देत आहे. जर कबुतराच्या ऐवजी तिथे प्लैपिटस कबुतर जरी आलं असतं, तरी कपितोनवला आश्चर्य झालं नसतं.     
ह्या वेळेस

19.48

दोन माइक्रोमैजिशियन्स माइक्रोफोनजवळ जागा धरण्यासाठी भांडताहेत.
खिडकीच्या चौकटीवर कबुतर जणु डान्स करतोय: कधी एक पंजा उचलतो, तर कधी दुसरा – जणु त्याला काहीतरी म्हणायचंय.
“त्याला काहीतरी म्हणायचंय,” कपितोनव म्हणतो, पण त्याचं म्हणणं कुणीच ऐकंत नाही.
आणि तोसुद्धां ऐकंत नाहीये (हो, त्या दोन माइक्रोमैजिशियन्समुळे काही ऐकणं शक्य नव्हतं) इतक्यांत अध्यक्ष भुंकतो: “तुम्हीं कोण?” – त्याच्याकडे बघंत, जो तीरासारखा हॉलमधे घुसला होता. आणि तो होता – एक लिलिपुट. त्याच्या अप्रत्याशित आगमनाला काही लोक बघतांत, तेव्हां पण, जेव्हां खुर्च्यांच्या मधली वाट पार करून, तो रांगांच्या मधून खिडकीकडे जाऊं लागतो. कपितोनवचं लक्ष लिलिपुटकडे तेव्हांच जातं, जेव्हां तो आपल्या मुठीने कपितोनवचा गुडघा दूर करतो आणि खिडकीच्या चौकटीजवळ दिसतो. पायांच्या बोटांवर उभा राहून, लिलिपुट कबुतर हातात घेतो, म्हणतो : “हे माझं आहे,” आणि परंत जायला लागतो.     
आता तर सगळ्यांनीच त्याला बघितलं. धावंत जाणा-याला बघण्यासाठी कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स किंचित उचकतांत. माइक्रोफोनच्या जवळचे दोघंपण आपलं भांडण सोडून खालच्या बाजूला बघूं लागतात.
“तुम्हांला विश्वास आहे कां, की हे तुमचं आहे?” अध्यक्ष विचारतो.
“नक्कीच!” जाता-जाता लिलिपुट उत्तर देतो आणि दाराच्या मागे गायब होतो.
“हा कोण आहे? हे काय आहे?” हॉलमधे लोक चिव-चिव करूं लागतात. “तो आपल्याबरोबर कां नाहीये?”
“बसून जा!” अध्यक्ष दोन्हीं माइक्रोमैजिशियन्सला हुकूम देतो, आणि ते, ‘सॉरीम्हणंत स्टेजवरून चालले जातांत. “मी चर्चा थांबवतोय. बस, पुरे झालं. अजून आपल्या समोर अनौपचारिक कामं सुद्धां पडली आहेत. शांति! कृपा करून शांत राहा!”
तो स्वतःसुद्धां चूप होतो – उभा आहे आणि चूप आहे, जणु उदाहरण प्रस्तुत करतो आहे. ह्या कृतीचा लोकांवर असर झाला: मौनाची शक्ति हळूहळू गदारोळाच्या राक्षसाला काबीज करते.
जेव्हां पर्याप्त शांतता पसरली, तेव्हां एक नम्र पण धीट आवाज ऐकूं येतो:
“डॉक्यूमेन्ट्सचा प्रवाह...”
“चूप राहा!” अध्यक्ष टेबलवर हात मारंत म्हणतो.
आणि पूर्ण शांतता पसरते.
“एक पर्याय आहे,” अध्यक्ष म्हणतो. “कपितोनवला कार्यकारिणीतून बाहेर न काढतां, कार्यकारिणीची त्याची सदस्यता तोपर्यंत निलम्बित ठेवावी, जोपर्यंत ह्या दुर्दैवी घटनेचा तपास सगळ्याच दृष्टिकोनांतून पूर्ण नाही होत, ज्यांत हेपण निहित आहे, की आपल्या सहयोग्याने ह्या प्रोफेशनमधून निघून जाण्याची घोषणा केलेली होती, त्याबद्दल योग्य वेळेवर आपण आपलं मत प्रदर्शित करूं शकू. माझ्यामते हा फारंच चांगला पर्याय आहे. आपण ह्यावर लगेच मतदान करून घेऊं. जणु, आपण आपल्या सहयोग्याला कोष्ठकांच्या बाहेर काढून आणू.”
“असं नाही, तर ह्याचा उलंट,” आपल्या जागेवरून कोणीतरी दुरुस्त करतो, “कोष्ठकांमधे बंद करून टाकूं.”
“पण आपण त्याला बाहेर नाही काढणार!” अध्यक्ष आपल्या आवाजांत जास्तीत जास्त गांभीर्य आणंत विवाद आटोपायचा प्रयत्न करतो.
पण नेक्रोमैन्सर मधेच टपकतो:
“कोष्ठकांमधे तर ह्याला ठेवायला पाहिजे!” तो ईवेन्ट्स-आर्किटेक्टकडे तर्जनीने खूण करंत म्हणतो. “की तो काही कामाचा नाहीये? आणि, जर तो काही कामाचा नाहीये, तर तो इथे काय करतोय?”
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट लाल होऊन ताणलेल्या तर्जनीच्या दिशेने फुफकारतो:
“आणि तू स्वतः तर...आणि तू त्याला जिवंत कर...कर जिवंत!...आम्हीं पण बघूं की कसा जिवंत करतोस.”
“मी तर तयार आहे! मला करूंच नाही देत आहेत!”
“ह्या पागलांना इथून काढून टाका!” शेवटच्या रांगांमधून लोक ओरडले.
“इथे कुणी पागल नाहीये!”
“प्लीज़, अपमान नका करूं!”
“बस! बस! बस! मी प्रस्ताव मतदानासाठी ठेवतोय! कोण ह्याच्या पक्षांत आहे, की कोष्ठकांतून बाहेर काढावं? कोण विरोधांत आहे? कोण काहीच नाही म्हणंत आहे?”
अधिकांश लोकांनी ह्याच्या’ – “कोष्ठकांतून बाहेर”च्या – पक्षांत मत दिलं.
अध्यक्षाने सगळ्यांचं अभिनंदन केलं. सगळे लोक उठतात आणि बाहेर जातात. कारण की त्यांना माहीत आहे, की कुठे जायचंय.

20.01

कपितोनव सगळ्यांच्या निघायची वाट पाहतो, - क्लोकरूममधे त्यांच्या डोळ्यांत खुपायची इच्छा नाहीये. भर्त्सनेच्या आणि सहानुभूतिच्या नजरांकडे दुर्लक्ष करंत आपल्या समोर बघतोय. ह्यापण, आणि त्यापण – आहेत तर खरं, पण त्यांना कितपत महत्व द्यायचंय, हा एक मोठा प्रश्न आहे, कारण की ज्याच्यावर त्या रोखल्या आहेत, तो त्यांच्याकडे लक्षंच नाही देत आहे, तसं जवळून जाताना काहीतरी बडबडून तर जातंच आहेत: ज्युपिटेर्स्कीच्या पार्टीचे अशुभचिंतक लोक त्याच्यावर कठोर दृष्टि टाकतांत, किंवा फक्त तोंड फिरवून घेतांत; आणि श्याम-वनच्या पार्टीचे सहयोगी, त्यांना सोडून, जे कपितोनवला तलावच्या मृत्युसाठी जवाबदार ठरवतांत आहेत (आपल्यांमधे सुद्धां असे काही लोक आहेत), जे जर कपितोनवशी दृष्टिभेट झाली असती, तर त्याच्याकडे मान हालवून अभिवादन करायला किंवा बोटांने विक्टरीची खूण करायला तत्पर आहेत.
थोडक्यांत, तो वाट बघतो, ते निघून जातांत.
फक्त नीनेल त्याच्याजवळ आली:
“तुम्हीं फार संयम दाखवला.”
हो, आणि कॉन्फ्रेन्सचा अध्यक्षपण, जो कामाचे कागदपत्र संभाळण्यांत इतरांपेक्षा मागे राहिला होता, आपली ब्रीफकेस घेऊन त्याच्याजवळ येतो. हो, महाशय नेक्रोमैन्सरलापण यावसं वाटंत होतं, कारण की तो आपल्या जागेवर उभा आहे, आणि हॉलमधून बाहेर नाही जात आहे.
“माझ्या सामर्थ्यांत जेवढं होतं, ते सगळं मी केलं,” अध्यक्ष म्हणतो. “परिस्थिति अत्यंत वाईटपण होऊं शकली असती. पुन्हां कधीही घाईगर्दींत कोणची घोषणा नका करूं.”
कदाचित त्याला आभार प्रदर्शन करणा-या शब्दांची अपेक्षा होती. कपितोनव चूप राहातो.
“आणि, जे मी तेव्हां कोष्ठकांबद्दल बोललो होतो, त्याच्यावर लक्ष देऊं नका,” अध्यक्ष सल्ला देतो आणि, आपल्या पाठीच्यामागे, जवळ येत असलेल्या नेक्रोमैन्सरला अनुभवंत, तो आपल्या जागेवरंच इकडे-तिकडे हलूं लागतो, ज्याने नेक्रोमैन्सर पाठीच्या मागे नाही राहाणार. “कोष्ठक – एक प्रतीक आहे...”
“पण धनु-कोष्ठक नाही!” पुढे येताना नेक्रोमैन्सर म्हणतो.

आता

20.07

कपितोनव बसला नाहीये, तर उठून उभा राहिला आहे. त्याला, किंवा आणखी कुणालाही नेक्रोमैन्सरकडून कोणत्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती. पण, ते जे नेक्रोमैन्सरने केलं, त्याने कोणालाही धक्काच बसला असता.
त्याने कपितोनवच्या खांद्याचा मुका घेतला, वळला आणि शीघ्रतेने हॉलच्या बाहेर निघून गेला.
कपितोनवचा जणु जीव गुदमरू लागला, पण अध्यक्ष आणि नीनेलने असं दाखवलं, की नेक्रोमैन्सरच्या वागण्याकडे त्यांचं लक्षंच नव्हतं.
“तुम्हीं फार धीराने वागलांत,” अजूनपर्यंत दाराकडे बघंत नीनेलने त्याची तारीफ करंत म्हटलं, “ठाम राहिले आणि ठाम राहा. मी तुमची प्रशंसक आहे.”
ती त्याचा हात धरते.
“बैन्क्वेटला (भोज) जायची वेळ झाली आहे.”
“मी? बैन्क्वेटला?” कपितोनवच्या तोंडातून उद्गार निघतो.
“नाही, हे बैन्क्वेट नसणार,” नेक्रोमैन्सरच्या अनुपस्थितीने प्रसन्न होऊन अध्यक्ष म्हणतो. “हे आणखी काही असेल. मेमोरियल-ईवनिंग असेल. फ्यूनरल-फीस्ट.” 
“चला, कपितोनव.”
“प्लीज़, मला सोडून द्या.” तो तिच्या हातांतून हात परंत खेचतो. “प्रेत अजून उचललेलं नाहीये, आणि तुम्हीं लोक बैन्क्वेटला जाण्यासाठी तयार झालेत.”
“जर तलावजिवन्त असता, तर तोसुद्धां आपल्या बरोबर आला असता,” अध्यक्ष म्हणतो. “तर, अशा प्रकारे आपण त्याला श्रद्धांजलि वाहंत आहो – सगळे मिळून, माणसांसारखे. सम्पूर्ण इन्डस्ट्री. प्रेत...प्रेतांत काय आहे? प्रेत आपल्या शिवाय घेऊन जातील.”
“तुम्हीं माझ्याशी असं कां वागताय?” नीनेलला कळंत नाही. “तुम्हीं बिल्कुल असे नाहीये, तुम्हीं फार सभ्य, फार चांगले आहांत.”                     
“तुम्हांला खरंच असं वाटतंय का, की मी मेमोरियल ईवनिंगमधे येईन?” कपितोनव त्यांच्यापासून दूर सरकतो.
“म्हणतांय काय?” अध्यक्ष त्याला थांबवतो, “उलंट तुमच्या शिवाय तर ह्या मेमोरियल-ईवनिंगची कल्पनाच नाही करूं शकंत! कुणा दुस-याशिवाय तर समजूं शकतो, पण तुमच्या शिवाय नाही. शेवटी, तुम्हीं इथे तलावमुळेच आहांत ना? त्यानेचं तुम्हांला नव्हतं का शोधलं? जायला हवं. जर नाही जाणार, तर चांगलं नाही दिसणार, चूकंच होईल. लोकांना वाटेल की तुम्हीं गुन्ह्याच्या ओझ्याखाली वैतागले आहांत, म्हणजे, तुम्हीं गुन्हेगार आहांत. किंवा, ह्याच्यापेक्षांही वाईट असं वाटेल, की तुम्हीं ह्या फुकटच्या गोंधळामुळे रुसले आहांत, आणि खरंच हा फुकटचांच आहे!...पण तुम्हीं तर ह्या गोंधळापासून वर आहांत? आमच्या षडयंत्रांहून वर. आणि महत्वाचा सल्ला, स्वतःला मारेकरी नका समजू. तुम्हीं मारेकरी नाहीं, नाहीये ना?”
“ऐका, मी काहीही नव्हतं केलं. मला माहीत नव्हतं, की त्याने 99 ही संख्या धरली आहे. आणि जर माहीत असतं तर? त्यांत असं काय आहे? नाही. मी तुम्हांला सांगेन. मला आठवतंय. कुणीही आजपर्यंत...ऐकतांय न?...आज पर्यंत कुणीही, कधीही 99ची संख्या मनांत धरली नव्हती. आश्चर्याची गोष्ट आहे. पण आहे असंच!”
“मीपण त्याबद्दलंच म्हणतोय, थोडाच वेळ थांबा, आणि मग निघून या. बस, फक्त गेलं आणि आलंच पाहिजे. वरून हे आयोजन तुमच्या हॉटेलमधेचतर होतंय. तुम्हीं तसेही तिथेच चाललांय ना? फायरप्लेस असलेल्या हॉलमधे पोहोचा, काही वेळ थांबा आणि निघून जा.”
“पोहोचू आणि निघून येऊं, कपितोनव,” नीनेल म्हणते. “पोहोचूं आणि निघून येऊं.”

20.21

“कपितिनव, मूर्खपणा करूं नकोस,” क्लोक-रूममधे त्याला म्हणते.
त्याच्या आधीच कोटाची बटन्स बंद केली, हातमोजे चढवले, आणि तो आठवूंच नाही शकला, की दुसरा हातमोजा कुठे आहे: दोन्हीं डाव्या खिशांतंच होते.
सी-9’पासून हॉटेल पर्यंत, कपितोनव अजून विसरला नव्हता, खूपंच जवळ आहे. अध्यक्षतर बाहेर निघाल्याबरोबर सरळ धावला, ज्याने की, जसं त्याने सांगितलं होतं, परिस्थितीवर नजर ठेवता येईल, - सगळे लोक रेस्टॉरेन्टमधे जमलेयंत, फक्त ह्या दोघांना सोडून: कपितोनवला तिथे जायचं नाहीये आणि तिथे तो ह्यासाठी खेचला जातोय, कारण की नीनेल त्याला खेचून नेत आहे.
त्याचा हात धरून आत्मविश्वासाने नेतेय.
कपितोनवच्या डोक्यांत शेवटचा श्वास सोडंत असलेला फ़ेरो ख़ुफू32 झळकला.
पीटरबुर्गचा हिवाळा आइसिकल्स आणि कडक जमलेल्या बर्फामुळे मस्त वाटतो. ह्या रस्त्यावर कडक, जमलेला बर्फ आइसिकल्सपेक्षां जास्त भयानक आहे.
जराही वाकडा-तिकडा पाय पडला – आणि एकतर मान मोडेल, किंवा कम्बरेचं हाड मोडेल.
“बायका, कपितोनव, फार मोठ्या चेटकिणी असतांत,” नीनेल म्हणते. “स्टेजवर नाही, तिथेतर पुरुषांचं राज्य चालतं, तर जीवनांत, दैनंदिन जीवनांत...हो आणि स्वप्नांतसुद्धां!...जीवन आम्हालां भाग पाडते लबाडी करायला, संख्या बनवण्याला, साध्या-सरळ लोकांना रहस्यमय बनवायला. आता वयाचंच घ्या नं. तुम्हांला काय वाटतं, माझं वय किती असेल?”
“मी ह्याबद्दल विचार नाही करंत आहे,” चालताना – पुढे जाताना (कधी इकडे, कधी तिकडे पाई चालणारे पडतांत आहे) कपितोनव उत्तर देतो.
“कां नाहीं विचार करंत? तुम्हीं विचार करा! विचार करायला त्रास होतोय कां? चला, विचार करा, विचार करा, माझं वय किती आहे?”
कपितोनवच्या डोक्यांत, अचानक, आपणहूनंच, डोक्याच्या मालकाच्या इच्छेवर अवलम्बून न राहून, 36चा अंक येतो. पण जिथे स्वतः कपितोनवचा प्रश्न आहे, तो चूपंच राहतो.
“तुम्हीं विचार केला : 36! फैन्टास्टिक, कपितोनव, मी तुमच्या प्रेमांत पडायला तयार आहे, पण, नाही, घाबरूं नका, कोणत्याही परिस्थितीत मी असं करणार नाही!”
“तुम्हांला कसं माहीत, की मी काय विचार केला होता?”
“मी तुमचा विचार ओळखला! विश्वास करा, हे कठिण नाहीये! तुम्हांला माझा जादू आवडला कां? जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हांला त्याचं रहस्य सांगून टाकू?”
कपितोनव उत्तर नाही देत.
“कपितोनव, हे अगदी एलिमेन्ट्री आहे! मी अगदी आपल्या वयाचीच दिसते.”
आणि तिला जणु संक्रामक हास्याने पछाडलं, पण इतकं संक्रामक सुद्धां नाही, की कपितोनवला संक्रमित करेल. तो चूपंच आहे. तसेच चालतात.
“कपितोनव, तुम्हांला काय झालंय? शुद्धीवर या! मी नीनेल पिरोगोवा आहे. आठवलं? मी ट्रिक्स-डाइरेक्टर आहे. आणि तुम्हीं खूब वीर आहांत. तुम्हीं अत्यंत संयमाने वागलांत. पण, जर तुम्हीं ट्रिकला नकार दिला, तर मी तुमच्यासाठी ट्रिकचं आयोजन कसं करेन?”
“नीनेल,” कपितोनव म्हणतो, “पण हे खरंच असंच आहे: तो पहिला होता, ज्याने 99चा अंक मनांत धरला होता. आशा करतो, की तो शेवटचापण असेल.”
“आह!” ती घसरते, पण त्याच्या आधाराने, आपल्या जागेवर जमून राहते.
“बघा,” कपितोनव म्हणतो. “तिकडे नेक्रोमैन्सर जातो आहे. तो जवळ-जवळ पडलांच होता.”
“म्हणजे, असं करायला हवं. चालंत राहा, चालंत राहा. जर पाय नेताहेत, तर ह्याचा अर्थ असा आहे, की चालायला पाहिजे.”
“पाय पण नेत नाहीयेत, आणि डोक्याची पण इच्छा नाहीये!: कपितोनव तक्रारीच्या सुरांत म्हणतो.
“आणि, काय त्याची इच्छा होती? त्याला मरायचं होतं कां? तुम्हीं त्याला विचारलं नाही?”

20.38

“तुम्हीं आत जा, मी नाही जाणार.”
“पुन्हां तेच? लगेच थांबवा! तुम्हीं मला चीड आणतांय.”
हॉलमधे – चौकीदार आहे, त्याला बघून सांगणं कठीण होतं की तो खरोखरचा सिक्यूरिटी-ऑफिसर आहे, की फक्त दाखवण्यासाठी कोणालाही तिथे उभं केलं होतं.
“शोक-सभेचे आपले-आपले आयोजन असतात,” नीनेल समजावते, “परिस्थितीकडे बघता, इथे आपला माणूस असायला हवा होता. कदाचित, माझ्या पर्समधे एखादा ग्रेनेड असेल, तुमच्या बाहींत – हेरोइनचं पाकिट असेल. पण ही गम्मत करायची वेळ नाहीये.”
रेस्टॉरेन्टच्या क्लोक-रूमचा कर्मचारी इतर सफाई कर्मचा-यांसारखा वाटतोय. कदाचित, त्याला निर्देश दिलेला होता, की शोक-सभा होणार आहे.
हॉलच्या काचेच्या दारापुढे थांबतात.
“बरोबरंच आत जाऊ. लोकांना दिसू दे, की तुम्हीं एकटे नाहीये.”
आंत आले. U-आकाराचं टेबल. बाटल्या, खाण्या-पिण्याची सामग्री. खुर्च्या बाहेर ओढलेल्या. फायरप्लेसमधे आग जळतेय. सगळे लोक भिंतीला लागून उभे आहेत, आपला चुपचाप चाललेला कार्यकलाप सोडून नीनेल पिरोगोवा आणि कपितोनवकडे वळून बघतांत.
कपितोनव आणि नीनेल पिरोगोवा थांबतात, कारण की आत शिरल्यावर थोडा वेळ थांबायचंच असतं. त्यांना दुस-यांशी काही घेणं-देणं नाहीये, आणि दुसरेपण, नीनेल पिरोगोवा आणि कपितोनवकडे नजर टाकून आपापल्या गुपचुप कारभाराला लागले, खरंतर, हे एकंच काम होतं : अपरिहार्याची वाट बघणं.           
आतां काही लोक, जसं, कदाचित, आधीपासूनंच करंत होते, दोन-दोन किंवा तीन-तीनच्या गटांमधे आरामांत गोष्टी करू लागतात. बाकीचे लोक एक-एकटे उभे आहेत. माइक्रोमैजिशियन झ्दानोव, हॉलमधे फिरंत आगपेटीच्या काड्यांची जादू दाखवतो (तलावने नक्कीच तारीफ केली असती). महाशय नेक्रोमैन्सर पाठीच्यामागे हात बांधून बोत्तिचेल्ली33-शैलींत बनवलेलं मोट्ठं पैनल बघतो आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट – बाजू-बाजूने – चुपचाप इतक्यांतच आलेल्या माणसांजवळ पोहोचतो. नजरेनेच नीनेलला साक्षीदार व्हायची विनंती करतो, कपितोनवला जोरांत कुजबुजंत विचारतो:
“माझी इच्छा आहे, की तुम्हांला हे कळावं. नेक्रोमैन्सरने सगळ्यांच्या समोर माझ्यावर आरोप लावला आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हीं मला समजून घ्यावे आणि माझ्यावर दोषारोपण करूं नये. सैद्धांतिक रूपांत, मी जवळच्या ठिकाणांवर काम नाही करंत. तुम्हीं मैथेमेटिशियन आहांत, तुम्हांला कदाचित आईन्स्टीनचं समीकरण लक्षांत असेल - e=mc2 नाही, दुसरं – कॉस्मोलॉजिकल स्थिरांकाचं. त्यांत त्याचा रिक्की टेन्सरशी (गणिताशी संबंधित - अनु.) गुणाकार करण्यांत येतो, तुम्हांला माहीतंच आहे, अत्यंत लहान संख्या, जवळ-जवळ – शून्यंच, पण जास्त अंतरावर असे परिणाम देते!...पण, फक्त फार-फार दूरच्या अंतरावरंच! कमी अंतरावर बिल्कुलंच नाही!...माझ्याशी सम्पूर्ण साम्य आहे. मी एखाद्या काळ्या ऊर्जेसारखा आहे, समजतांय नं? मी माइक्रोइफेक्ट देऊं शकतो. ...तो सुद्धां अत्यंत दूर असलेला...सेन्ट्रल अफ्रीकेत होत असलेल्या घटनांवर प्रभाव टाकूं शकतो...आणि न केवळ शकतो – तर प्रभाव टाकतो!...आणि भयंकर प्रभाव टाकतो – अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकांवर, पण तलाववर मी, सिद्धांततः, प्रभाव टाकण्यास समर्थ नव्हतो, जरी माझी इच्छा असती, तरीही – तो – जवळ होता, तो इथे होता. आणि एखादी वस्तू जितकी दूर असेल, तिच्यावर माझा प्रभाव तितकांच गंभीर होतो...”
नीनेलने तेवढ्यांत जोराने कुजबुजंत तर्क केला:
“तुमचं म्हणणं समजलंय. आता गप्प व्हा.”
थोडा वेळ गप्प राहून ईवेन्ट्स-आर्किटेक्ट पुन्हां आपलं म्हणणं चालू ठेवतो:
“आणि हा माझ्याशी नेहमी खार कां खातो? त्यालातर चांगलंच माहीत आहे, की मी फक्त दुरूनंच काम करतो... त्याला फक्त माझ्या आयामाचा, विस्ताराचा हेवा वाटतो...तो स्वतःपण, माझ्याचसारखा, फक्त फार लांबून...तुम्हांला वाटतं, की तो सरळ इथेंच करूं शकतो...आपल्या जागेवरून न हालतां? कां नाहीं! हा फक्त बढाईखोरपणा आहे!...मला तर त्याची सीमारेषा आणि योग्यता माहीत आहे, मला सांगायची गरज नाही...हे, त्या ग्रोबोवोयने त्याला डोक्यावर बसवलंय...ग्रोबोवोय आठवतो? तीच सिस्टम, तीच पद्धंत...जसे तुम्हीं मॉस्कोत कुणी ऑफिसर आहांत आणि तुम्हीं मेले आहांत, आणि तुम्हांला दूर कुठे फिलीपीन्समधे प्रमाणित करण्यांत येतं – एका स्थानीय भटक्याच्या रूपांत...तुम्हांला कधीही आठवणार नाही, की तुम्हीं मॉस्कोमधे ऑफिसर होते...”
“कृपा करून, लगेच थांबवा,” नीनेल फुफकारते. “कपितोनव तुमचं म्हणणं ऐकंत नाहीये.”
“हो, हो, इथे तुम्हीं प्राचीन, दुर्लभ वस्तूंचा व्यापार करंत होता, पण आता कुठे बांग्लादेशांत कासव पकडता...आणि, लक्षांत ठेवा, त्याचा दर्जा नेहमीच कमी असतो. मला कळतं, की प्रत्येकाला जगावसं वाटतं. पण मी असं नाही करंत. मी उद्देश्यपूर्वक, सम्पूर्ण एकाग्रतेने करतो. ब्राजीलमधे अकरा लोक कारागृहातून पळून गेले...त्याच्यासाठी काय तुम्हीं मला कोर्टांत खेचाल? पण, माझे स्वतःचे सिद्धांत, स्वतःच्या काही मान्यता आहेत...न्यायाबद्दल स्वतःच्या कल्पना आहे...”
नीनेल एक-एक शब्द सांभाळून उच्चारते:
“निघून जा. पीछे मुड – एक पाऊल पुढे – मार्च.”
तो चालला जातो, पण लगेच परंत येतो.
“मी, निःसंदेह, अद्वितीय आहे, कुणीही असं नाही करूं शकंत, जसं मी करतो, पण मला प्रोफेशनल म्हणणं बरोबर आहे कां? आपल्या कामासाठी मी कुणाकडूनही एकसुद्धां कोपेक नाही घेतला. मी इथे कशाला आहे? तुमच्यांत उपरा आहे. पण, जर मी नसतो, तर जगांत सगळंच आणखी वेगळ्या प्रकाराने झालं असतं.”
वळतो आणि हॉलच्या शेवटच्या टोकाकडे जातो.
तलावचा भाऊ इथे आहे,” नीनेल पिरोगोवा म्हणते, “आणि तुम्हांला ते नको होतं.”
तलावच्या भावाच्या हातांत कैप-पिशवी आहे.
हेरा-फेरी, उठाइगिरी करणारा किनीकिन लक्षपूर्वक टेबलाकडे बघतो आहे.
फ्रेममधे ठेवलेल्या तलावबरोबर दोन माइक्रोमैजिशियन्स आत येतांत. फोटो आजंच काढला होता. जेव्हां तलावभाषण देत होता.
श्याम-वन आणि ज्युपिटेर्स्की आणणा-यांच्या हातांतून पोर्ट्रेट घेतांत आणि फायरप्लेसच्या वरच्या शेल्फवर ठेवतांत.
ह्या कृतीला सगळे सलोख्याचा संकेत समजले.
ह्याचीच वाट बघंत होते.
“कृपा करून टेबलाशी या, महाशय, उभं राहण्यांत काही अर्थ नाहीये,” अध्यक्ष म्हणतो.
सगळे बसतांत.
“तुम्हांला तिकडे,” माइक्रोमैजिशियन बिल्देर्लिंग कपितोनवला म्हणतो. “तिथे कार्यकारिणीचे सदस्य आहेत.”
“तो कोष्ठकांच्या बाहेर आहे,” त्याचा शेजारी, हेरा-फेरीवाला इवानेन्को मधेंच टपकतो. “जर हे खरं नसेल, तर माफ करा,” तो कपितोनवला म्हणतो.
कुठेतरी बसले.
अध्यक्ष उठला.

21.06
“महाशय. सहकारीगण. मित्रांनो. माणूस बरंच काही ठरवतो, पण होतं तेच, जे देवाला मंजूर आहे. काही वेळा पूर्वी मी विचार करंत होतो, की काहीतरी बोलेन, अजूनही बोलेन, दुस-याच कशाबद्दल, ना की त्याबद्दल. मी विचार केला होता, की आपल्या, कदाचित अत्यंत लहान भासणा-या, पण, खरं म्हणजे, आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या, विजयाबद्दल, आणि स्वतःवर मिळवलेल्या विजयाबद्दल बोलेन, त्याबद्दल की शत्रूंनी कितीही अडथळे आणले, तरी आपल्या गिल्डची कॉन्फ़्रेन्स सम्पन्न झाली, आणि त्याबद्दल, की हे अशक्यंच होतं, की तिची मीटिंग होणार नाही, तिची स्थापना होणार नाही, तिची रचना होणार नाही...ती अस्तित्वात न यावी!...कारण की हीच इच्छा होती, आपली स्वतःची. मी विचार केला होता, की त्याबद्दल बोलेन, की आपला प्रमुख शत्रू आपल्यांतच आहे आणि त्याचं नाव आहे – आपल्याच शक्तीवर आणि आपल्याच शक्यतेवर अविश्वास. गिल्डच्या स्थापनेच्या मुहूर्तावर तुमचं अभिनंदन करताना, मी विचार केला होता, की ह्याबद्दलसुद्धां बोलेन, की आज, जेव्हां शेवटी आपल्याला संगठित होण्याची संधी मिळाली आहे, आपल्या विचारधारा आणि मान्यता विभिन्न असूनही, कोणालाही, कोणालाही आपल्या एकटेपणाला, निराधारपणाला घाबरण्याची गरंज नाहीये, कारण की आता आपण सगळे एकत्र आहोंत, जसे पूर्वी कधीही नव्हतो, - बस, ह्याबद्दलंच मी बोलणार होतो, आणि, कदाचित, थोड्या वेळाने, वेगळ्या शब्दांत, आणखी काहीपण म्हणेन. पण सध्यां, मला हे म्हणायला नको. वलेन्तीन ल्वोविच तलावआज स्वर्गवासी झालेत, जसं तुम्हांला माहीत आहे, आणि, त्याने स्वतःने नाही, तर त्याच्यासाठी लोकांनी म्हटलं, शेवटच्या क्षणापर्यंत तो आपलं कर्तव्य करंत होता, चिर स्मृति.              
  जोराने खुर्च्या सरकवंत सगळे लोक उठले, आणि सगळ्यांबरोबर – कपितोनवसुद्धां. पितांत आणि, एकही शब्द न बोलता, डोळे झुकवून, टेबलाच्या चारीकडे आपापल्या जागेवर बसतात. सैलेडकडे, खाण्या-पिण्याच्या व्यंजनांकडे हात वाढले. कपितोनव अर्धा मिनिट रिकाम्या प्लेटकडे बघंत राहिला, मग, मांसाच्या थण्डगार स्लाइसेसच्या प्लेटकडे नजर टाकंत, जणु तिलाच काही सांगायचंय, शांतता भंग करतो: “त्याच्या आत्म्याला शांति मिळो. वेळ झाली. गुड बाय.”
तो हॉलमधून बाहेर निघतो.
जिन्यावर नीनेल त्याला पकडते.
“तुम्हांला असं वाटलं कां, की मी तुम्हांला एकटं जाऊं देईन?”
“माफ करा,” कपितोनव म्हणतो, “मला टॉयलेटला जायचंय.”

21.27

त्याला टॉयलेटला नाही जायचंय, पण जेव्हां आत घुसलाच, तर तो यूरिनल्सकडे जातो.
आता स्वतःला परिस्थितीजन्य प्रक्रियेच्या स्वाधीन करायचंय.
तो करतो.
यूरिनल्सच्यावर टांगलेल्या दोन तक्त्यांकडे न बघणं अशक्य आहे. एकावर जाहिरात आहे आरशांची, दुसरीवर प्रोस्टेटाइटिससाठी औषधाचं नाव लिहिलंय,
नेहमीसारखा सिंककडे जातो, पाणी चालू करतो आणि आरशांत स्वतःला बघतो.
गोंधळतो.
त्याच्याकडे बघतोय – नाही, हा परका चेहरा नाहीये.
असं नाहीये. तर असंच आहे. – जर ह्या गोंधळाकडे त्याला बनवणा-या तिन्हीं घटकांना जोडून बघता आलं असतं, तर ते काळाच्या क्रमबद्ध अंतराळाच्या अनुरूपंच प्रतीत झाले असते, - पहिल्या क्षणाला तो स्वतःला बघतो. दुस-यांत, हृदयाच्या धडधडीच्या समानुपातांत, - समजतोय, की तो – तो नाहीये. तिस-या क्षणांत – की तो (कारण की, निःसंदेह, तोच आहे), पण ह्या क्षणी त्याला ते कळलंय, ज्याने त्याला गोंधळांत टाकलं होतं.
चष्मा!
त्याने कधीही चष्मा लावला नव्हता.
त्याच्या चेह-यावर चष्मा होता, आणि चष्मा बिनकाचांचा.
तो आपल्या नाकावरून त्याला खेचतो आणि फरशीवर आपटतो.
चष्मा उसळतो आणि निळ्या टाईल्सवरून घसरंत – थांबतो आणि रिकाम्या दृष्टीने त्याच्या गुडघ्यांकडे बघूं लागतो.
तो पायांनी तिला – बिनकाचांच्या फ्रेमला – चिरडतो. आणि जेव्हां तो नाकाच्या दांडीवर तुटतो, तेव्हां पायाच्या धक्क्याने पहिल्या अर्ध्या भागाला क्यूबिकलमधे ढकलतो – आणि दृष्टीआड करतो आणि दुस-याला – दुस-या क्यूबिकलमधे.
अचानक असा भास होतो, की क्यूबिकल्समधे कोणीतरी आहे आणि त्याच्यावर नजर ठेवून आहे.
फक्त उपस्थितंच नाहीये, तर त्याच्यावर नजरसुद्धां ठेवून आहे.
सगळे मिळून चार क्यूबिकल्स आहेत, आणि तो प्रत्येकाला उघडतो.
कोणी नाहीये. कोणीच नाही.
कपितोनवला मूखिनची भीति आठवते (पण काय, ती भीति होती?). म्हणजे, तेव्हां, जेव्हां त्याला पहिल्यांदा लक्षांत आलं की त्याच्या प्रत्येक हालचालीवर निरंतर तीक्ष्ण नजर ठेवली जात आहे.   
तो चेहरा धुतो.
आणि बाहेर निघतो.
“मी काय चष्मा लावला होता? माझ्या चेह-यावर चष्मा होता कां?”
“माय गॉड, काय झालं?”
“मी विचारतोय, माझ्या चेह-यावर चष्मा होता कां?”
“बिल्कुल होता – चष्मा.”
“बिन काचांचा?”
“बिन काचांचा कां?”
“कारण की माझी नजर चांगली आहे. मी चष्मा लावतंच नाही!”
“तू दिवसभर चष्म्यांत होता.” 
“दिवसभर चष्म्यांत? तू मला सकाळी बघितलं होतं?”
“मी तुला लंचच्या आधी पाहिलं होतं. तू चष्मा लावला होता. आणि त्यानंतर, जेव्हां तुझ्या हनुवटीची जखम पुसंत होते. माझ्या मनांत विचारसुद्धां आला: चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन पडलं होतं, पण चष्म्याला काहीही झालं नाही. घाबरूं नकोस, तू चांगलाच दिसतो – चष्म्यांतपण आणि बिनचष्म्याचापण. ऐक, तुझे ओठ निर्जीव वाटतांत आहेत...हे सगळं थांबव, शुद्धीवर ये, कपितोनव.”

21.43
“”स्वर्गातील क्षेत्रांनो, तो किती गोड किसकरतो, कपितोनव!”
“कोण?”
“तू, कपितोनव! मी तुझ्याबद्दल बोलतेय!”    
त्याने तिच्या किसला बस, झिडकारलंच नव्हतं – जेव्हां ती लिफ्टमधे त्याला बिलगली होती – ओठांसकट सम्पूर्ण अंगानिशी. त्याला वाटलं की तो तिला प्रतिसाद देतोय.
आणि पुन्हां प्रतिसाद देतो.
लिफ्टची दारं आपली कसरत करंत राहतात उघडले – बंद झाले’. तिस-या प्रयत्नांत दोघं बाहेर निघतात.

21.48

“…कपितोनव, तुला खरंच असं वाटतंय का, की अश्या वेळेस मी तुला सोडून देईन?...तेव्हां, जेव्हां सगळ्यांनी तुला वाळींत टाकलं आहे?...मी तशी नाहीये...मी बघतेय की तुला कशाची गरंज आहे...तुला बाईची गरंज आहे, तुला उष्णतेची गरंज आहे, तुला आपल्या विलक्षण जादूसाठी डाइरेक्टरची गरंज आहे!...मी ठरवलंय : तू चांदीसारख्या चमचमत्या सूटमधे आपला कार्यक्रम प्रस्तुत करशील...नाही? कां?...तुला आपली किंमत कळतंच नाहीये...तुझा स्वाभिमान ढासळलाय...कपितोनव, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू एकदम दोन-दोन दोन अंकांच्या संख्या ओळखूं शकतो!...आणि चारसुद्धा!...आणि आठसुद्धां!...
“...आणि फक्त एका नजरेने कुलूप उघडणं?...खोटं, तू करू शकतोस! चल, प्लीज़ – नजरेने! फक्त नजरेने...चल, त्याच्याकडे बघ, चल ना, प्लीज़...इथे पाठीवर...
“...व्वा! उघडला!...तू! फक्त तू!...नाही, ते स्वतः नाही उघडलं!...स्वतःचा काय अर्थ आहे? आणि मीपण नाही!...कपितोनव, पुरे कर, माझा अपमान करायची गरंज नाहीये! तू नजरेनेच उघडूं शकतो!...ही तुझी जादू आहे! माझी नाही!...सीक्रेट जाणून घ्यायचं नाहीये...
“...स्वर्गीय क्षेत्रांनो, आह, शांत-प्रकृतिचे लोक मला कित्ती आवडतांत! मला तुझ्यासमोर कबूल करावं लागेल, कपितोनव...मी कधीही, कुणालाही ह्याबद्दल सांगितलेलं नाहीये...माझा कधीही तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी संबंध नाही आला...प्रामाणिकपणे!...मी नेहमी, अशा, तुझ्यासारख्या पुरुषाचं स्वप्न बघंत होते, कपितोनव!...
“...कपितोनव! तू – बुद्धि आहे, तू – शक्ति आहे. तू – सामर्थ्य आहे. तू – पायथन (अजगर-अनु.)आहे.
“...कपितोनव, आपण कुठे आहोत?...मला कळंत नाहीये, तू मला आपल्या हॉटेलच्या खोलींत घेऊन आलास?
“...कपितोनव, मी, फक्त, तुला आधीच सांगून ठेवते...मी ओरडेन...परवानगी आहे?...तू घाबरंततर नाहीयेस ना की मी तुला लफड्यांत ओढेन?”

..... ...... ......

जेव्हां ती आपल्या पायांचा त्याच्याभोवती वेढा घालते, जवळ-जवळ त्याला आपल्या आत दाबंत, आणि आधी गुरगुरते, मग ओरडते : कपितोनव!”, तो आपल्या विचारांवर परंत येतो. तो कपितोनवंच आहे कां, की दुसरा कुणी आहे, ज्याने कपितोनवला प्रतिस्थापित केलंय?
ह्याच्या आधी इतक्या कळकळीने त्याला कुणीही ठासून नव्हतं सांगितलं, की तो कपितोनव आहे, आणि ह्याच्या आधी, त्याच्या मनांत ही शंकापण कधीही उद्भवली नव्हती.
काळे केस एखाद्या डागासारखे विखुरले होते. कुठे ही मेदूसा34 गॉर्गोन तर नाही? ‘गॉड्स, सेव मी, - मेदूसा गॉर्गोनच्या सुंदरतेचा आकस्मिक विचार कपितोनवच्या मनांत रुतला! तिच्या सौंदर्याची कुणी ग्वाही दिली असती, जर सगळ्या पाहणा-यांचा मृत्यु होत होता, आणि, तो, जो सुखरूप वाचला होता, बिनाकिल्ल्याचा, काय नाव होतं त्याचं...हर्क्युलस, नाही...पेर्सेई...तोपण दयनीय प्रतिबिम्बाशिवाय काय बघूं शकला होता?...
[बस, तो त्याला आधीच हरवून बसला होता (कपितोनव- आकस्मिक विचाराला).]           
तिच्या कानांत मोठे-मोठे इयर-रिंग्स आहेत – पातळ, चौडे, लेससारख्या प्लेट्स असलेले, अल्टारच्या दाराची आठवण देणारे. हे इयर-रिंग्स आहेत कां? कवचाचे उरले-सुरले तुकडे – पोषाकाची शेवटची वस्तू, जी तिच्या शरीरावर शिल्लक होती.
“क-पि-तो-नव!...क-पि-तो-नव!...” जणु ती घाबरतेय की पूर्ण नाही तरी कपितोनवच्या अस्तित्वाचा एक भाग हरवून जाईल – का, किंवा, पि, किंवा तो, किंवा नव.  
कपितोनव, फक्त असंच, दुस-या प्रकाराने नाही.

........ ......... .......

ह्यानंतर त्याला असं वाटतं, की हीच शांतता आहे – ती, जिला ऐकावं, ती खरं म्हणजे साधारण प्रकारच्या बारीक आवाजांनी ओथंबलेली आहे – खिडकीच्या पलिकडची, दाराच्या पलिकडची आणि बस, ह्यांच खोल्यांची : कुठे श्च्श्च्श्श्च, कुठे प्त्स्क, कुठे करकर, कुठे ब्रूम, कुठे टाक-टिक-टाक-टिक, कुठे “तिसरा, तुला सांगतेय” (कॉरीडोरच्या शेवटी).
एक दुस-याच्या बाजूला झोपायला पुरेशी जागा आहे. तो, तिच्याकडे तोंड वळवून, थोडा दूर सरकतो, ज्याने एका बाजूने तिला व्यवस्थित बघूं शकेल. तिचं तोंड किंचित उघडं आहे, पापण्या झुकल्या आहेत. त्याने उशी घेतली नाहीये, आणि नीनेलचं डोकं उशीत खुपसलं आहे, ज्याने तिची टोकदार हनुवटी, छताकडे झाली आहे, आणि अल्टारचं दार न्यून कोण बनवंत कपितोनवकडे आहे. चांदी? पण ती तर वजनदार असते...म्हणजे हे कवच नाहीये, तर – साखळ्यासुद्धां नाहीये.
कपितोनव धातुच्या ह्या दागिन्याला बोटाने स्पर्श करतो – सावधपणे, ज्याने तिची झोपमोड होऊं नये, कारण की त्याला खात्री आहे, की ही बाई दूर, एखाद्या दुस-या जगांत पोहोचली आहे: ती इथे नाहीये, ती काळ आणि स्थानाच्या वेगळ्याच परिधीत आहे.   
तो तिच्या श्वासाची लय न्याहाळतो, जी तिच्या पोटाच्या माध्यमाने प्रकट होत आहे आणि वक्षस्थळ अगदी स्थिर आहे.
एका बाजूने बघितल्याने तिचं वक्षस्थळ धनु-कोष्ठकांसारख दिसतंय,
कपितोनव दुसरीकडे तोंड फिरवतो – त्याच्यापासून दोन मीटर्सच्या अंतरावर भिंतीत आरसा लावलेला आहे. तर्कसंगत आहे : निर्वस्त्र, हाडं निघालेला, आणि त्याच्यामागे ती, धनु-कोष्ठकवाली.
ते चौघं आहेत.
जर दोन्हीं कपितोनवांना एक समजलं, तर कपितोनव धनु-कोष्ठकांच्यामधे दबलाय.
तो – जणू घरट्यांत आहे.
तो उठतो आणि स्वतःला कोष्ठकांमधून काढून मिनिबारकडे जातो.
ती लगेच शुद्धीवर येते, आणि जणु काही झालंच नाही, खांद्यापर्यंत ब्लैन्केटखाली लपून जाते – आता कोणतेच कोष्ठक नाहीयेत.
“कपितोनव, तुला मुलं-बाळं आहेत का?”
“मुलगी. एकोणीसची.”
“आणि मला एक मुलगा आहे. अकराचा. तुला काय झालंय कपितोनव?”
“इथे...माशी आहे,” कपितोनव म्हणतो.
“फ्रिजमधे?”
“हो.”
“मेलेली?”
“नाही.”
“तू उभा होतास आणि तू लक्ष नाही दिलंस, कपितोनव?” कोपरांवर थोडंसं उठते. “तू इतका घाबरलास कां? असं काय झालंय?...हिवाळ्याची माशी. हॉटेलच्या मिनिबारमधून...अरे, तुला झालं काय आहे, कपितोनव? तू माशांना भितोस कां? ही काही झुरळ नाहीये.”
“सगळं ठीक आहे,” कपितोनव स्वतःवर ताबा ठेवतो. “वाइन घेशील कां? की, इथे आणखी काय आहे? श्नेप्स – दोन घोट...वोद्का रशियन स्टैण्डर्ड’…ओहो, पूर्ण शंभर ग्राम्स!”
“चला, अर्धी अर्धी. नाही, बाटलीनेच पिउया. म्हणजे ग्लास भिडवायला नकोत.”
आधी ती घोट घेते, पण बाटलीतून पूर्ण घोट तिच्या तोंडांत नाही जात – बाटलीचं तोंड खूप अरुंद आहे. तो आपला घोट घेतो.
“आणि, तुझे तिच्याशी संबंध कसे आहेत, सगळं ठीक आहे?”
“कोणाबरोबर ठीक आहे?”
“मुलीबरोबर – सगळं ठीक आहे ना?”
“हो, ठीक आहे. वाईट कां असेल?”
“नाही, बस, असंच विचारलं. प्रेमाने राहता न?”
“नकीच, प्रेमाने.”
“हे, ‘नक्कीचपण? हो, नक्कीच – ती मोठी आहे...अजून लग्न नाही झालं?”
“एंगेजमेन्ट झालीय.”
“काय मजा आहे! व्हायलाच पाहिजे...आणि तू? तुझं तर लग्न झालेलं आहे?”
“सध्यां आम्ही,” कपितोनव म्हणतो – “बिल्कुल बरोबर नाहीये. तुझ्या कानांत हे काय आहे – चांदीचं आहे?”
“इयर-रिंग्स आवडतांत?”
“कदाचित, वजनदार आहेत?”
“मला वाटतं, माझ्यावर चांगले दिसतात.”
“हो, नक्कीच, छानंच दिसतात.”
ती वस्तू, जिच्याशिवाय आजचा माणसाची, कुठेही असला तरी, फार गैरसोय होते, तिच्या हातांत दिसली. ती लहानश्या स्क्रीनवर बघते:
“विचारतांत आहे, की मी कोणाच्या पक्षांत आहे – स्मेत्किनच्या की चिचूगिनच्या? टु हेल!... वॉव!...गिल्डच्या प्रेसिडेंटबद्दल विसरले. हे सगळं तुझ्यामुळे झालं, कपितोनव! बोर्डची तर पुष्टी केली, पण प्रेसिडेन्टंच नाहीये. आत्ता तिथे, रेस्टॉरेन्टमधे मतदान करतात आहेत...आणि, तुला मैसेज नाही आला कां? तू काय फोन बंद करून ठेवलाय?”
“ते कुणालाही निवडोत – मला काही फरक पडंत नाही.”
“जर तुला निवडलं असतं, तर मस्त झालं असतं.”
“उहूँ,” कपितोनव म्हणाला.
“काय उहूँ’, कपितोनव? तू एक सर्वोत्तम प्रेसिडेन्ट झाला असतास.”
“पण, काय मतदान गुप्त नाहीये?”
“बघितलंस, तुला फरक पडतोय!”
“आज कोणची तारीख आहे?” कपितोनवने विचारलं.
“ओह, ही आहे न गम्मत! ओळख.”
“ठीक आहे, जरूरी नाहीये.”
“नाही ओळखू शकंत? कारण की ती दोन अंकांची नाहीये, म्हणूनंच तू नाही ओळखू शकंत!...पण, मी माझी ओळखली, तू माझी ओळख...हूँ? गप्प कां आहेस? मी दोन अंकांची मनांत धरली.”
“पुरे कर, मी हे नाही करणार.”
“ओह, प्लीज़, मी धरली आहे.”
“सांगितलं न, की नाही करणार.”
“बरं, मी त्यांत काही तरी जोडू...किती जोडू?...चार?”
“मला काही फरक नाही पडंत.”
“आणि किती वजा करूंदोन?”
“मला काही फरक नाही पडंत.”
“तर? मी जोडले आणि वजासुद्धां केले. बोल ना रे!...गप्प आहेस?...चोवीस!”
“खोटं बोलतोयस! तू ओळखलीस! चोवीस!”
“मी काहीही ओळखलं नाहीये. हे तू मला उत्तेजित करते आहेस. मला नाही माहीत, की तू काय धरलं होतं.”
“कपितोनव, तू वाईट आहेस. आणि, तुला काय वाटतं, मी रोज हे घालते?...बरं सांग, कपितोनव, मी तुला कां कपितोनव, कपितोनव!म्हणून बोलावते, पण तू एकदाही मला माझ्या नावाने नाही बोलावलं? तू काय बिछान्यांत सगळ्यांसोबत असांच असतोस? हा तुझा सिद्धांत आहे कां?”
“नाही, कां...”
“पूर्ण कपडे काढायला हवे होते, म्हणजे तू माझ्यावर इयर रिंग्स बघितले असते.”
“मी ते आधीही बघितले आहेत.”
“केव्हां? आपण तर काही तासांपूर्वीच भेटलो आहोत.”
“बस, बघितलेंत.”

“हो, तू स्वतःवर चष्मा नाही बघूं शकलास? तू माझे इयर-रिंग्स कसे बघितले? कपितोनव, ब्लैन्केटखाली ये, प्लीज़, वोद्का गर्मी नाही देत आहे. मला थंडी वाजतेय.”

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें