16.58
पोलिसाच्या
माहितीने कपितोनवच्या डोक्यांत विचारांचा इतका कल्लोळ माजतो, की खरं सांगावं तर
कपितोनव काही विचारंच करंत नाहीये. आणि जेव्हां कपितोनव विचार नाही करंत, तेव्हां विचाराची
प्रक्रिया आपणहून होऊं लागते – बेकारची, निरर्थक, त्याचासाठीसुद्धां नकळंत. जेथपर्यंत त्याचं एस्केलेटर जातं, ती खोली एस्केलेटरच्या लांबीची
Sin300, म्हणजे लांबीची अर्धी
आहे, ज्याच्याबद्दल विचार
करण्याची गरंजसुद्धा नाहीये : हे तर तसंही स्पष्टंच आहे. नजर, सवयीनुसार, समोरून वर येत असलेल्या
चेह-यांवर अडखळते, जे सुन्दर महिलांचे नसले, तरी कमीत कमी ‘मिस एस्केलेटर’ प्रतियोगितेच्या प्रत्याश्यांचे तरी असावेत. लैम्प्स – ओळीने लागलेले –
आपणहून मोजले जातांत. उतरताना : 21. तर त्यांच्या मधलं अंतर आणि 300चा
कोण, - ही झाली खोली, 50मीटर्सहून थोडी जास्त.
पण
हे सगळं – बस, असंच – इतर गोष्टींशिवाय. त्याने पहिल्याच मुलीची ‘मिस एस्केलेटर’ म्हणून निवड केली, कुरळे लाल केस असलेली, जे तिच्या फरच्या
हैटच्या बाहेर निघंत होते. समोरून येणा-या एस्केलेटरवरून तर आणखी कुणी डोळ्यांना
आनन्द नाही दिला.
मॉस्कोंत
एक घुमंट असलेले स्टेशन्स जवळ-जवळ नाहीतंच, पण हे, पीटरबुर्गमधे खूप मोठं आहे. शेवटच्या टोकापर्यंत भटके लोक शेकोट्यांजवळ बसले
आहेत : त्यांच्याजवळ ना तर कायदा आणि सुव्यवस्था बघणारे जातांत, ना स्थानीय
अण्डरग्राउण्ड ट्रेनचे कर्मचारी. कपितोनवलापण प्लेटफॉर्मच्या त्या टोकाकडे
जाण्याची गरंज नाहीये.
मॉस्कोला
जाण्याआधी त्याला राजधानीच्या तुलनेंत पीटरबुर्गची मेट्रो चरम साधेपणाचं आणि
सुन्दरतेचं प्रतीक वाटायची, - आता तर त्याला लाइन्स आणि क्रॉसिंग्सशी झगडायचं आहे. तो कम्पार्टमेन्टमधे
हैण्डल धरून उभा आहे आणि मेट्रोचा नकाशा बघतोय, जो कोणच्यातरी बैंकेच्या जाहिरातीमुळे दबलाय. ट्रेन बदलण्याची गरंज आहे
किंवा नाही, हे
बघून घेतो. तिथे एस्केलेटरवर : जेव्हां तो खाली येत होता, तेव्हां एका महिलेचा
आवाज सावधगिरीचा इशारा देत होता : “चालत्या-फिरत्या विक्रेत्यांकडून बेकायदेशीर
वस्तूंचा व्यापार करण्याच्या वाढत्या प्रमाणाबद्दल”, - आता कम्पार्टमेन्टमधे विक्रेता
प्रकट होतो, आणि
पूर्ण आत्मविश्वासाने आपला परिचय देतो : व्यवहारकुशल, स्मार्ट, सुरेख कमावलेला आवाज. त्याच्या हातांत पोलिथीनचं पैकेट आहे, जे सामानाने भरलेलं आहे.
आपल्या गोड आणि आनन्दी आवाजांत आता तो जे सांगतोय, त्यावरून कयास लावता येतो, की हे मोजे साधारण नाहीयेत.
“थर्मो-सॉक्स, रशिया आणि बेलारूसमधे
बनवलेले!...आपोआपंच पायांच्या तपमानाला नियंत्रित करतात, आणि चालताना होणा-या
घर्षणाला कमी करतात!...फैक्ट्रीच्या भावावर देतोय – 50 रूबल्सची जोडी, नो प्रॉफिट!...”
कम्पार्टमेन्टमधे
एकटा कपितोनवंच विक्रेत्याकडे लक्ष देतोय.
विक्रेत्यानेपण
बघून घेतलं की एका माणसाने खिशांतून पन्नास रूबल्स काढलेयंत. तो अगदी बरोब्बर
लवकर-लवकर त्याच्याकडे येतो.
“मी
हे नाहीं विचारंत आहे, की घर्षण कसं कमी होतं, मला ह्या गोष्टींत रस आहे,” कपितोनव विक्रेत्याकडे पैसे देत म्हणाला, “की चालतांना घर्षण कमी कां करायला हवं?”
“पावलांच्या
सुरक्षिततेसाठी आणि पंज्यांना उच्च कोटीचा आराम देण्यासाठी,” कपितोनवला मोजे देत, पापणी न हालवतां
विक्रेता उत्तर देतो.
हा
कुणी देवदूततर नाहीये, जो फक्त कपितोनवसमोरंच प्रकट झालांय? कारण की असं तर होऊंच नाही शकंत की कोणीही थर्मो-सॉक्स विकणा-याकडे बघितलंच
नसावं : कपितोनवच्या शिवाय कुणी त्याचा आवाजंच नाही ऐकला कां, त्याला बघितलं नाही कां?
दारं
उघडतांत आणि थर्मो-सॉक्सचा विक्रेता कम्पार्टमेन्टमधून बाहेर निघून जातो.
17.47
युनिफॉर्म
घातलेली, रेशमी
टाय लावलेली, सोनेरी केसांची रिसेप्शनिस्ट टेलिफोनवर बोलतेय – आत येणा-या कपितोनवकडे तोंड
वळवते, आणि कपितोनवला तिच्या
डोळ्यांत स्वागताऐवजी दिसतं : “आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत.” हवामानासंबंधी
समस्येचा अंदाज लावायची गरज नाहीये. समस्या एकुलत्या एका ग्राहकाच्या स्वरूपांत
समोर उभी होती. त्याचे लांब, मागे वळवलेले, पांढरे केस होते, दिसायला पन्नास वर्षांचा, आणि कपडे, जे त्याच्या अंगावर होते, त्यांना बस किळसवाणेच म्हणता येत होतं : हा ना तर फर-कोट होता, ना मेंढीच्या कातड्याचा डगला, ना ओवरकोट, ना जैकेट. ना गाउन, ना चिलखत. त्याच्या
पाठीवर झोळा नसून विणलेली पिशवी होती.
“हो-हो,” रिसेप्शन-डेस्कच्या
मागून मुलगी म्हणतेय, “आपलं नाव सांगायला तयार नाहीये...नाही, पासपोर्टसुद्धा दाखवंत नाहीये. म्हणाला, की पासपोर्ट नाहीये. आणि फॉर्म भरायलासुद्धां तयार नाहीये...हेंच, मी हेंच म्हणतेय. पण तो
ऐकतंच नाहीये.”
किंचित
सडका वास, जो
ह्या जागेसाठी अनपेक्षित होता, कपितोनवला त्या ग्राहकापासून एक पाऊल मागे घ्यायला लावतो. तो पासपोर्ट काढून
डेस्कवर ठेवून देतो, - ह्या फालतू कामाला, ज्याचा अर्थ फक्त हा आहे, की तो रजिस्ट्रेशनसाठी तयार आहे, प्रॉब्लम-ग्राहकाने पाहिलं – त्याच्या, त्याशिवायसुद्धां अप्रिय चेह-यावर घृणित भाव दिसंत होते, तर रिसेप्शन-डेस्कच्या
मागून मुलगी प्रशंसात्मक भावाने कपितोनवकडे बघून डोकं हालवते, जणु म्हणतेय, की तुम्हीं चांगले आहांत, सगळं ठीक आहे, आणि टेलिफोनच्या
रिसीवरमधे, कदाचित, आपल्या बॉसला सांगते:
“आत्ता
त्यांच्या ऑर्ग-कमिटीचा एडमिनिस्ट्रेटर येणार आहे, मी त्याला बोलावलंय, त्यांनाच बघूं द्या...माफ़ करा, ह्याला तुम्हांला काही तरी सांगायचंय...” आणि आता त्याला, ज्याचा हात रिसीवरकडे
पोहोचला होता, म्हणते, “घ्या.”
कपितोनव
डब्यांतून फॉर्म काढतो आणि वेळ न घालवतां त्याला भरायला लागतो. तो ऐकतो आहे:
“नमस्ते, मी ‘ईवेन्ट्स-आर्किटेक्ट’4 आहे!... अगदी बरोबर, ईवेन्ट्स-आर्किटेक्ट, दुसरा कोणी नाही...नाही, मला ह्याच नावाने
आमंत्रित केलेलं आहे, भाग घेणा-यांच्या लिस्टमधे मला ह्याच नावाने दाखवलंय, आणि तुमच्या हॉटेलच्या
नियमांशी मला काही घेणं-देणं नाहीये!...मी ना तर सीदरोव आहे, ना राबिनोविच, ना मिक्लुखो-मक्लाय, आणि जॉर्ज
वाशिंगटनसुद्धां नाही, मी – ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे...माझ्या सहनशक्तीची परिक्षा नका घेऊं!...नाही, नाही, पुन्हा-पुन्हां
नाही!...वाट बघू शकणार नाही...आणि मी पण कोणाची वाट पाहणार नाही, असं नका समजूं की
पाहीन!...मला तुमची दया येते!...हो, विशेषकरून तुमची!” इतकं म्हणून तो रिसेप्शनिस्ट मुलीकडे रिसीवर परंत देतो आणि
म्हणतो : “मला माझी ब्रीफकेस द्या!”
“आम्ही
ब्रीफकेस नाही देत.”
“मला
माहितीये की ब्रीफकेस तुमच्या काउंटरच्या मागे आहे. मला सांगितलंय.”
“आत्ता
तुमच्या ऑर्ग-कमिटीचा माणूस येईल आणि तुम्हांला ब्रीफकेस देईल.”
“माझ्याकडे
वेळ नाहीये. मी ब्रीफकेसची मागणी करतोय.”
“पुन्हां
सांगतेय. ब्रीफकेस
तुमच्या कॉन्फ्रेन्सची ऑर्ग-कमिटी देईल, आणि आमचा तुमच्या ब्रीफकेसेसशी काही संबंधही नाहीये!...आम्हीं फक्त त्यांना
काउन्टरच्या मागे ठेवण्याची परवानगी दिली होती.”
“हे
तर तुमच्यासाठी आणखीनंच वाईट आहे!”
तो
झर्रकन् वळतो आणि बाहेरच्या दाराकडे जाऊं लागतो.
“अहो, थांबा, आत्तांच तुमच्या कॉन्फ्रेन्सचा
एडमिनिस्ट्रेटर येणार आहे!”
पण
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट दाराच्या बाहेर निघून गेलेला आहे.
“ओह-हो-हो”
मुलगी पुटपुटते.
“मी
दिलगीर आहे,” कपितोनव
फॉर्म भरता-भरता म्हणतो. “कोणी साम्प्रदायी वाटतो.”
“कॉन्फ्रेन्सचा
सदस्य आहे,” रिसेप्शनिस्टने
उत्तर दिलं.
“मीसुद्धां
सदस्य आहे.”
कधी-कधी
ढंगाचे लोकही येतांत.”
“माझ्याकडे
माझं आडनाव आहे, लपवण्यासारखं काहीच नाहीये.”
“आत्ता
बघते, काय आहे ते,” रिसेप्शनिस्ट कपितोनवचं
पासपोर्ट उघडते आणि म्हणते, “कपितोनव.”
“कपितोनव,” कपितोनव डोकं हालवतो.
“एव्गेनी
गेनादेविच,” मुलगी
म्हणते.
“जर
वडिलांच्या नावाबरोबर म्हणाल, तर हो,” कपितोनव ह्यावर म्हणतो.
“आहे!”
तिला लिस्टमधे त्याचं आडनाव सापडलं होतं. “आणि माझी काय चूक होती?...तुम्ही तर स्वतःच सगळं
बघितलंय नं?...कारण
की आम्हीं कोणत्याही टोपणनावाने रजिस्ट्रेशन करून घेतो, आणि मग...”
“लिस्टमधे
काय त्याचं हेच नाव आहे...ईवेन्ट्स-आर्किटेक्ट?”
“हो.
तसले तिघं आहेत – टोपणनाव असलेले. त्या दोघांकडे कमीत कमी पासपोर्ट तरी होते...”
ऑर्ग-कमिटीची
प्रतिनिधि जिन्याकडून लवकर-लवकर हॉलमधे येते. बैजकडे बघतां – ओल्गा मात्वेयेवा.
“नमस्ते.
हे तुम्हीं आहांत?” ती ए.गे.कपितोनवशी एका अश्या प्रतिनिधीच्या थाटांत बोलूं लागली, जो कोणतीही समस्या
सोडवूं शकतो. “कसे आलांत? काही समस्या आहे कां? काळजी नका करूं, आपण सगळं व्यवस्थित करू...”
“नमस्ते, ओल्गा, पण...”
“तो
आत्तांच निघून गेला,” काउन्टरच्या मागून सोनेरी केस वाली मधेच टपकली.
“कुणीकडे?”
“तिकडे.
म्हणाला की आपल्या सगळ्यांना भोगावं लागेल.”
“ओह, हेल!” आणि ऑर्ग-कमिटीची
ओल्गा जशी आहे तशीच, म्हणजे गरम कपडे न चढवतां बाहेर, बर्फांत जाऊ लागते, पण लगेच परंत येते. “कमीत कमी, तो दिसायला कसा आहे?”
“तुम्हीं
लगेच ओळखाल,” रिसेप्शनिस्ट
उत्तर देते.
“पिवळा
डगला,” कपितोनव ओरडून
सांगतो, पण
ओल्गा मात्वेयेवाने, जी दाराच्या बाहेर निघून गेली होती, खचितंच त्याचं म्हणणं ऐकलं असावं.
“फक्त, तो डगला नव्हता,” विचारांत गढलेली रिसेप्शनिस्ट प्रतिवाद करते, “त्याला काहीही म्हणा, पण डगला नको...सही करा, प्लीज़. (कपितोनवने फॉर्म तर भरला होता पण सही करायला विसरून गेला होता.) रूम
नं, 32, तिसरा मजला.
ब्रेकफास्ट साडे सहा ते दहा पर्यंत. खोलींत धूम्रपान करायची मनाही आहे.”
“आणखी
कोणच्या गोष्टीची तर मनाही नाहीये नं?”
“नियम
वाचून घ्या, तुम्हीं
सही केलीये ना, की नियमांची ओळख झालीये.”
“म्हणतांत
की आज तुमच्याकडे काहीतरी उडवून देणार होते?” किल्ली घेऊन कपितोनव उत्सुकता दाखवतो.
“तुम्हीं
आपल्या लोकांनाच विचारलं असतं, ते जास्त चांगलं सांगू शकतील. आमच्याकडे उन्हाळ्यांत फुटबॉल-फैन्स थांबले
होते, ते असताना जास्त शांति
होती.”
ओल्गा
बाहेरून परंत येते, ब्लाउज़वर हिमकण होते, तिने स्वतःच आपले खांदे धरलेयंत.
“मी काही त्याच्यामागे धावणार नाहीये!
जेव्हां परंत येईल, तेव्हां लगेच मला फोन करं. जास्तीत जास्त, त्याला कोणाच्यातरी फ्लैटमधे थांबवून देऊं.”
“हूँ, काहीतरी असंच करावं लागेल,” काउन्टरच्या मागची मुलगी
म्हणते.
“आणि
तुम्हीं – कपितोनव?” ओल्गा कयास लावते. “एव्गेनी...गेनादेविच? चला, शेवटी...ट्रेनच्या
बाबतीत गडबडंच झाली, तो, मी
तुम्हांला फोन केला होता. आठवलंय?”
कपितानोवला
केव्हांच समजलं होतं, की ती दोघी ओल्यांपैकी एक आहे, आणि त्याला कळलंय की ही कोणची आहे. जिने त्याला आर्किटेक्ट म्हटलं होतं, जेव्हां ट्रेन पुलावरून
जात होती.
“तुम्हीं
मला ‘हा’ समजल्या?”
“कठीण
दिवस आहे,” ओल्याने
म्हटलं. “गोष्ट फक्त येवढीच होती, की तुम्हीं दोघं शेवटचे होता आणि दोघेही एकांच वेळी आलांत...”
“तुम्हीं
काय सगळ्यांनाच रिसीव्ह करतां?”
“ओह, नाही. ‘तलाव’ने5 सांगितलं होतं की तुम्हांला नक्कीच रिसीव्ह करायचंय”
“मला?”
“आणि
हा आहे पित्रोज़वोद्स्कचा. तोच आहे. त्याच्याबरोबर नेहमी काही न काही प्रॉब्लमच होत
असते...हो! तुम्हांला ब्रीफकेस द्यायचीय...” ती काउन्टरच्या मागे शोधते आणि काळी
ब्रीफकेस काढते, साधारण ब्रीफकेसपेक्षा लहान. “तुम्हांला, सदस्य म्हणून. कॉन्फ्रेन्सचे कागद पत्र वगैरे, बघून घ्या...”
“आर्किटेक्टनेपण
मागितली होती, मी नाही दिली.” सोनेरी केसवाली काउन्टरच्यामागून सांगते.
ओल्गा
मात्वेयेवा काचेच्या भांड्यातून चॉकलेट काढते:
“छान
वाटतं. मला तर अगदी वेड लागलंय. तुम्हांला कोणच्या? तिस-या? चला, आपला
रस्ता एकंच आहे,” कपितोनवला लिफ्टकडे घेऊन जाते.
कपितोनवच्या
डाव्या खांद्यावर झोळा आहे, उजव्या हातांत – ब्रीफकेस, ती वजनदार नाहीये. कपितोनव वळून बघतो, पण सोनेरी केस वाली रिसेप्शनिस्ट त्याच्याकडे बघंत नसून कागदांमधे काहीतरी
बघतेय. तिरप्या नजरेने कपितोनवला आपल्या गाइडच्या ओठांवर हसू दिसतं.
त्यांनी
बोलावल्याबरोबर लगेच लिफ्ट नाही येत. वाट बघतात.
ओल्गा
मात्वेयेव्नाची उंची त्याच्यापेक्षा अर्ध डोकं कमी आहे, ती किंचित वाकून चालते, तिच्या चेह-याच्या भावांत पक्ष्यांसारखं काहीतरी आहे, - तिच्याकडे नुसतं
बघण्यापेक्षा कपितोनव तिला विचारतो:
“आणि
ही बॉम्बची भानगड काय आहे?”
“कोण्या
डुकराच्या पिल्लाने पोलिसमधे फोन केला आणि सांगितलं की हॉलमधे बॉम्ब लपवलेला आहे.
बस, येवढंच. सेशन खड्ड्यांत
गेलं. पूर्ण दिवस बेकार गेला. म्हणजे, तुमचं काही नुकसान नाही झालं. सगळं – उद्यांच होईल.”
“ह्यामागे
कोणाचा स्वार्थ आहे?”
“म्हणजेच, कोणाचातरी नक्कीच आहे,” ओल्गा म्हणाली. “हा ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
जर सकाळी आला असतां, तर सगळ्यांना असंच वाटलं असतं, की हे त्यानेच केलंय. भाग्यवान आहे.”
“मीपण,” कपितोनव म्हणतो.
“नाही, तुमच्यावर कोणी शंका
घेतली नसती.”
“आणि, तो कोणत्या ईवेन्ट्सचा
आर्किटेक्ट आहे?”
“हे
पहा, मी तर त्याला बोलावलं
नाहीये. माझ काम फक्त पाहुण्यांना रिसीव्ह करायचं आहे.”
लिफ्ट
खाली आली : आरामांत दारं उघडते, मग विचार करते, की त्यांना बंद करायचं का. तसंही लिफ्ट एक पवित्र जागा आहे – इथे बोलंत
नाहींत, आणि
बटन्स, बघण्याची परंपरागत वस्तु
असल्यामुळे, आपल्या
दररोजच्या चेह-याने, दररोजच्या विचारांना बाहेरंच ठेवतात. जोपर्यंत तिस-या मजल्यावर बाहेर नाही
निघंत, दोघंही चुपंच राहतात आणि
विचारसुद्धां करंत नाही.
“तुम्हांला
इकडे, आणि मला कॉरीडोरच्या
त्या कोप-यापर्यंत जायचंय. जर ऑपेरा बघायचा असेल – तर सात वाजता दुस-या मजल्यावर, खास करून डेलिगेट्ससाठी.
कॉन्सर्ट. पण मला वाटतं, की तुम्हीं डुलक्या घेऊं लागाल. नीट झोप नाही झाली, हो ना?”
“हो, इथे मेडिकल स्टोअर कुठे
आहे?”
“अनिद्रा? तुम्हांला मेडिकल
स्टोअरची गरंज कां पडली?”
“मॉस्कोत
माझी तब्येत बिगडली होती.”
“आणि
मला वाटलं की ट्रेनमुळे...थोडीशी ‘रम’ घ्या, जास्त चांगलं राहील, ‘मिनिबार’मधे असेल...आणखी एक :
ब्रीफकेसबद्दल...त्यांत इतर गोष्टींसोबत एक ‘सुवेनीर’पण आहे – जादूची छडी, फक्त छडी, लाकडी, ताईतासारखी, बघा...घाबरूं नका, ही फक्त गम्मत आहे. इथे, असं वाटतं की सगळ्याच लोकांना विनोद कळंत नाही, म्हणूनंच मी तुम्हांला सांगून ठेवते. नाहीतर तुम्हीं काही-बाही विचार करूं
लागाल...”
18.15
आणि कसलीही डुलकी नाही, उलंट विचाराची अनुपस्थिति, तसं,
कदाचित, शॉवरच्या खाली उभ्या-उभ्या एक-दोन
सेकंदासाठी तो ‘गुल’ झाला असेल.
विचाराच्या अनुपस्थितीचा विचार कपितोनवला वास्तविकतेंत परंत आणतो, त्याला आठवतं, की त्याला झोपायचं होतं, आणि तो पाणी बंद करतो.
कपितोनवच्या मनांत एक
छोटीशी भीति आहे : हॉटेल्समधे तो कधीही टूथ ब्रशला सिंकच्या जवळच्या ग्लासमधे नाही
सोडंत. हे असं सुरू झालं काही दिवसांपूर्वीच एका संवाददात्याची बिंग फोडणारी
रिपोर्ट प्रकाशित झाल्यावर,
जी स्कैण्डलसाठीच एका फाइव स्टार हॉटेलमधे सफाई-कर्मचारीम्हणून
राहिली होती. तिने ठासून सांगितलं होतं, की सफाई करणा-या
बाया जास्ती काम असल्यामुळे सिंकला
वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ नाही करंत, आणि काम लवकर-लवकर
संपवण्यासाठी पाहुण्यांच्या टूथ ब्रशेज़चा उपयोग करून टाकतात. कपितोनव ह्यावर
विश्वासापेक्षां अविश्वासंच करतो, पण प्लास्टिकच्या खोळीत
कापडाचा तुकडा घालून ठेवलेला टूथ ब्रश आपल्या ट्रेवल-पर्समधे टाकून घेतो.
नीनाने एकदा
त्याला म्हटलं होतं की तो अनेक प्रकारच्या भयगंडांचा पुतळा आहे. बरं आहे, की हे अकारण भय
खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत नाही पोहोचंत. आयुष्यभर तो सुरुवातीच्या
कम्पार्टमेन्ट्सपासून दूर राहिला. काही काळापूर्वी(जे तो चांगल्याप्रकारे लपवतो, नीनाला
ह्याबद्दल कळलंसुद्धा नाही), जेव्हां तो मोठा झाला होता,
लहानग्या आन्काबरोबरझालेल्या
घटनेनंतर, तो रक्त बघून घाबरायला लागला – नाही, रक्त
बघून नाही, पण ह्या भीतीने,
की असं केल्याने त्याचं नुक्सान होईल
: जसं, कपितोनव अश्या फिल्म्स बघायला घाबरतो ज्यांत केचप
किंवा क्रेनबेरी जूसच्या उपयोगाची शक्यता असते. जरी तो शाळेत आणि विद्यापीठांत
दादागिरी करण्यांसाठी प्रसिद्ध होता तरीही. पण शाळेंत असतानांच, जेव्हां
पाचवींत इतिहासाच्या वर्गात, शिस्तप्रिय किरील सिर्गेयेविचने रोमन सेनेंत ‘डेसिमेशन’बद्दल (विद्रोही सैनिकांतील दहापैकी एकाला मारून टाकणं –
अनु.) सांगितलं आणि
बोलतां-बोलतां प्राचीन रोमन्सच्या, फार प्राचीन अश्या नसलेल्या, अनुकरणाबद्दलसुद्धां
सांगितलं (त्यांच्या वर्गांत तिघांना गोळी मारली असती – तेपण शिल्लक उरलेल्या
कॉम्रेड्सच्या प्रयत्नाने), काही महीने तो आपल्या जीवनांत 10च्या अंकाला महत्व
देऊं लागला – जे, जर मेट्रिक प्रणालीच्या समर्थनांत काही सांगायचं झालं
तर सम्पूर्ण पोज़िशनिंग प्रणालीचा आधार आहे. पण – दहा नंबरची बस, दातांच्या
डॉक्टरच्या लाइनींत दहावा नंबर...कदाचित म्हणूनंचतर कपितोनवने मैथेमेटिक्सची निवड
केली नसेल (कधी कधी तो ह्याबद्दल विचार करतो),
म्हणजे नकळतंच आपल्या किशोरवयाच्या डेसिफोबियापासून
मुक्त होता येईल?
ही
खोली अत्यंत साधी असूनही, तिच्यांत विचित्रपणे आरश्यांचा सुळसुळाट आहे.
प्रवेशदालनांत आणि बाथरूममधेतर ठीक आहे,
पण खोलींत – आणि तिथे तीन-तीन आरसे
कशासाठी? कपितोनवला स्वतःवर प्रेम करायचा शौक नाहीये आणि ह्या
संभावनेनेपण तो बिल्कुल खूश नाहीये – पलंगावर पडल्या-पडल्यासुद्धां, डोकं
वळवून, जो पलंगावर झोपलेल्या त्याचा स्वतःचाच अंश आहे, आपलाच
चेहरा बघण्याची.
तर, आइडिया
हा होता की झोप नाही आली, तर कमींत कमी डुलकी घेता यावी.
हे
स्पष्ट झालं, की झोपूं शकणार नाही,
आणि ह्याला जवाबदार टेलिविजन नाहीये
(चैनल्स बदलतो), तर व्यक्तिगत अनुभव आहे हा अवजंड उत्साहीपणा सहन
करण्याचा, जो बिछान्यांत पडतांच पूर्ण ताकदीनिशी जाणवूं लागतो.
वरून
साउण्ड-प्रूफिंग. आश्चर्य आहे.
आधी
तर कपितोनवला असा भास झाला, की भिंतीच्या पलिकडे कोणीतरी घोरतंय. आत्ताशीच? कपितोनव
कान लावून ऐकतो. हे घोरणं नाहीये. हे, कोणाचातरी गळा घोटतात आहेत. त्याने काहीतरी उपाय केला
असता, पण स्वतःच्या कानांवर विश्वास करणे नाकारतो. आणि, हे
बरोबरपण आहे. ओकारी करण्याचे प्रयत्न – भिंतीच्या पलिकडे हेंच चाललंय.
कपितोनवला
आश्चर्य वाटतंय. तो टेलिविजनचं वॉल्यूम वाढवतो. एका प्रसिद्ध यूरोपियन ऑफिसरच्या
प्रेमिकेबद्दल बातमी दाखवतांत आहेत, जिने एका प्रमुख समाचार पत्रिकेवर ‘केस’ केली
आहे.
तेवढ्यांत
दारावर टकटक होते.
“प्लीज़...वॉल्यूम!...”
भिंतीच्या पलिकडून मोठ्या मुश्किलीने ओकारी थांबवंत शेजारी कर्कशपणे म्हणतो.
कपितोनवला
आजारी माणसाशी वाद घालायचा नाहीये आणि तो टेलिविजन बंद करतो.
“थैन्क्यू...”
कपितोनव
अविश्वासाने स्तब्धता ऐकतोय : भिंतीच्या पलिकडला माणूस जिवन्त आहे का? जीवनाचे दुसरे कोणते
लक्षणं ऐकूं येत नाहीये. (पण हे तरी काय जीवन आहे, जेव्हां आतड्या बाहेर निघताहेत?)
कपितोनवने
ब्रीफकेस उघडली.
ब्रोश्यूर्स, प्रोग्रामशी संबंधित
डॉक्यूमेन्ट्सच्या फाइल्स. चार्टरचा मसुदा.
नोटपैड, बॉलपेन्स.
ह्या शहराच्या स्मारकांच्या रहस्यमय जीवनासंबंधी एक पुस्तिका – सुवेनीर. आणखी एक
सुवेनीर – जादूची छडी. कपितोनव स्वतःसुद्धां हे समजूं शकंत होता, कारण की प्लास्टिकच्या
त्या पैकेटवर, त्यांत ही वस्तू ठेवली होती, एक स्लिप चिटकवलेली होती जिच्यावर लिहिलं होतं “जादूची
छडी”.
खरं
तर ही चाइनीज़ रेस्टॉरेन्टची एक चॉपस्टिक होती – विनोदाचा भाग हा होता, कि साधारणपणे पैकेटमधे
अश्या दोन चॉपस्टिक्स असतात आणि त्या खाण्यासाठी असतात, आणि इथे आहे एक, आणि, म्हणूनंच
कोण्या दुस-या कामासाठी आहे. कपितोनवला सुचवलं जातंय की त्याने स्वतःला हैरी पॉटर
समजावे. त्याला असं वाटलं की त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि त्याच्या
प्रतिक्रियेची वाट बघताहेत – की तो हसेल किंवा नाही. कपितोनव नाही हसंत, त्याला हे आवडलं नाही.
पण कोणत्यातरी वस्तूने त्याला चाइनीज़ रेस्टॉरेन्टची चॉपस्टिक फिरवायला भाग पाडलं, - इंटरेस्टिंग!
कॉन्फ्रेन्सचे सगळेच डेलिगेट्स चॉपस्टिकशी असंच करतांत कां, जसं आत्ता कपितोनव करतोय, आणि असं करताना काही लोक
‘अब्रा-का-दब्रा’सारखं काही तरी म्हणतात कां?
कपितोनव
जादूच्या छडीला ब्रीफकेसमधे ठेवून देतो आणि मेम्बर्सच्या नावांची लिस्ट असलेलं
ब्रोश्यूर काढतो. प्रत्येक मेम्बरसाठी एक-एक पान आहे. त्याचा फोटो आणि परिचयात्मक
शब्द आहेत.
सगळ्यांत
आधी परिचय दिलेला आहे चेखवच्या प्रसिद्ध नायकाचं आडनाव असलेल्या अस्त्रोवचा
(कदाचित उपनाम असावे, कपितोनव विचार करतो). “अस्त्रोव, अलेक्सान्द्र एस्कोल्दोविच. विस्तृत क्षेत्राचा सूक्ष्म मैजिशियन –
माइक्रोमैग (इथे तात्पर्य आहे – माइक्रो मैजिशियनशी –अनु.) ‘गोल्डन-फनल’ने सम्मानित. माइक्रो मैजिशियन्स आणि
मैजिशियन्सच्या अंतरराष्ट्रीय अकादेमीचे सदस्य”. कपितोनवला अस्त्रोवचं हास्य आवडंत
नाही, धृष्ठ नजरेचा त्याच्याशी
मेळ नाही बसंत. तो पान उलटतो आणि कॉन्फ्रेन्सच्या पुढच्या मेम्बरच्या फोटोच्या
ऐवजी त्याचं सांकेतिक रूप पाहतो – एका फ्रेममधे डोकं आणि धड ह्यांची फक्त रूपरेशा.
रिसेप्शन काउन्टरवर झालेल्या घटनेनंतर ह्यांत आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये :
“ईवेन्ट्स-आर्किटेक्ट”. आणि, पुढे फक्त एकंच शब्द : ‘रिमोटिस्ट’. ह्या शब्दाचा काय अर्थ असेल, हे जरी कपितोनवला समजलं नाहीये, तरीही तो किंचित अस्पष्टशी कल्पना तर करूंच शकतो : रिमोट कन्ट्रोल वाली
एखादी वस्तू, नाहीं? – चला, जाऊ
द्या, ह्यावर डोकं फोडायची
काही गरज नाहीये, - त्याचबरोबर त्याने हे सुद्धां बघितलं, की वर्णक्रम तुटलाय: नियमाप्रमाणे ईवेन्ट्स आर्किटेक्टला अस्त्रोवच्या आधी
असायला पाहिजे (इथे प्रश्न रशियन वर्णक्रमाशी संबंधित आहे – अनु.). असं
वाटतं की ह्या संदर्भ-पत्रिकेच्या संकलनकर्त्यांना एका चेहराहीन चेह-यापासून
सुरुवात करायची नव्हती, पण त्या चेहरेवाल्या चेह-यांत असं काय विशेष आहे...कदाचित, तेच, जे त्याच्या कुलनामांत
आहे.
मग
कपितोनव लगेच ‘क’ अक्षराकडे
जातो आणि ‘कपितोनव’ला शोधून काढतो.
त्याच्या
आंत सगळं संकुचित होऊं लागतं. हा फोटो दोन वर्षांपूर्वी बायकोने काढला होता, जेव्हां ते तुर्कीला
गेले होते. हा ह्या ब्रोश्यूरमधे कसा आला? पण तेव्हांच त्याला आठवलं की त्याने स्वतःच डिसेम्बरमधे हा पाठवला होता, जेव्हां ऑर्गेनाइज़िंग
कमिटीच्या लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता.
“कपितोनव, एव्गेनी गेनादेविच.
मैथेमेटिशियन-मेंटलिस्ट. दोन अंकांच्या संख्या.”
तो
हसला. ‘मैथेमेटिशियन-मेन्टलिस्ट’ – कदाचित असंच म्हणतात.
आणि ‘दोन अंकांच्या संख्या’ वाचून सहयोग्यांना काय
विचार करायला हवा?
पहिल्यांदाच
तो त्यांच्याबद्दल ‘सहयोगी’ म्हणून विचार करतोय, आतापर्यंत ते एका अमूर्त समूहाचे तत्व होते. तो मजेत ब्रोश्यूरची पानं
उलटतोय आणि “सहयोग्यां”बद्दल माहिती घेतोय.
त्यांच्यापैकी
बहुतांश माइक्रो-मैजिशियन्स आहेत. कोणाकोणाचं स्पेशलाइज़ेशनसुद्धां दाखवलेलं आहे : ‘माइक्रोमैजिशियन-मैचस्टिक्स’, ‘माइक्रोमैजिशियन-स्लीव्ज़’… बरेचसे ‘मास्टर्स’ आहेत – फक्त ‘मास्टर्स’, आणि त्याचबरोबर ‘मास्टर्स ऑफ ड्राइंगरूम मैजिक’ आणि तसलेच. इतर काही लोकांना ‘एक्सपर्ट-चीटर्स’ म्हटलेलं आहे, तसे त्यांच्यांत दोन ‘मास्टर्स’पण आहेत. दोन ‘अत्यंतसूक्ष्मधारी’ आहेत. ईवेन्ट्स-आर्किटेक्ट शिवाय कपितोनवला आणखी दोन ‘रिमोटिस्ट्स’ दिसतात. हे आहेत कोणी
महाशय नेक्रोमान्त6 (ओझा, मांत्रिक-अनु.) आणि काल-भक्षक7.
त्यांच्यापुढे माणसांसारखी नाव दिलेली नाहीत, पण ईवेन्ट्स-आर्किटेक्टपेक्षां वेगळं, म्हणजे दोघांचे फोटो दिलेले आहेत. काल-भक्षक – आजा-यासारख्या अशक्त आहे, त्याचे गाल लटकलेले
आहेत. महाशय नेक्रोमान्त, तो नेक्रोमान्त (मांत्रिक) सारखांच आहे.
.
लैण्डलाइन
फोनची घंटी कपितोनवला पलंगावरून उठायला भाग पाडते.
“प्रवास
कसा झाला, एव्गेनी
गेनादेविच? मी
‘तलाव’, तुम्हांला त्रास देतोय.
मी डिस्टर्बतर नाही केलं?”
“नमस्ते,” ‘तलावा’ला नाव आणि वडिलांचे नाव घेऊन
संबोधित करण्याची जोखीम न उचलतां कपितोनव म्हणतो, (खात्री नव्हती की आठवतंय...) – “थैन्क्यू. सगळं ठीक आहे.”
“फाइटिंग
मूडमधे आहेस ना?” ‘तलाव’ विचारतो.
“एकदम.”
कपितोनव उत्तर देतो. “काय युद्धाची वेळ येणारेय?”
“एव्गेनी
गेनादेविच, मी
खाली रेस्टॉरेन्टमधे बसलोय. तुम्हांला एक कप कॉफी घ्यायला आवडेल कां? एकमेकांना थोडंफार
समजतां येईल, अमोर-समोर बसून ओळख करूं या. नाहीतर आपण काय – फक्त, लिस्टप्रमाणेच आहोत कां?”
“ओह, नक्कीच, थैन्क्यू, येतो.”
खोलीतून
निघण्यापूर्वी त्याने लिस्टवर नजर टाकली – ब्रोश्यूरमधे ‘तलावा’ला शोधलं: तोच आहे – वलेंतीन
ल्वोविच.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें