सिर्गेइ
नोसव
धनु-कोष्ठक
मराठी भाषांतर
आ. चारुमति रामदास
“मला काही सांगायचंय!”
भारतांत मी
फक्त एकदांच गेलेलो आहे, आणि विश्वास ठेवा,
माझं भारतावर अतिशय प्रेम बसलंय.
ह्या
कादम्बरीचं कथानक हिवाळ्यांत बर्फाळ, बर्फाने झाकलेल्या अश्या उत्तरी शहर पीटरबुर्गमधे
घडतंय, पण ऊबशीर असलेल्या भारताचा उल्लेख कादम्बरींत एकदा झालेला
आहे : असं वाटतं, की कादम्बरीचे काही पात्र (जादुगार, ऐंद्रजालिक)
भारताला भेट देऊन आलेत - फकीरांच्या कोणत्यातरी गूढ उत्सवासाठी.
मला
लहानपणापासूनंच माहीत आहे, की अंक, ज्यांच्या उपयोग आपण करतो,
आमच्याकडे भारतांतून आलेले आहेत. असं
म्हणतांत की ‘शून्य’ ह्या संख्येचा आविष्कारसुद्धां भारतीय विद्वानांनीच
केला आहे, जे गंगेचा काठावर ध्यानांत मग्न असायचे.
म्हणजेच, भारताशिवायतर
माझी कादम्बरी लिहिणं शक्यंच नव्हतं, कारण की तिचा नायक – मैथेमेटिशियन आहे.
पण
मैथेमेटिक्स ह्या कादम्बरींत नाहीये.
लेखकासाठी
हे समजावणं कठीण आहे, की त्याने कशाबद्दल लिहिलंय.
सगळ्यांत
सोपं, म्हणजे असं सांगणं आहे,
की कादम्बरी पलायन करण्याच्या
अशक्यतेबद्दल आहे – स्वतःपासून आणि आपल्या वर्तमानापासून, वास्तविकतेपासून, मग
ती कितीही आकर्षक कां न असो, आपल्या स्वतःच्या (वैयक्तिक) आणि तसंच आपल्या सामान्य
भूतकाळापासून. पळून गेल्यावर लपण्यासाठी कोणची जागांच नाहीये, असे
‘धनु कोष्ठक’
नाहीतंच,
जे कोण्या व्यक्तीला आपल्या अहंभावाच्या
बंद कोषांत सुखी राहण्याची परवानगी देऊं शकतील.
पण, मला
वाटतं, की मी काहीतरी सोपं केलंय.
कदाचित, ही
कादम्बरी सोपेपणाबद्दल आणि क्लिष्टतेबद्दल असेल?
अश्या भोळ्या-भाबड्या सत्याबद्दल, ज्याच्याकडे,
जीवनाला अत्यंट क्लिष्ट करण्याच्या नादांत बघण्याची आपली इच्छांच नाहीये?
मला
आठवतंय, की शाळेंत असताना आम्हांला गणितं द्यायचे : एल्जिब्राचे
(बीज गणिताचे) भारी-भरकम एक्सप्रेशन्स (पदांना) सोडवण्याचे. हा आहे फ्रैक्शनल नंबर
(अपूर्णांक), न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे, तुम्हीं
त्याच्या भागांना एक-एक करून सोपं करता,
परिणामाला कोष्ठकांच्या बाहेर आणता, परिणाम
मिळवंत जाता, आणि एका सुखद क्षणी हा अपूर्णांक लहान होत-होत शेवटी
एक सोपं उत्तर देऊनंच टाकतो. अगदीच सोप्पं. मग त्या कोष्ठकांमधे काहीही असलं तरी
फरंक काय पडणारेय. संपलं – स्वप्नासारखं.
जेव्हां
मी “धनु कोष्ठक” लिहीत होतो, तेव्हां बीजगणिताचं हेच दुरूह पद – जे वर-वर बघताना
क्लिष्ट, चतुर, भयानकपणे बोजंड वाटतं,
शेवटी एका सोप्या, मानवीय
अभिव्यक्तीच्या रूपांत परिवर्तित होऊन जातं – माझ्यासाठी रूपकांत परिवर्तित झालं:
“तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
आणखी
काय लिहूं?
मला
वाटतं की माझी कादम्बरी प्रेमाबद्दल आहे,
तसं बघितलं तर सम्पूर्ण कादम्बरींत
प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा होत असते, फक्त ह्याबद्दलंच नाही (हा विषय कोष्ठकांमधे बंद आहे
कां?)
आणि, कदाचित
काळाबद्दलसुद्धां, वर्तमान काळाबद्दल,
ज्यांत आपण सगळे राहातोय. अपरिभाषित
क्षेत्रांबद्दल ज्यांत आपणासगळ्यांना जायचंच आहे : कोण सांगू शकतो, की
उद्या काय होईल आणि परवा? आणि तसंच – जीवनाबद्दल सुद्धां, ज्याला
फक्त एकदांच, एक आश्चर्य समजूनंच जगलं पाहिजे.
जर
मला कोणी म्हणतं, की कादम्बरी ह्याबद्दल नाहीये (कधी-कधी मला
विचारण्यांत येतं, की “धनु-कोष्ठक” कशाबद्दल आहे), तर
मी लगेच, आणि आनंदाने ‘हो’ म्हणून टाकतो. मला वाटतं,
की वाचकाला जास्त कळतंय – तो बरोबर
असेल.
माझ्या
कादम्बरीची निवड करून, लक्ष देऊन वाचल्याबद्दल आणि “धनु कोष्ठका”चं मराठीत
भाषांतर करण्यासाठी मी डा. चारुमति रामदास ह्यांचा अत्यंत आभारी आहे.
त्या
सगळ्यांना परोक्ष रूपाने धन्यवाद, ज्यांनी आतापर्यंत हिला वाचलं नाहीये, पण
वाचणार आहेत.
तर, प्रिय
वाचक, कादम्बरीकडे जाऊं या...नंतर चर्चा करूं.
सिर्गेइ नोसव
प्रस्तावना
सिर्गेइ नोसव
आधुनिक रशियन लेखक, नाटककार
आणि निबन्धकार आहेत. त्यांना पीटरबुर्गचे प्रमुख आधुनिकोत्तर (पोस्टमॉडर्न) लेखक
म्हणून ओळखतांत, त्यांना एक्ज़िस्टेन्शियलिस्ट (अस्तित्ववादी)
म्हणूनसुद्धां ओळखलं जातं.
सिर्गेइ
नोसवचा जन्म 19 फेब्रुवारी 1957ला पीटरबुर्गमधे झाला. त्यांने विमानंन साधन
इन्स्टिट्यूटमधे शिक्षा ग्रहण केली. सुरुवातीचे काही वर्ष विमानंन साधनाच्या
क्षेत्रांतदेखील काम केलं, मग पत्रकारितेकडे वळले. रेडिओवर सुद्धां काम केलं.
साहित्यिक
इन्स्टीट्यूटमधे शिक्षण घेत असताना त्यांने काही कविता लिहिल्या होत्या, ज्या
त्यांनी जाळून टाकल्या. सन् 1980मधे ‘अव्रोरा’ नावाच्या पत्रिकेत
त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या. पहिलं पुस्तक “खाली,
नक्षत्रांच्या खाली” सन् 1990मधे
प्रकाशित झालं.
सिर्गेइ
नोसवचं नाव अनेक वेळां “नेशनल बेस्टसेलर”च्या आणि “रशियन बुकर”च्या अंतिम फेरींत आलेलं
होतं. आणखी एका महत्वपूर्ण पुरस्काराच्या – “बिग बुक”च्या अंतिम फेरींत सुद्धां त्यांचा समावेश होता, सन्
1998मधे त्यांना पत्रकारितेसाठी ‘गोल्डन पेन’
पुरस्कार देण्यांत आला होता.
“धनु
कोष्ठक”ला सन् 2015चं ‘नेशनल बेस्टसेलर’
घोषित करण्यांत आलं होतं.
सिर्गेइ
नोसवने सुमारे वीसपेक्षां जास्त नाटकं लिहिली आहेत,
आणि ती सगळीचं वेळोवेळी दाखवण्यांत
येतात. ‘धनु-कोष्ठक’
वाचतानासुद्धां तुम्हांला असं वाटेल, जणु
एखादं नाटक किंवा कॉमेन्ट्री चालू आहे.
त्यांने
आतापर्यंत सहा कादम्ब-या लिहिल्या आहेत : फ्रांत्सुआज़ा किंवा ग्लेशियरची यात्रा’, ‘मला एक माकड द्या’,
‘पक्षी उडून गेलेत’, ‘समाजाचा सदस्य किंवा उपासमारीचा काळ’, ‘दीड ससा’ आणि ‘धनु कोष्ठक’.
त्यांचं
पुस्तक ‘पीटर्सबुर्गच्या स्मारकांचं गूढ जीवन’
बरंच प्रसिद्ध झालंय.
सिर्गेइ
नोसवला युद्धाशी संबंधित कथांमधे, विस्थापितांची पीडा दाखवण्यांत, ऐतिहासिक
कथांच्या पुनर्मूल्यांकनांत अजिबात गोडी नाहीये. नोसव – शांत स्वभावाचे लेखक आहेत.
त्यांची रुचि आहे जीवनाच्या लहानसहान प्रसंगांमधे – एक प्राइवेट व्यक्ति, आपल्या
सगळ्या अडनीड सवयींबरोबर – फुकटचे अपमान,
मनोरंजक फोबिया, आणि
विचित्र निष्कर्षांची पोतडी घेतलेला – हा आहे त्यांचा नायक.
धनु-कोष्ठकाचा
नायकपण ह्याच विचित्रपणांत गुंफलेला आहे. सम्पूर्ण कथानकंच न जाणे काय
आहे...वाचताना तुम्हांला कदाचित असं वाटेल की,
‘हे काय वाचतोय’; पण पुस्तक हातांतून सुटणार नाही, तुम्हीं
पूर्ण कादम्बरी वाचाल; मग तिला समजण्यासाठी पुन्हां एकदा, पुन्हां
एकदा...प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडेल. सगळंकाही जणु समोर, हातावरंच
ठेवलेलं आहे, पण त्यांत ‘काहीतरी’ शोधायचा प्रयत्न कराल.
“धनु-कोष्ठक”
वाचून प्रत्येक वाचक आपापला निष्कर्ष काढेल...
कादम्बरीचा
नायक कपितोनव एक मैथेमेटिशियन आहे, जो दोन अंकांच्या संख्या ओळखू शकतो. कपितोनवला ‘रिमोटिस्ट-मेंटलिस्ट’ची
पदवी देऊन जादुगारांच्या वार्षिक कॉन्फ्रेन्समधे बोलावण्यांत येतं. ह्याच
कॉन्फ्रेन्समधे भाग घेण्यासाठी तो मॉस्कोहून पीटरबुर्गला चाललांय. आधी तो
पीटरबुर्गमधेच राहायचा, पण आता मॉस्कोच्या एका इन्स्टीट्यूटमधे मैथेमेटिक्स
शिकवतोय. ‘धनु- कोष्ठक’
जणु ह्या दोन दिवसांच्या
कॉन्फ्रेन्सचे ‘मिनट्स’ आहेत. कपितोनोवच्या शनिवारी पीटर्सबुर्गला
पोहोचल्यापासून ते सोमवारी परंत मॉस्कोसाठी विमानाची वाट बघेपर्यंतच्या काळाच्या
एक-एक मिनिटाचा हिशेब आहे. कादम्बरीची वाटचाल अगदी घडाळ्याच्या वेळेप्रमाणे होत
असते...
पीटरबुर्गमधे
त्याच्या दिवंगत मित्र - मूखिनची बायको,
मरीना,
त्याला एक नोटबुक देते. मरीनाच्या
म्हणण्याप्रमाणे, मूखिनने ही टिपणं आपल्या जीवनाच्या शेवटच्या काही
दिवसांत लिहिली होती – नोटबुक वाचताना हे स्पष्ट होतं,
की तो खरा मूखिन नव्हतांच, तर
ह्याने त्याला प्रतिस्थापित केलं होतं. तर,
जो मेला होता, ज्याच्या
अंतिम यात्रेंत हजर राहायला कपितोनोव आला होता,
तो कोण होता? आणि
ख-या मूखिनचं काय झालं?
अश्या
प्रकारच्या ‘गायब’ होण्याच्या,
‘प्रतिस्थापित’ व्हायच्या
अनेक घटना आहेत : डिनरच्या वेळेस सगळ्यांच्या प्लेट्समधून कोबीचे कटलेट्स गायब
होतात, कपितोनोवची ब्रीफकेस गायब होते, आणि
जी ब्रीफकेस त्याला सापडते, तिच्यांत हे कोबीचे कटलेट्स सापडतांत; मूखिनची
नोटबुक गायब होते आणि महाशय ओझा तिला मरीनाकडे पोहोचवतांत…शेवटच्या दृश्यांत
जेव्हां कपितोनोवबरोबर प्रवास करणारी महिला त्याला सांगते, की
ते एक आठवडा पीटर्सबुर्गमधे थांबले होते,
तेव्हां वाचकाच्या मनांत नक्कीच
विचार येतो की कपितोनोवचे पाच दिवस कुठे गेलेत,
तो तर फक्त दोन दिवसांसाठीच
पीटर्सबुर्गला आला होता, आणि ठरल्याप्रमाणेच परंत चालला होता, मग
हे पाच दिवस कपितोनोव कुठे गायब झाला होता कां की त्याचा वेळ ‘कालभक्षकाने’ खाऊन
टाकला?
“तलाव’ कां
मरतो? मूखिनला प्रतिस्थापित करणारा, मूखिन
सारखांच, पण मूखिन नसलेला – कोण होता, तो
कां मूखिन बनून राहात होता, त्याला काय करायचं होतं,
ह्यापूर्वी तो कुठे होता, ह्यानंतर
तो कुठे जाईल?
विश्वास
ठेवा, तुम्हीं नक्कीच स्वतःला हे प्रश्न विचाराल. लेखक उत्तर
नाही देत, तो काहीच नाहीं म्हणंत...
पण
ह्या ‘साम्याबद्दल” कादम्बरीत अनेकदा इंगित केलं जातं.
मग, कादम्बरींत
काही लोक मरतात – दोन कादम्बरीच्या कथानकाच्या पूर्वी आणि एक-कथानक चालू असताना...
कपितोनोव
ह्या दोन (किंवा पाच) दिवसांत अनिद्रेने ग्रासला आहे. त्याला फक्त आभासंच होतांत...
जादुगारांची
कॉन्फ्रेन्स आपल्या इतर कॉन्फ्रेन्ससारखीच आहे...
म्हणजे, लेखकाला काहीतरी ‘दाखवायचं’ आहे, पण
तो दाखवंत नाहीये.
मग
‘धनु-कोष्ठक’
कशासाठी?
मूखिन सारख्या (अ)मूखिनने त्यांचा प्रयोग
केला आहे, तो हे म्हणतो,
की ‘धनु-कोष्ठक’
तिस-या पातळीची सुरक्षा प्रदान
करतात. त्यांचा उपयोग केल्यामुळे ‘ह्या’ मूखिनच्या विचारांपर्यंत कोणी पोहोचूं शकणार नाही.
नोसवच्या
ह्या कादम्बरींत कधी-कधी निकोलाय गोगलची (पात्रांची नावं, सूक्ष्म
व्यंग), दस्तयेव्स्कीची (त्याची कादम्बरी ‘डबल’)
आणि बुल्गाकोवची (जादूच्या प्रयोगांची) ओझरती झलक दिसते.
नोसवचे
व्यंग अगदी निष्पाप, पण धारदार आहे. भाषा अत्यंत सोपी, नेहमीच्या
वापराची, म्हणून असे बरेचशे वाक्य सापडतील, जे
सम्पूर्ण जगांत बोलले जातांत. पण भाषेचे जसे प्रयोग नोसव करतात, ते
कथानकाला काहीसं गुंतागुंतीचं, काहीसं सोपं करतांत...
आधुनिक
रशियन साहित्यांत अश्या प्रकारच्या रचना लिहिल्या जात आहेत, आणि
त्यांना ‘बेस्ट-सेलर’चा मान मिळतोय,
ही जाणीव सुखद आहे.
नोसवच्या
ह्या कादम्बरीचं भाषांतर करणं सोपं नव्हतं...सगळ्या विचित्र, भलत्यांच, वेड्यावाकड्या
गोष्टी ‘भलत्यांच’ वाटू द्यायच्या होत्या,
कादम्बरीच्या ‘वेळेला’
(काळाला) अगदी तस्संच राहूं द्यायचं होतं, नावांसाठी
मराठीत विकल्प शोधणं, गढणं...
भाषांतर
वाचून आपण प्रतिक्रिया नक्की द्या!
भाषांतराच्या
काळांत माझे पति डा. रामदास आकेळ्ळा, मुलगा – अभिजित,
सून- वन्दना आणि नातू – श्रेयसने
खूपंच साहाय्य केलं. शब्दांत त्यांचे आभार प्रकट करतां येणार नाही. ह्यांचं
प्रोत्साहन आणि मदतंच माझ्यासाठी प्रेरणेचं स्त्रोत आहे. थैंक्यू सो मच!
हैदराबाद
चारुमति रामदास
“आधी आमचं शहर ह्या दृष्टीने जास्त सुखी होतं,” – आपले छोटे छोटे बारीक करून धगधगत्या
कोळश्यांकडे बघंत शरामीकिन म्हणतो. “एकसुद्धां हिवाळा असा नाही जायचा, जेव्हां
कोणी प्रसिद्ध व्यक्ति इथे आला नाही. कधी कोणी प्रसिद्ध कलाकार, कधी
कोणी गायक...पण आता...सैतानंच जाणे काय झालंय, जादुगार आणि हार्मोनियम वाजवणा-यांशिवाय आणखी कोणी
येतंच नाही.
- अंतोन चेखव “सजीव कैलेण्डर”
गेले दिवस आणि गेल्या रात्री.
गेले दिवस आणि गेल्या रात्री.
सळसळली पानं.
- अलेक्सांद्र व्वेदेन्स्की

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें