सन् दोन हज़ार
अमुक-अमुकच्या फेब्रुवारींत (20**च्या नंतरची संख्या कोणाला आठवूं शकते?) : ही त्यावर्षीची गोष्ट
आहे, जेव्हां भयानक हिमपाताने जानेवारीतंच मागच्या वीस-तीस
वर्षांचं रेकॉर्ड तोडलं होतं.
काल
शुक्रवार होता, आठवड्याचे दिवस संपलेत,
पण ट्रेन चालतेच आहे, आणि
कपितोनवच्या डोक्यांत प्रस्तुत क्षणाच्या परिस्थितीचं चित्र आकार घेतंय.
हा
आहे स्वतः कपितोनव. एका मिनिटापूर्वीच तो आपल्या कुपेतून बाहेर निघालाय. ‘बोलेरो’चं
रिंगटोन वाजूं लागतं आणि तो खिशांत मोबाइल शोधतोय.
हा
राहिला मॉस्को-टाइम.
16.07
ही
आहे ऑर्गेनाइज़िंग कमिटीची ओल्या.
“नमस्ते, एव्गेनी
गेनादेविच. आमचा माणूस तुम्हांला शोधू नाही शकंत आहे. तुम्हीं, खरं
म्हणजे, कुठे आहांत?”
“मी, खरं
म्हणजे, ट्रेनमधे आहे.”
“तर
मग बाहेर कां नाही येत आहे?”
“कारण
की मी प्रवास करतोय.”
काही
क्षणांसाठी तिकडच्या ओल्याचं बोलणं बंद होतं. कपितोनव शांत आहे – तो गैरसमजांसाठी
तयार आहे. कॉरीडोरच्या शेवटी लावलेल्या इलेक्ट्रोनिक-बोर्डवर आता वेळ नाही,
तर तपमान दाखवण्यांत येत आहे -110 .
ठीक
आहे. मॉस्कोपेक्षा जास्त थण्डी नाहीये.
कुपेला
खूपंच तापवण्यांत आलंय.
“माफ़
करा, तुम्हीं कुठे जातांय?”
आनंदाची
गोष्ट आहे. तो जातो कुठे आहे?
खिडकीच्या
बाहेर एक दोनमजली इमारत डोकावंत होती, जी जमिनीपर्यंत लटकलेल्या बर्फाने झाकलेली होती. आणि मग पुन्हां – झाडं, बर्फ, झाडं.
“पीटरबुर्ग, ओल्या. सेंट-पीटरबुर्ग.”
“पण
ट्रेनतर केव्हांच आलेली आहे. तुम्हांला घ्यायला रेल्वे-स्टेशनवर गेले आहेत.”
“असं कसं? मला तर लादोझ्स्की स्टेशनवर पोहोचायला अजून अर्धा तास लागेल. जर ट्रेन
वेळेवर असेल तर.”
“थांबा, पण लादोझ्स्की स्टेशनवर कां?”
“तर मग कोणत्या स्टेशनवर?”
“मॉस्को स्टेशनवर.”
“ओल्या, लक्ष देऊन ऐक! काल तुम्हींच मला फोन करून सांगितलं होतं की “सप्सान”1चं
टिकिट मिळंत नाहीये, पण जर मला दुस-या दिवशी पोहोचायचं असेल, तर अद्लेरहून येणा-या ट्रेनमधे टिकिट ‘बुक’ करूं
शकतो. तुम्हीं विसरलां कां? मी कज़ान रेल्वे स्टेशनहून ट्रेनमधे बसलो, लेनिनग्राद स्टेशनवरून नाही, आणि सगळ्या गोष्टी लक्षांत घेतल्या, तर मी लादोझ्स्की स्टेशनवरंच उतरीन, ना की मॉस्को स्टेशनवर! सकाळपासून ह्या कोंदट कम्पार्टमेन्टमधे मी थरथरतोय.
ही सगळ्यांत चांगली ट्रेन नाहीये, आणि मॉस्कोहून पीटरबुर्गला येण्यासाठी हा सगळ्यांत चांगला पर्यायसुद्धां नाहीये.”
“माफ करा,
एव्गेनी गेनादेविच, ती
मी नव्हते, ती दुसरी ओल्या होती. ती तुम्हांला फोन करेल.”
कुपेचं
दार उघडं आहे. सहप्रवासी – एक महिला, जिचं नाव ज़िनाइदा आहे,
आणि तिचा ‘डाऊन’ (मन्दबुद्धि) मुलगा झेन्या,
जो वयाने मोठाच आहे, कपितोनवकडे
बघताहेत. ज़िनाइदा सहानुभूतीने बघतेय, आणि ‘डाऊन’ झेन्या – आनंदाने.
हातांत
झाडू घेतलेली कण्डक्टर तिथून जाते आहे, तिनेपण हे बोलणं ऐकलं :
“घाबरूं नका, लवकरंच ही ट्रेन कैन्सल होणार आहे, बघा, कम्पार्टमेन्ट अर्धा रिकामा आहे.”
“घाबरूं नका, लवकरंच ही ट्रेन कैन्सल होणार आहे, बघा, कम्पार्टमेन्ट अर्धा रिकामा आहे.”
“मी
घाबरंत-बिबरंत नाहीये.”
आत
आला, बसला. सगळे बसले आहेत,
जाताहेत. आता लवकरंच पोहोचून जातील.
“आधी
मला असं वाटलं, की तुमच्या मुलीने फोन केलांय,” ज़िनाइदाने म्हटलं. त्याला दुःख झालं की मुलीबद्दल हिला
कशाला सांगितलं.
कपितोनवच्या
डोळ्यांसमोर पांढ-या भिंतीवर काळे अक्षर पळंत होते – सशस्त्र क्रांतीचं आह्वान.
त्यानंतर – गैरेजेस, कदाचित. तो ह्या बाजूने कधी पीटरबुर्गला आलेला नव्हता.
लादोझ्स्की स्टेशन त्याच्या पीटरबुर्गहून मॉस्कोला जायच्या काही वर्षांपूर्वीच
सुरू झालं होतं. तो फक्त एकदांच लादोझ्स्कीला आला होता – जेव्हां समर-कैम्पहून
परंत येत असलेल्या आपल्या मुलीला घ्यायला बायकोबरोबर आला होता. तेव्हां ती होती
अकरा वर्षांची.
ज़िनाइदाला
आपल्या सहप्रवाश्याबद्दल सहानुभूती वाटंत होती:
“सॉरी
हं, तुम्हांला डुलकी नाही घेता आली.”
“काही
हरकंत नाही,” कपितोनवने म्हटलं.
प्रवासांत
बराच वेळ काही बोलणं नाही झालं – मॉस्कोपासून,
जिथे तो गाडीत बसला होता, म्हणजे, आधीपासूनंच
बसलेल्या त्यांच्याबरोबर – आणि जवळ-जवळ ओकूलोव्कापर्यंत. कुपेंत चौथा प्रवासी
नव्हता. तिचा मुलगा सम्पूर्ण प्रवासांत छोट्याश्या टेबलवर ‘दमीनो’च्या
फास्यांशी खेळंत होता, आणि कपितोनव वरच्या बर्थवर पडल्या-पडल्या छताकडे बघंत
होता, जी त्याच्या अगदी जवळ होती. आणि असं दाखवंत होती की जग
वाजवी नमुन्यांनीच बनलेलं आहे. तीन तासांपूर्वी,
ओकूलोव्काच्याही आधी, गरंज
नसतानाही, तर कंटाळवाणं झाल्यामुळे,
तो एकटाच ट्रेनच्या रेस्टॉरेन्टमधे
चालला गेला, जिथे असं बघून की तो तिथे एकटाच आहे, बीफ़स्टेक
खाऊन गेला आणि शंभर ग्राम कोन्याक पिऊन गेला,
जी खरं म्हणजे, कोन्याक
नव्हतीच, पण, चला, ठीक आहे. आणि जेव्हां परंत आला, तर
हस-या चेह-याच्या, थकलेल्या कुपेतल्या ह्या शेजारिणीने घरी बनवलेलं केक
त्याला दिलं, ती हट्टंच करू लागली,
की तिच्या आणि तिच्या मुलाबरोबर
त्याने कुपे-डिनर घेतलंच पाहिजे. आणि तेव्हां कपितोनवने तिच्यासमोर पहिली स्वीकृति
दिली: तो आत्ताच जेवून आलाय. मग तिने त्याला कित्येकदा
विचारलं : “आणि ह्या सगळ्याचं आम्ही काय करायचं?”
आणि त्याने उत्तर दिलं : आपल्या
बरोबर घेऊन जा”. थोडक्यांत बोलणं सुरू झालं. – “ज़ीना.” – “एव्गेनी.” ‘एव्गेनी
गेनादेविच’सुद्धां म्हणू शकंत होता,
जसं तो बहुधा सेमेस्टरच्या
सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वतःचा परिचय द्यायचा (जे खरंच आहे), पण
त्याने म्हटलं ‘एव्गेनी’ (खोटं तर नाही सांगितलं),
आणि ज़िनाइदा खूष झाली : “बघ, कसं
होतं,” तिने आपल्या मंदबुद्धि मुलाला म्हटलं. “आपण दोघं चाललो आहोत,
आणि आपल्याला हेपण माहीत नाहीये, की
कोणाबरोबर जातोय. अंकल झेन्या, तुझेच नामराशी आहेत.” तिच्या मुलाने खिदळंत अचानक आपला
हात कपितोनवसमोर करून त्याला चकीत केलं,
पण तो फक्त आपली बोटंच समोर करून
थांबला – खूपंच मरगळलेलं हस्तांदोलन झालं,
एकीकडूनंच, म्हणजे
कपितोनवकडून, पण अत्यंत प्रेमळपणे,
ज्याने ज़िनाइदाला आनंद व्हावा. जसं
काही त्यांच्यामधे काही घडलं होतं. कपितोनवला कळलं की ते लिपेत्स्कहून येताहेत
ज़िनाइदाच्या बहिणीला भेटायला, की ज़िनाइदाला आपल्या मुलाला सेंट पीटरबुर्ग दाखवायचं
आहे आणि हे की मुलाचं स्वप्न आहे – “लहानसं जहाज़” बघणं. त्याने खरोखरंच अनेक वेळा
म्हटलं ‘जआज़’. “अंकल झेन्याने जआज़ पाहिलंय कां?”
कपितोनवने
अनेकदा हे जहाज बघितलं होतं – एडमिरैल्टीच्या2 शिखरावर.
देवाची इच्छा असेल, तर अजूनही पाहील.
ज़िनाइदा
सांगंत होती स्वतः बद्दल, स्वतःच्या नव-याबद्दल,
ज्याच्याशी झेन्याच्या जन्मानंतर
डायवोर्स झाला होता, आणि जो मेटलर्जिकल प्लान्टमधे काम करंत होता, आणि
आणखीही ब-याच गोष्टी, ज्यांच्याशी कपितोनवला काही घेणं-देणं नव्हतं, आणि
तो ऐकंतपण नव्हता, पण एका क्षणी त्याला असं वाटलं, की
त्यालाही काहीतरी सांगायला हवं, आणि तेव्हां त्याने दुसरी स्वीकृति दिली – ह्याबद्दल
की तो अनिद्रेने त्रस्त आहे आणि दोन रात्रींपासून झोपलेला नाहीये. “ओह, आम्ही
डिस्टर्ब करतोय कां?” – “नाही, तुमच्यामुळे नाही”,
कपितोनवने म्हटलं, कारण
की त्याच्या स्वीकारोक्तीत काही इशारा नव्हता (आणि तिच्यात काही अर्थही नव्हता).
“तर मग झोपंत का नाहींये?” त्याने उत्तर दिलं : “झोप नाही येत.” आणि, ह्यावर
तिने म्हटलं : “तरीच, मी बघंत होते कि तुम्हीं कोणत्यातरी काळजींत असल्यासारखे
दिसताय”.
आणि
आता ती म्हणतेय:
“तुमचा
रिंगटोन किती मोठ्याने वाजतो!”
बोटाच्या
हालचालीने त्याने “बोलेरो”ला थांबवलं, जो लहानश्या जहाजाचं स्वप्न बघणा-या झेन्याला खूप
आवडला होता.
ओल्या
– ‘दुसरी’:
“येव्गेनी
गेनादेविच, काल तुमच्याशी मी बोलले होते, मीच
अद्लेरच्या ट्रेनमधे तुमचं रिज़र्वेशन केलं होतं,
आणि आमचे लोक कन्फ्यूज़ झाले, कार
तिकडे नाही पाठवली, मॉस्को स्टेशनवर पाठवून दिली, माफ
करा, पण आम्ही तुम्हांला रिसीव्ह करूं शकणार नाही...आमच्या
मदतीशिवाय तुम्हीं येऊं शकता कां?”
सगळं
ठीकंच आहे. त्याने स्वतःच काल सांगितलं होतं,
की त्याला घ्यायला नका पाठवू. ही
त्यांचीच कल्पना होती – कोणत्याही परिस्थितीत प्लेटफॉर्मवर त्याला रिसीव्ह करायचंच.
त्याच्याजवळ काही सामानही नाहीये, आणि त्याला माहितीये की मेट्रो म्हणजे काय असते.
ओल्या-दुसरी
जोरजोरांत म्हणंत होती:
“ऐका, तुम्हीं
इतके हुशार आहांत, तुम्हीं चांगलंच केलं की उद्घाटनाला नाही आले, इथे
तर अश्या-अश्या घटना होताहेत, तुम्हीं बघालंच,
आणि आता मी तुम्हांला सांगते की
हॉटेलपर्यंत कसं पोहोचायचं, तुम्हांला...”
गरज
नाहीये, त्याला माहितीये.
ओल्या, म्हणजे, कालची ओल्या, ‘दुसरी’ माहीत नाही कां आज खूप घाबरलेली
आहे, खूपंच लवकर-लवकर बोलतेय, बिल्कुल न थांबता, आणि इथे हा पुलसुद्धा
आहे – फिनलैण्ड-रेल्वेचा – आणि तिचे शब्द खडखडाटांत बुडताहेत. मन्दबुद्धि झेन्या
किंचित वर उठतो, ज्याने पांढरी शुभ्र नदी चांगली बघतां यावी. रुंद आहे नीवा, आणि पूर्णपणे बर्फाने
झाकलेली आहे.
कपितोनवला
काही तुटक-तुटक शब्द ऐकू येतात आणि त्यांच्यामधे - “आर्किटेक्ट”. आणि त्याच्यानंतर
ओल्या पुन्हां म्हणते - “आर्किटेक्ट”. त्याला कळतं की हे “आर्किटेक्ट” -
त्याच्यासाठीच आहे.
ट्रेन
हळू हळू पुलावरून चालली आहे, खडखड करंत. कपितोनव जवळ-जवळ किंचाळून म्हणतो :
“मी आर्किटेक्ट
नाहीये, मी मैथेमेटिशियन आहे!”
“कोण
मैथेमेटिशियन आहे?”
(हे
तर आश्चर्यंच झालं!)
“मी
– मैथेमेटिशियन आहे!”
“जआज़!
जआज़!” झेन्या चिडचिड करतोय, खरं तर काही जहाज़-बिहाज़ नाहीये आणि इथे असूंदेखील नाही शकंत.
फिनलैण्ड-ब्रिजच्या
फर्म्सचे समूह दिसताहेत.
“ओल्या, तुम्हीं कोणाला आणि कुठे
बोलावलं आहे? त्याच माणसाला, आणि त्याचं कॉन्फ्रेन्समधे बोलावलंय ना?”
“थांबा, मी पुन्हां फोन करते.”
“फार
छान,” कपितोनव म्हणाला.
उजवा
किनारा. वेग कमी होतोय – लवकरंच पोहोचू. वाट नाही बघावी लागली.
“येव्गेनी
गेनादेविच, तुम्हीं
तर उगाच मला घाबरवतांय, सगळं ठीक आहे, तुम्हीं मैथेमेटिशियन आहे, आर्किटेक्ट – तुम्हीं नाहीये, ते दुसरे आहेत, आज फक्त तुम्हीं दोघंच येता आहांत, मी थोडीशी कन्फ्यूज़ झाले, बस असाच विचार करत बसले, की मैथेमेटिशियन ते आहेत, आणि तुम्हीं आर्किटेक्ट आहांत, तर सगळं ठीक आहे, काही विचार नका करू, येऊन जा, आम्हीं सांभाळून घेऊं...”
मोबाइल
परंत ठेवून तो तयारी करूं लागतो – स्वेटर घालतो. खिडकीच्या बाहेर इण्डस्ट्रियल-ज़ोन
नवीन निर्माणांत मिसळलांय. कपितोनव स्वतःवर रागावतोय. जगाच्यासमोर तो स्वतःला
मैथेमेटिशियन म्हणायचे टालतो. स्वतःबद्दल हे सांगणं, की “मी मैथेमेटिशियन आहे” तसंच आहे, जसं “मी कवि आहे” किंवा “मी दार्शनिक आहे”. स्वतःबद्दल असं म्हणण्यासाठी
मुख्यतः स्वतःला कवि किंवा दार्शनिक समजणं जरूरी आहे. कपितोनव स्वतःला मुख्यतः
मैथेमेटिशियन नाही समजंत. जर कोणी विचारलं, तर स्वतःबद्दल सांगतो, “मैथेमेटिक्स शिकवतो” आणि त्याच्यापुढे बहुधा जोडून देतो : ‘मानविकी विभागांत”. ह्या देशांत
बरेंच लोक मैथेमेटिक्सला अनावश्यक विज्ञान समजतांत. तोसुद्धां हेच समजावण्याचा
प्रयत्न करतो, की एखादं निरर्थक काम करतो. आहेपण तसंच. मानविकीच्या विद्यार्थांना त्याची
जराही गरंज नाहीये. त्याला ह्याबद्दल खात्री आहे.
ज़िनाइदा
झेन्याचं सामान आवरतेय, दमीनोचे फासे डब्यांत ठेवतेय. कपितोनवकडे न बघता – जणु तिला विचारचंय की
लाडक्या, तुम्हीं, आधीच हे कां नाही
सांगितलं? – विचारूनंच
घेते:
“तर, तुम्ही मैथेमेटिशियन आहांत?”
जसं
तुम्हीं एखाद्या माणसाबरोबर चालले आहांत, आपलं हृदय त्याच्यासमोर मोकळं करता, स्वतःबद्दल तो जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवता, आणि नंतर तुम्हांला कळतं, की तो तर माणूसंच नाहीये, कोण्या दुस-या ग्रहावरचा
निवासी आहे.
“म्हणजे, मैथेमेटिक्सच्या कॉन्फ्रेन्सला
चाललेय?”
(आणि
हे असं घुमतं, जसं “दुस-या ग्रहाच्या”.)
कपितोनवला
मैथेमेटिक्सच्या कॉन्फ्रेन्सला नाही बोलावलंय (आणि दुस-या ग्रहाच्या कॉन्फ्रेन्सला
पण नाही). पण, चला, चालू
द्या.
“हो, मैथेमेटिक्सच्या” – तो
खोटं ठोकून देतो. “मग काय?”
नाही, काही नाही, ना तर डॉक्टर, ना माइनर, केमिकल इंजीनियरसुद्धां
नाही. ज़िनाइदाने रस्त्यांत स्वतःबद्दल सगळं सांगून टाकलं होतं, तोसुद्धां तिच्याशी जणु
मोकळाच झाला होता, पण आता असं वाटतंय की त्याने इतकी महत्वाची गोष्ट लपवली होती – तो
मैथेमेटिशियन आहे.
पण, पहिली गोष्ट, तो ब-याच काळापासून
मैथेमेटिशियन नाहीये – ह्या शब्दाचा खरा अर्थ लक्षांत घेतला तर, आणि दुसरी गोष्ट, त्याने सगळ्यांना कां
सांगंत बसावं, की तो मैथेमेटिशियन आहे?
आपल्याबद्दल
तसंही त्याने बरंच काही सांगून टाकलं होतं. आपल्याबद्दल – जेव्हां सुमारे
तासभरापूर्वी ते ‘मालाया विशेरा’हून जात होते (आणि ही कपितोनवची तिसरी स्वीकारोक्ति होती) : कसं त्याचं
आपल्या मुलीशी नेहमीसाठी भांडण झालं होतं, कशी बायको वारल्यानंतर मुलीशी त्याची नेहमी खटपटंच होत असते. त्याने न जाणे
कां, हेसुद्धां सांगून टाकलं, की काल मुलीने त्याला, आपल्या सख्या बापाला, कुठे पाठवलं होतं
(ज़िनाइदाने हात नाचवले). त्याला स्वतःकडून ह्या स्वीकारोक्तीची अपेक्षा नव्हती.
अनोळखी माणसांसमोर आपल्या मनांतलं सांगणं कपितोनवच्या नियमांत बसंत नव्हतं. आपल्या
माणसांसमोरसुद्धा तो मोकळेपणाने मनातली गोष्ट सांगत नव्हता. स्वतःला सुद्धां. ही
सगळी मानसिक परिस्थिति, हे सगळं अनिद्रेमुळे आहे. शेवटच्या क्षणाला तो ह्या अनावश्यक
कॉन्फ्रेन्ससाठी तयारंच अश्यासाठी झाला होता, की घरांतून पळतां यावे, परिस्थिति थोडीफार बदलू शकेल. आणि, त्याने हे सगळं, हिला कां सांगितलं? रेस्टॉरेन्टमधे घेतलेल्या शंभर ग्राम कोन्याकमुळे जीभ इतकी सैल झाली होती
कां? असं शक्य नव्हतं. हेपण
असूं शकतं, की
ह्या मंदबुद्धि नामराशीने आपल्या उपस्थितीने त्याच्यावर असा प्रभाव टाकला, की मालाया विशेराहून
जाताना कपितोनव इतका परिपक्व झाला की खुल्लमखुल्ला एका बापाच्या समस्या प्रदर्शित
करताना ज़िनाइदाचं समर्थन करून बसला. जणु इतरांच्या संकटांबद्दल ऐकून तिचं मन थोडं
शांत होईल. किंवा स्वतःच्या समस्यांसाठी तो एखादी पातळी शोधंत होता – ज्याने त्या
इतरांच्या समस्यांपेक्षा कमी भासाव्यांत? फू, कित्ती
खालच्या पातळीवर गेला होता कपितोनव. त्याने स्वतःसाठी सहानुभूति प्राप्त केली होती, पण कुणाची? – आणि आता हे बघून की
ज़िनाइदा जिने त्याच्या समस्यांना मनाला लावून घेतलंय, कशी आपल्या मोठ्या मुलाच्या हाफ-जैकेटच्या गुंड्या बंद करायला मदंत करतेय, त्याला आपल्या स्पष्टवक्तेपणावर
पश्चात्ताप होत होता, ज्याची कुणालांच गरज नव्हती.
स्वतःबद्दल
कपितोनवला येवढं माहीत होतं, की तो एक चांगला मैथेमेटिशियन आहे, - आणि ह्याच्यासाठी तो आपल्या मानसिकतेचा आभारी आहे. कपितोनवमधे सगळं सहन
करण्याची प्रवृत्ति आहे, जीवनाच्या परिस्थितींना डोक्यांत खुपसण्याची सवय आहे, किंवा, ह्याच्या उलट, त्यांच्यापासून असल्याच
अन्य काही परिस्थितींच्या मागे लपण्याची भावना आहे – आणि जसं जसं जीवन पुढे चाललंय, कपितोनव शून्यमनस्कतेनेमुळे
बेचैन होऊं लागतो – त्याचं डोकं पुरेसं उदासीन नाहीये.
16.39
“ट्रेन राइट-टाइम आहे,” कपितोनवच्या
खांद्यामागून निर्विकारपणे घोषणा होत आहे, तर कण्डक्टर
लवकर-लवकर (दार उघडलंय) कापडाने हैण्डल पुसते आहे.
प्लेटफॉर्मवर उभ्या
असलेल्या लोकांमधे कपितोनव ज़िनाइदाच्या बहिणीला अचूक ओळखतो. बाहेर निघतात – आणि
त्याला वाटतं,
की तो एका अनोळखी प्रकाराच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रांत पोहोचलाय
: ह्यांत आलिंगनं आहेत, आवाज आहेत, चुम्बनं
आहेत – पण हे सगळं कपितोनवच्या पाठीमागे होतंय : पुढे जाऊं या.
कम्पार्टमेन्टच्या कोंदटपणानंतर
बर्फाळ हवा जमल्यासारखी वाटतेय, आणि बर्फाच्या अभावांत हे अप्रत्याशित वाटतंय,
- एक छप्पर ह्या जागेला फेब्रुवारीच्या आकाशापासून संरक्षण देत आहे,
हिवाळ्याचे पोषाक वातावरणाला अनुरूप नाही वाटंत आहेत, म्हणजे, जर कोणी त्रयस्थ माणूस सिनेमाच्या
दर्शकाप्रमाणे प्लेटफॉर्मकडे नजर टाकेल,
तर फक्त एकंच गोष्ट त्याला हिवाळा असल्याची खात्री देऊं शकते :
श्वास सोडताना तोंडातूंन निघंत असलेली वाफ – असं कोणत्याच सिनेमांत दाखवणं शक्य
नाहीये.
वाफेच्या पहिल्याच ढगाने
फ़राओन खुफूची आठवण आली.
शाळेंतंच असताना कपितोनवने
कुठेतरी वाचलं होतं,
की श्वास आत घेताना आपण फ़राओन खुफूच्या मृत्युपूर्वी सोडलेल्या
श्वासाचा कमीत कमी एक अणु आपल्या आंत खेचतो, आणि तो इतका
घाबरला होता की त्याला ही गोष्ट आयुष्यभरासाठी लक्षांत राहिली, ह्याहूनही वाईट हे झालं, की – महान फ़राओन नेहमीसाठी
त्याच्या डोक्यांत राहून गेला: दर वेळेस जेव्हां कपितोनव उष्णतेतून गारव्यांत येतो,
त्याची आठवण होतेच, - तसा तो त्याला लगेच विसरतोसुद्धा.
मागच्या वेळेस तो
पीटरबुर्गला चार वर्षांपूर्वी आला होता, कोस्त्या मूखिनच्या
अंत्ययात्रेसाठी. पण तेव्हां उन्हाळा होता.
पीटरमधे मेट्रोचं भाडं
किती आहे? हो, इथे टोकन्स आहेत. तो विसरून गेला होता, की पीटरबुर्गच्या मेट्रोचे टोकन्स कसे दिसतांत. काउन्टरवर क्यू चाललाय,
आणि, एकदम चार विकंत घेऊन तो खिडकीतून
चिल्लरसह खेचून घेतो, ज्यांत टोकन्ससारखीच दहा-दहा रूबल्सची
नाणी जास्त आहेत. आरामांत गडबड होऊ शकते.
जी होतेच – तो गडबडला.
फिरत्या दारापाशी
नेहमीसारखा व्यत्यय. मॉस्कोच्या सवयीनुसार प्लास्टिक-टिकिट पकडलेला हात चेकिंग
मशीनकडे वाकायला तैयार (कपितोनवला माहीत आहे, की ह्या वस्तूला काय म्हणतात),
पण, बस, त्याच्या हातांत
टिकिट नाहीये, - तो मशीनीच्या आत टोकन टाकतो, पण खरं म्हणजे – विसरभोळेपणामुळे – दहा रूबल्सचे नाणेच टाकून देतो आणि
समजू शकंत नाही की मशीन त्याचं नाणं परंत कां करंत आहे. पुन्हां प्रयत्न करतो –
पुन्हां तेच. कपितोनव वैतागतो आणि बाजूच्या फिरत्या दाराकडे जातो, आणखी एका वैध टोकनची वाट पाहणा-या मशीनींत दुसरं दहा रूबल्सचं नाणं टाकतो –
मग आजूबाजूला नजर टाकतो (नमस्ते, बॉर्डर्सच्या, प्रवेशद्वारांच्या, आणि पांढ-या ब्रेडच्या संदर्भांत
‘बन्स’च्या शहरा!)3 ,
आणि त्याची नजर पोलिसवाल्याकडे जाते. तो चुकला नव्हता : एकीकडे
सरकण्याचा इशारा त्याच्यासाठीच होता.
ते, खरं
म्हणजे, दोघं आहेत. पासपोर्ट दाखवायला सांगतात.
“मी मॉस्कोहून आलोय,” कपितोनवने
अनिच्छेने बाकीच्या ‘साउथ’कडून आलेल्या
प्रवाश्यांपासून दूर होत म्हटलं, ज्यांचा मोट्ठा घोळकाच
फिरत्या दारांत घुसतोय होता आणि कोणच्याही प्रकारच्या शंकेला वाव देत नाहीये.
“तर मग मॉस्को स्टेशनवर
कां नाही गेले?”
“कारण की लादोझ्स्कीवर
आलोय.”
“पण मॉस्को स्टेशन जास्त
सोयिस्कर आहे.”
“असेल.”
“मॉस्को – आपल्या देशाची
राजधानी आहे,”
विचारांत गढून पोलिसवाला पासपोर्टचं एड्रेसचं पान उघडून आपल्या
बरोबरच्या पोलिसवाल्याला सांगतो (त्या दोघांना नक्कीच कंटाळवाणं झालंय). “इथे
येण्याचा उद्देश्य, जर गुपित नसेल तर?”
“कॉन्फ्रेन्स,” कपितोनवने
उत्तर दिलं. “काय, हे आहे तरी काय? काय
आपलं सरकार पोलिस झालं आहे कां? की मी काही वेगळा दिसतोय?”
“तुम्हीं विचित्रपणे
वागतांय. आणि ही कसली कॉन्फ्रेन्स आहे? तुम्हीं उत्तर देण्यास नकारपण देऊं
शकता.”
“एका
संस्थेची आहे,” कपितोनव फक्त अश्यासाठी उत्तर देतोय, कारण की “उत्तर देण्यास नकार देऊं शकता” ऐकू आलं होतं, आणि वरून तो कागदावर छापलेलं आमंत्रणपण दाखवून देतो, हा विचार करून की अश्याने त्याला अन्य काही स्पष्टीकरण नाही द्यावे
लागणार.
“व्वा!”
पोलिसवाला म्हणतो, “चांगल्याचं ओळखीची कॉन्फ्रेन्स आहे.”
“खरंच कां?” कपितोनवचा
त्याच्यावर विश्वास नाही बसंत. “तुमच्याकडे त्याबद्दल काही माहिती आहे कां?”
“ही तीच तर आहे, जिला
उडवून देणार होते,” पोलिसवाला दुस-या पोलिसवाल्याला आमंत्रण
दाखवतो.
“कोणत्या अर्थाने?” कपितोनवला
काही कळंत नाही.
“अर्थसुद्धां आणि
माहितीसुद्धां,”
पहिल्यावाला सगळ्यांच एकदमंच उत्तर देतो, दुसरा
पोलिसवाला आमंत्रणाकडे असा बघंत होता, जसं एखादं भूत बघतोय.
“म्हणजे तुम्हीं न्यूज़मधे नाही ऐकलं कां?”
“कोण उडवणार होतं?” कपितोनव
एकदम चित झाला.
“तसेच जोकर, जसे
तुम्हीं आहांत.”
“असेच मैजिशियन्स,” दुस-याने
‘री’ ओढली, आणि
माहीत नाही कां, दोघं हसू लागले.
कागद परंत करंताना त्याला
जाऊ देतात, पहिल्याच्या तोंडातूंन निघतं:
“स्वतःची काळजी घ्या.”
कपितोनव फिरत्या दाराकडे परत येतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें