मला आठवलं – अगदी लहान
कोस्त्या, उन्हाळ्याच्या, जुलैच्याच संध्याकाळी कामेन्का
नदीच्या काठावर, वय वर्षे सहा, तो
आत्तांच ‘हुक’ला कीडा अडकवणं शिकलाय;
वडील, ज्यांच्याकडेपण मासेमारीची काठी होती,
कोस्त्याच्या नावेवर सतर्क नजर ठेवून होते. तोंड मारल्याचा भास
झाला. वेताची लांब काठी मूखिनच्या समोर वाकते. त्याने जीवनात आपली पहिली मासळी बाहेर
काढली.
मी मूखिनला आपल्या तरुण
मित्रांबरोबर वनस्पति आणि प्राणिमित्रांच्या सोसाइटीत प्रवेश करताना बघितलं होतं.
ती रात्र, जेव्हां तो वयस्क झाला होता, जेव्हां त्याने
मूर्खपणाने ट्रेन थांबवली होती. एका धुन्द सकाळी त्याला आपलं कौमार्यत्व गमावताना
पाहिलं होतं. बघितलं होतं की मूखिन कसा शिळेवर रांगंत होता. कसा तो पू वाहत
असलेल्या एपेंडिक्समुळे तडफडंत दवाखान्यांत पडला होता.
पू निघंत असलेलं एपेंडिक्स
सगळ्यांत अप्रिय आठवण नाहीये. माझ्या बौद्धिक नजरेला दिसतोय एका दोनमजली बैरेकमधे
जात असलेला मूखिन;
चरमरंत असलेल्या पाय-या, रेल्वे-कर्मचा-यांचा
दिवस, रिकामा कॉरीडोर, सगळे लोक बाहेर
आहेत, त्याने दार उघडलं, ज्याच्यावर
चाकूने एक फालतू शब्द ‘शलगम’ कोरलेला
होता. लवकर-लवकर परंत चालला जातो. तासभरानंतर तो रेस्टॉरेन्ट-कारमधे वोद्का पिताना
दिसेल, विसरण्यासाठी. स्वतःला विसरण्यासाठी. अंशतः तो ह्यांत
सफलपण होतो.
मूखिन मूखिनंच होता.
मला मूखिनबद्दल ते सगळं
नाही आठवायचंय,
जे त्याला कधीही आठवावंसं नव्हतं वाटंत.
खाली लॉनवर राख झटकंत मी
दुस-या टोकाने विचार करायला सुरुवात केली, किंवा सोप्या शब्दांत सांगायचं
झालं तर - - : शेवटपासून, न की सुरुवातीपासून. काही तरी मला
सांगंत होतं की हे इतक्यांतच झालंय.
मला एक ‘शॉकिंग’
घटना आठवली, कारण की ती मला ‘शॉक’सहित आठवली होती - - : चक्क, स्पष्ट, विरोधाभासासकट, जणु ती
आत्ताच घटित होत आहे - - : माझ्या डोक्यांत नाही, तर
मूखिनच्या किचनमधे (तेव्हां, जेव्हां मी अजून बाल्कनींतच होतो).
आमच्या - - : माझ्या? त्याच्या - - : बायकोशी गोष्टी चालल्या
होत्या - -: पुन्हां - - : काय त्याच्या? काय माझ्या बायकोशी?
- - : हे निर्भर करतं.
मूखिन शून्यांत बघंत होता.
गोष्ट मागच्याच्या मागच्या
आठवड्याची आहे,
पण मागच्याच्या मागच्या बुधवारची नाही, तर
तिस-या बुधवारच्या आधीची. मी नंतर मोजलं होतं - - : पंधरा दिवसांपूर्वी, म्हणजे ह्या गुरुवारपासून, किंवा एकोणीस दिवस आधी,
जर आजपासून मोजलं तर, आणि आज, जेव्हां मी हे लिहितोय, रविवार आहे.
मूखिन शून्यांत बघंत होता.
चूक होण्याची भीति आहे,
पण, माझ्या मते, त्याला
आपल्या बायकोला सांगायचं होतं की त्या दिवशी कामावर हा प्रश्न ऐकून कसा स्तब्ध
झाला होता - - : तो कुणाची हत्या करूं शकतो कां. जसं की, सावत्र
वडिलांची. त्याचातर कधी सावत्र बाप नव्हताच. गमतीचं सार हे
आहे, की असिस्टेन्ट अलीनाला एन्थ्रोपोमेट्रिक-रिसर्चच्या
फाइलमधले फोटो बघंत असताना हे कळलं की एका गुन्हेगाराचे नाक-डोळे अगदी मूखिनसारखे
आहेत. वयांत अंतर असून देखील (मूखिन बरांच मोठा होता), डोळ्यांच्या
मधलं अंतर आणि हनुवटीच्या उंचीच प्रमाण एक सारखं होतं (तसं, इथे
वयाचं मुश्किलीनेच काही मह्त्व आहे). सगळ्यांना हे ऐकून खूप गंमत वाटली, पण मूखिनला संताप आला; आपल्या रंग-रूपाबद्दल तो बराच
गंभीर होता आणि जर त्यावर कुणी टोमणा मारला, तर त्याला आवडंत
नव्हतं.
पण, मला ह्या
गोष्टीची खात्री करायची नाहीये, की त्याला खरंच बायकोला हे
सगळं सांगायचं होतं, पण ही गोष्ट, की
शून्यांत बघंत (आणि किचनमधे हजर राहून) तो ह्याचबद्दल विचार करंत होता - - : ही
अशी वस्तुस्थिति आहे, जिच्या सत्यतेची मी ग्यारंटी घेऊं
शकतो.
टी.वी.वर गैसच्या
किंमतीबद्दल सांगंत होते.
“चहा की कॉफी?” (बायकोने
विचारलं).
उत्तर दिलं - - :
“चहा”.
“की कॉफी?”
उत्तर दिलं - - :
“कॉफी”.
“मी तुला विचारलंय की तू
काय पिणारेय,
आणि तू काय उत्तर देतोयेस?”
“मी उत्तरंच देतोय, की काय
प्यायचंय.”
“विचारतेय - - : चहा? तू - - :
चहा. विचारते - - : कॉफी? तू - - : कॉफी.”
“तर मग तू कॉफीबद्दल कां
विचारतेयस, जेव्हां की मी उत्तर देऊन चुकलोय, की कॉफी पिणारे.”
“टॉमेटो-जूस पी. उपयुक्त
आहे.”
“मला टॉमेटो-जूस नकोय. मला
एकटं सोडं. मला चहाही नको, आणि कॉफीसुद्धां नकोय.”
“तुला स्वतःलाच माहीत
नाहीये, की तुला काय नकोय. आणि, काय हवंय, हेसुद्धां नाही माहीत, तुला काहीच नकोय! - - : तुला
काहीही नकोय! - - :...काहीही नाही! - - : ...काही नाही – येवढसंसुद्धा नाही! - -
:”
हे शब्द माझ्यासाठी
म्हटलेले होते. आधीचा मूखिन ते ऐकंत नव्हता. आधीचा मूखिन झपाट्याने गायब होत चालला
होता, मी त्याला प्रतिस्थापित करंत होतो, पुन्हां त्याचं
रूप घेत होतो. त्याने दात खाल्ले आणि बाहेर निघून गेला. हो, मी
बाल्कनीत आलो, उभा राहिलो, जसा आता उभा
आहे, आणि सिगरेट पीत राहिलो, घरांच्या
छप्परांकडे बघंत, जसा आता बघतोय. हा होतो मी! आणि हे झालं
होतं मागच्याच्या मागच्या आठवड्याच्या बुधवारी! तेव्हांच मी समजलो होतो, की हे सगळं कसं झालं! (आणि, हे मला समजलं गुरुवारी!)
माणसाचे शेवटचे शब्द नेहमी
महत्वपूर्ण असतात. जसे मूखिनचे - - : “मला एकटं सोड. मला चहाही नको, आणि
कॉफीसुद्धां नकोय!” - - : हे त्याचे शेवटचे शब्द होते. तेव्हांच तो गायब झाला,
खरं म्हटलं तर, मुक्त झाला, आणि मी हे शब्द विसरूं शकंत नव्हतो.
बाहेरच्या जगांत ह्या
काळांत काहीही नाही झालं - - : ना तर घड्याळ थांबली, ना बल्ब फ्यूज़ झाला,
ना कॉर्निस पडली, जिच्यावर पडदा टांगतात.
टी.वी.लापण स्विच-ऑफ करणं, किंवा स्क्रीनवर एखादी असाधारण
गोष्ट दाखवणं ज़रूरी नाही वाटलं. कॉफीसुद्धा पळून गेली नाही. आणि, काय कॉफी होती? आणि, काय मूखिन
होता? (मला विचारावसं वाटतंय).
जर मूखिन खरंच होता, तर मला
माहीत करायचंय, की काय गायब होताना त्याने स्वतः काही
अनुभवलं होतं.
जसं, मी,
त्याला प्रतिस्थापित करताना, काहीच अनुभवलं
नव्हतं. बेपर्वाईचा माझ्यावर पगडा बसला होता. बाल्कनीत उभा होतो आणि काहीही
अनुभवंत नव्हतो; उंची आणि तिने घाबरण्याच्या आवश्यकतेला पण
अनुभव नव्हतो करंत.
बस, हीच ती
सीमा होती - - : मी मूखिनला प्रतिस्थापित करंत होतो, तोपर्यंत
हे न समजतां, की मी काय करतो आहे.
त्याला प्रतिस्थापित
केल्यावर तब्बल पंधरा दिवस मी समजूं नाही शकलो, की मी मूखिन नाहीये!
कदाचित, मी विचार
केला, कि पहिल्यासारखांच मूखिन आहे आणि विशेष असं काही
घडलेलं नाहीये.
कदाचित, ह्या दोन
आठवड्यांत मी जुन्या मूखिनच्या तुलनेंत जास्तच ‘तुमचं सुख’
मनोरंजन केन्द्रांत जाऊन ‘एका हाताच्या
दरोडेखोराशी’ एकटाच युद्ध करंत राहिलो.
सोमवारी संध्याकाळी
शॉपिंगसाठी दिलेली रक्कम हरलो - - : एक-एक कोपेक, आणि मंगळवारी आपली
बचतसुद्धां, जी मी घरून घेऊन गेलो होतो.
पण ही गोष्ट मला केव्हां
समजली, ह्याबद्दल मी आधीच लिहिलंय.}}}
{{{ हो,
स्वीकार करावं लागेल - - : मूखिनला लूडोमैनिया22 होता,
त्याच्यानंतर मी सुद्धां थोडा-सा लूडोमैनियाक झालोय. आतापर्यंत मला
पूर्ण खात्री नाही झालीये, की खरोखरंच मी कितपत लूडोमैनियाक
आहे, तसे सगळे लक्षण स्पष्ट आहेत, पण
आशा हे, की, तरीही, मी मूखिन इतका लूडोमैनियाक नाहीये. वास्तविकतेला समजण्याच्या माझ्या
योग्यतेमुळे ही आशा मला प्राप्त होते - - : बहुधा लूडोमैनियाक ही गोष्ट स्वीकार
नाही करंत, की ते लूडोमैनियाक आहेत, पण
मी तर स्वीकार करतो - - : हो, मी लूडोमैनियाक आहे, कदाचित टिपिकल नसेन, पण आहे तर लूडोमैनियाकंच,
आणि निःसंदेह मूखिनच्या लूडोमैनियाला मी मान्य करतो.
आणखी एक गोष्ट, हे सांगणं
म्हणजे अतिशयोक्ति होईल, की मला लूडोमैनियाचा त्रास होतो;
येवढंच पुरे आहे, की तो माझ्यांत आहे; जर कुणाला त्रास होत असला, तर ती आहे माझी बायको,
तसं, जेव्हां माझी बायको मूखिनची बायको होती,
ती, मला वाटतं की बरींच त्रासून जायची. वाद
घालण्यासारखं काहीच नाहीये - - : तिने माझ्या जुगारांच्या खेळांच्या माझ्या
आवडीमुळे (माझ्या वर्तमान क्षमतेंत) तेवढं दुःख नाही झेललं, जितकं
मूखिनच्या आवडीमुळे, आणि मुश्किलीनेंच
02.00
मला ह्या गोष्टीबद्दल दोष
देण्यांत येऊं शकतो की माझ्या आत्ताच्या पराभवामुळे तिच्या सहनशीलतेचा प्याला उतू
गेला - - : जर मूखिन मूखिनंच राहिला असतां, तर सहनशीलतेचा प्याला आणखी लवकर उतू
गेला असता - - : मधेच कुठेतरी ‘तिच्या’ जोडायची इच्छा होतेय - - : “तिचा प्याला सहनशीलतेचा” किंवा “प्याला तिच्या
सहनशीलतेचा”, फक्त मी कोणत्याही परिस्थितींत कल्पना नाही
करूं शकंत - - : तिची - - : ह्या बोधगम्य प्याल्यासकट. हे, तसं,
अप्रत्यक्षपणे माझ्या अंतरात्म्याची निर्मलता दर्शवतं. मूखिनकडे
स्वतःला दुःखी करण्याचे अनेक मार्ग होते, आणि तो कधी कधी
बेफाम आत्म-आलोचना आणि आत्मपीडनाचासुद्धां शिकार व्हायचा. आठवायची इच्छा नाहीये.
त्याच्या अंतरात्म्याचा विषय आहे, माझ्या नाही. हा तो होता,
जो आपला संपूर्ण पगार जुगारांत हरून जायचा, हा
तो होता, जो कर्जबाजारी झाला होता, हा
तो होता ज्याने आपल्या बायकोची एक प्राचीन वस्तू गहाण ठेवली होती, पण पिच्छा सोडवावा लागेल मला आणि, मला वाटतंय की हे
लवकरंच करावं लागेल. मागच्या काही दिवसांत झालेल्या माझ्या छोट्या-छोट्या
पराभवांची त्या मोठ्या-मोठ्या पराभवांशी काही तुलनाच नाहीये, जे त्याच्या आजाराबरोबरंच मागच्या दीड वर्षांत वाढतंच गेले, थेट त्या दिवसापर्यंत जोपर्यंत मूखिन, ह्या नावाच्या
ख-याखु-या अर्थाने, मूखिन होणं बंद झाला. ह्यांत काही शंकाच
नाहीये, की आजार तीव्रतेने बळावंत गेला, पण, ह्या विचाराशी सहमत होऊनही, की हे आमचं दोघांचं दौर्भाग्य आहे, मी त्या प्रत्येक
माणसाचा ज़ोरदार विरोध करीन, जो मूखिनच्या मैनियाच्या वाढंत
असलेल्या तीव्रतेला त्या मूखिनशी जोडण्याचं धाडस करेल, जो मी
आहे. गंभीर नजर, जी मी स्वतःच,
इतक्यांतच, स्वतःला दाखवली आहे - - : ह्या गोष्टीच ठोस
प्रमाण आहे की सगळं काही नियंत्रणांत आहे. नाही, काहीतरी
लक्षण तर आहेच, पण फक्त माझा लूडोमैनिया उग्र स्वरूप नाही
घेत आहे; उलंट ह्याचा विपरीत होतं आहे.
गंभीरतेने विचार करताना, मी ह्याला
सौभाग्यंच म्हणेन की मूखिनला पत्त्यांच्या खेळांत काहीच रस नव्हता, आणि रुलेट23 मधेपण. तो तर सगळ्यांत पुरातन खेळावर बसायचा - - :
जवळ-जवळ दर रोज संध्याकाळी कामावरून परंत येताना मनोरंजन केंद्रात घुसायचा,
जे आमच्याच स्ट्रीटवर आहे, आणि तिथे एखाद्या
ऑटोमेटिक-गेमवर बसून जायचा. तो आपल्या हारण्याचा-जिंकण्याचा रेकॉर्ड ठेवायचा - - :
जशी की अपेक्षा होती, तो बहुतकरून हरायचांच. आम्हीं समजवूं
नाही शकंत - - : ना तर मूखिनला, आणि ना त्याच्यानंतर मला - -
: ह्या दुर्दैवी मशीनींशी आमच्या दोस्ती-दुश्मनीची कहाणी. एकंच शब्द - - : संसर्ग -
- : मीसुद्धां म्हणतो, आणि तोसुद्धां हेच
म्हणायचा. पण आम्हीं खेचले जात होतो, खेचले जात आहोत;
संध्याकाळ होईल, आणि, मला
माहितीये, की कोणची तरी शक्ति आम्हांला खेचून तेथे नेईल,
परत न पाठवण्यासाठी!
खुद्द आमच्याचसाठी
सगळ्यांत आश्चर्याची गोष्ट ही आहे की, आम्ही - - : किंवा, नाही, दुहेरीपणाच्या भावनेपासून वाचण्यासाठी फक्त
एकाचबद्दल बोलेन, मूखिनबद्दल - - : सगळ्यांत आश्चर्याची गोष्ट
ही आहे, की मूखिनला ‘थ्योरी ऑफ
प्रॉबेबिलिटी’बद्दल माहिती होती, विशेषकरून,
मोठ्या संख्यांच्या नियमाबद्दल. मी हे काय म्हणतोय! माहिती होती - -
: हा शब्द बरोबर नाहीये. ह्या क्षेत्रांत तो एक प्रकारचा विशेषज्ञ होता; तो ‘ब्यूस्टेंत काम करायचा. ‘ब्यूस्टे’
काय आहे? ओह, ही ती जागा
आहे, जिथे मी आपल्या सगळ्या ‘कलीग्स’बरोबर काम करतो, जे मला मूखिन समजतात. ‘ब्यूस्टे’ – ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स, दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर, ब्यूरो ऑफ
स्टेटिस्टिकल इन्वेस्टिगेशन्स. जर मी ‘प्राइव्हेट’ शब्द जोडला, तर तो, खरोखरंच
काहीही बदलणार नाही. म्हणजे, माझा संबंध रॅन्डम-प्रोसेसेज़
आणि रॅडम-वेरियेबल्सशी आहे. मूखिनसुद्धां, स्पष्ट आहे,
हेच करायचा - - : स्टेटिस्टिकल डेटाचं ‘कोरिलेशन’
इत्यादी प्रोसेसच्या मदतीने प्रसंस्करण करायचा, काही परिणाम प्राप्त करायचा, म्हणजे नंतर ह्या
परिणामांच्या आधारावर दुसरे विशेषज्ञ ह्या शोध कार्यांच्या ग्राहकांना सल्ला देऊ
शकतील. थ्योरी ऑफ प्रोबेबिलिटी काय प्रकार आहे, हे मला
चांगलंच माहितीये; मूखिनलासुद्धां माझ्यायेवढीच माहिती होती.
‘तुमचं सुख’मधे येणा-यांमधे आणखी कुणी नव्हतं, ज्याला
मूखिनसारखी (स्वतःचं उदाहरण नाही देणार), ह्या फालतू
खेळाच्या नुक्सानदायक प्रभावाची माहिती असेल. मूखिनला माहीत होतं, की तो कोणत्या दिशेने चाललाय; माहीत होतं आणि तो
जात होता. पण कां, हे त्याला माहीत नव्हतं आणि मी ह्याचं
उत्तर देणार नाही.
मूखिनची बायको नव-याचं हे
खूळ वेगळ्या प्रकारे समजावयाची - - : स्वैराचार; कुटुम्बाबद्दल गैरजवाबदारी;
चट्कन पैसा कमावण्याची इच्छा (“जर मेहनतीने
काम केलं असतं, एक-एक कोपेक वाचवला असता!”); आणि शेवटी आत्मपीडन.
ह्या शेवटच्या गोष्टीवर
एकमत होऊं शकतं,
जर आत्मपीडनाचा अर्थ असेल – मुद्दाम स्वतःच्या हितांना नुक्सान
पोहोचवणे, आणि विशेषकरून - - : वित्तीय. मग आत्मपीडन
मूखिनच्या इतर कार्यकारी क्षेत्रांतसुद्धां प्रकट व्हायला पाहिजे होतं, पण असं बघण्यांत नाही आलं. माझ्याचसारखा, इतर
कोणत्या गोष्टींत तो आत्मपीडकासारखा नव्हता, तर ह्याच्या उलट,
म्हणजे ‘उलट’ त्या
अर्थाने नाही, की तो किंवा मी, पर्याप्त
प्रमाणांत आपआपल्या प्रकारचे उत्पीडनप्रिय होतो किंवा आहोत, तर,
ह्याच्या उलंट, आम्हीं, आपल्या
क्रमिकते-पूर्वापरतेकडे न बघतां, दुहेरी नाही, तर एका माणसासारखे - - : दोघंही समजदार आहोत.
मला खात्री नाहीये, की हा ‘नोट’ धनुषावृत्त करायला हवं किंवा नाही, जरी, ह्याला धनु-कोष्ठकांनीच सुरूं केलं होतं. तसं -
- : कशाला? उलट पूर्ण खात्री आहे! तो बिल्कुल हानिरहित
नाहीये! माझ्यांतली आणि मूखिनच्यामधली पृथक्करण रेषा अगदी बरोबर काढलीये, समस्या तपशीलवारपणे समजलीये; म्हणून भानगडींपासून
दूर राहण्यासाठी तिहेरी धनु-कोष्ठकांनीच संपवतो.}}}
{{{शुक्रवारी
मी कामावर गेलो. चला, ऑफिसमधे माझी कल्पना करूं या.
माझ्यासमोर कम्प्यूटर आहे, ज्याच्यावर काही
दिवसांपूर्वीपर्यंत मूखिन काम करायचा. फिश-समोसांच्या ग्राहकांच्या आवडीचे
डायग्राम्स पडले आहेत. शुक्रवारी तान्याने त्यांना बनवलं होत, मला त्यांच्यावर काम करायचंय.
ही अफवा, की तान्या
मूखिनवर प्रेम करते, जराशी अतिरंजितच आहे. माझ्याबरोबर तर
तिचं काही लफ़डं नव्हतं. हे खरं आहे, की तिला ही गोष्ट माहीत
नाहीये, कारण की ती मला मूखिन समजतेय.
मूखिन एका टीममधे होता; आता ह्या
टीममधे आहे मी. टीममधे पाच माणसांचा कोर-ग्रुप आहे. मूखिन कोर-ग्रुपमधे होता;
आता मी कोर-ग्रुपमधे आहे. कोर-ग्रुपचे सगळे लोक डोक्याने काम करतांत
- - : फक्त डोक्याने - - : विश्लेषण करतात, परस्पर-संबंध
स्थापित करतात, निष्कर्ष काढतात. मी हेच करतो.
डोक्याने काम करणं सोपं
नाहीये - - : अगदी मनोवैज्ञानिक. मी तर कामाशिवायसुद्धां पूर्ण वेळ विचार करंत
असतो. कामावर असताना जरा जास्तंच विचार करतो, पण ह्याच्यावरंच तर काम आहे. पण ते
- - : काम आहे. आणि, जेव्हां काम नसतं, तेव्हां काम नसतं. मला, मानावं लागेल, ह्या गोष्टीची चीड येते, की काम करताना मी स्वतःसाठी
नाही, तर मूखिनसाठी विचार करतो. मी तर
जेव्हां कामावर नसतो, तेव्हांही मूखिनसाठीच विचार करतो,
पण कामावर मूखिनसाठी विचार करणं चांगलं नाही वाटंत, कारण की हे काम तर अजूनही त्याचंच आहे.
कामावर सगळे लोक मला, जसं मी
सांगितलंय, मूखिन समजतात.
मूखिनच्या कामावर, दोनदा
रेखांकित करतो, सगळे मला मूखिन समजतात.
जर आणखी काही असतं, तर
विचित्र झालं असतं; मला ही गोष्ट स्वीकार करावी लागेल.
आमचं ऑफिस - - : मला ‘कार्यालय’
हा शब्द जास्त आवडला असता - - : आमचं ऑफिस-कार्यालय भूतपूर्व
कम्युनिटी रेसिडेन्सीच्या बिल्डिंगमधे दुस-या मजल्यावर आहे, ही
बिल्डिंग पूर्णपणे आमच्या ‘ब्यूस्टे’ सारख्या
कार्यालयांना दिलेली आहे.
माझाकडे एक टेबल आहे.
स्पष्टंच आहे,
की हे टेबल मूखिनचं होतं. ते अजूनही मूखिनचंच आहे - - : कारण की,
पहिली गोष्ट, जर निष्पक्षपणे सांगायचं झालं, तर मूखिन, खरोखरंच, मी आहे;
आणि दुसरी गोष्ट, मी मूखिनला प्रतिस्थापित
करतोय, आशा आहे की अस्थाईपणे, ना की
स्थाई रूपाने.
तर, आम्हीं
डोक्याने काम करतो - - : किंवा, खरं सांगायचं तर, डोक्यांनी - - : कारण की सार्वजनिक विषयांवर काम करता करता आमचे डोके
संयुक्त झालेले आहेत.
सार्वजनिक विषय - - :
म्हणजे सार्वजनिक जागा नाही.
सार्वजनिक जागा - - : हे, जसं की
सगळ्यांना माहीत आहे, सर्वविदित सत्य आहे, गुळगुळीत झालेली म्हण, पुरातन विचार आहे.
सार्वजनिक विषय, जे आमच्या
डोक्यांना संगठित करतात, नियमानुसार, मौलिक
आहेत.
मला वाटतं की जर कोणी
बाहेरचा माणूस आमच्याकडे आला आणि त्याने ऐकलं की आम्हीं कशाबद्दल बोलतोय, तर त्याला
काहीही समजणार नाही. एकदा मूखिनची बायको नव-याकडे एक डॉक्यूमेन्ट घेऊन आली,
जे तो घरी विसरून आला होता (ही फार पूर्वीची गोष्ट आहे) - - : कॉफी
पिता-पिता ती ऐकंत होती, की कशाबद्दल गोष्टी चालल्या आहेत,
पण तिला काहीही समजलं नाही.
तिने असं काही ऐकलं - - :
“जॉर्ज, तुला काय वाटतं, उच्चतम शक्यतेचं मॉडेल घ्यावं,
की मुलींना फिटिंगसाठी पाठवावं?”
किंवा, उदाहरणार्थ
- - : “कपितोनव, आपले डेटा संतुलित नाहीत; सगळ्या ‘कंद’भाज्यांच्या
फैक्टोरियल विषमतेचं मूल्यांकन कर आणि मग वेरिअन्स एनैलिसिस कर!”
“मृत्य-दराची तालिका कुणी
टेबलवरून उचलली?”
- - : “मी, बरीस कार्लोविच, मला रिग्रेशन-मॉडेलवर काही शंका आहेत - - :”
अश्या प्रकारे आमच्या इथे
बोलायचे; अश्या प्रकारे आमच्या इथे बोलतात.
मला आठवतंय - - : “तुम्ही
लोक तिथे करतां काय?”
- - : रात्री, बिछान्यांत, मूखिनच्या विस्मित बायकोने नव-याला विचारलं आणि मूखिनने, मला आठवतंय, तिला सगळं समजावलं, काहीही लपवलं नाही, पण तिला समजलंच नाही.
गायब व्हायच्या आधी तो
स्वतः फिश-समोस्यांच्या आवडीचं पैकिंगचं वजन आणि डेट ऑफ एक्स्पायरीप्रमाणे
इंटरब्लॉक एनैलिसिस करंत होता. इनरब्लॉक एनैलिसिस - - : त्यांच्या फैक्टोरियल
एक्सपेरिमेन्टच्या आधारावर - - : मी आधीच केलेलं होतं. आजकाल सगळे डेटा कपितोनवकडे
पाठवले जातात,
पण मला विश्वास नाहीये, की तो वेळेवर रिपोर्ट
तयार करेल. कपितोनव फार निष्काळजी झालाय, त्याला काम म्हणजे
ओझं वाटूं लागलंय; तो ‘सूटकेस-मूड’मधे आहे - - : नीनाला, कपितोनवच्या बायकोला, मॉस्कोमधे कामाची ‘ऑफर’ आलीये
- - : कपितोनव अटैचमेन्टसारखा जाईल.
जोपर्यंत एंथ्रोपोमेट्रिक
शोधाचा प्रश्न आहे,
तर तो माझा विषय नाहीये, त्यावर एक फार मोठ्या
कम्पनीच्या आपराधिक-प्रयोगशाळेच्या आदेशावर उदाल्त्सोव काम करतोय. तिथे कुणीतरी
लोम्ब्रोजोच्या विचारांवर एक शोध-प्रबन्ध लिहीत होतं, तसं,
मला खरंच ह्याबद्दल काही समजंत नाही, आणि
समजायचंसुद्धां नाहीये - - : माझ्यासाठी येवढंच पुरे आहे की त्या लट्ठ फाइलीत,
जी अलीना बघतेय, अन्य काही
फोटोग्राफ्सबरोबरंच एका तरुण मारेक-याचा
फोटोपण आहे, जो तरुणपणाच्या चांगल्या दिवसांच्या मूखिन सारखा
दिसतो. साधारणपणे आमच्याकडे दुस-यांचा कामांत लोक रस नाही घेत. फिश-समोस्यांच्या
मागणीत व्यस्त असल्यामुळे मला, कदाचित, कधीही चेह-याच्या अनुपातांचे सूचकांक आणि काही विशिष्ठ गोष्टी, जसं नाकाच्या वरच्या आणि नाकाच्या खालच्या बिन्दूंबद्दल, आणि ज्या गोष्टीमुळे आजकाल उदाल्त्सोव वैतागला आहे, त्याच्या
बद्दल काहीही कळलं नसतं, जर का अलीना मूखिनला चिडवण्याच्या मूडमधे
नसती - - : तो प्रसंग चांगलाच आठवतोय मला - - : ती टेबलाच्या मागे बसली होती,
जे माझ्या, पण आधीच्या मूखिनच्या टेबलासमोर
आहे, आणि तिने विचारलं - - : तोपर्यंतच्या मूखिनला (मला
नाही) : कन्स्तान्तीन अन्द्रेयेविच, तुम्हांला आपल्या सावत्र
बापाला मारायची कधी इच्छा नाही झाली कां? - - : “माझा कोणी
सावत्र बाप नव्हता (मूखिनने दचकून तालिकेवरून नजर दूर करंत उत्तर दिलं). असा विचित्र प्रश्न कां विचारतेस?” - - : “ते
अशासाठी, की हा तरुण बराचसा तुमच्यासारखा आहे. ह्याने सावत्र
बापाला मारून टाकलंय”. तिने तरुणाचा फोटो दाखवला - - : त्या शोधकर्त्याच्या
फाइलमधून. तिला हे तर कळू शकंत नव्हतं, की तरुणपणी मूखिन कसा
होता; त्याला हे साम्य उगाचंच थोपल्यासारखं वाटलं; ही गंमत त्याला आवडली नाही. त्याने विचारलं - - : “डोळ्यांच्या मधलं अंतर
मोजलं का?” - - : “तेसुद्धां निहित आहे” (अलीना म्हणाली).
मला वाटतं, की मी
ह्याबद्दल आधीसुद्धां लिहिलंय. हो, हे त्याच दिवशी झालं होतं,
जेव्हां उशीराने झालेल्या माझ्या अत्मज्ञानानंतर, मूखिन नव्हता राहिला, आणि मी होऊन गेला. त्या
दिवशीच्या घटना मला सारखा त्रास देताहेत, ज्यांना स्वीकार
कराव लागेल, की ओढून ताणूनंच घटनांच नाव देता येईल.
सोप्या शब्दांत सांगायचं
झालं तर उदाल्त्सोव काही अन्य विषयांवरपण काम करंत होता, म्हणून तो
असिस्टेंट अलीनाला घाई करायला नव्हता सांगत, जी दिवस-दिवसभर
सगळ्या संभावित गुन्हेगारांच्या फोटोंच्या मागेच असायची आपले स्केल आणि कम्पास
घेऊन.
दुस-या शब्दांत, हे खरं
नाहीये, की आम्हीं मूर्खपणाचं काम करत असतो, आणि कुणालाच आमच्या रिसर्चची गरज नाहीये. साधारण वर्षभरापूर्वी
मूखिनसुद्धां असांच विचार करंत होता - - : की त्यांची गरज नाहीये, पण मग वेगळ्या प्रकारे विचार करू लागला. आजकाल आमचं काम खूप वाढलंय. आम्ही
लोकप्रिय झालो आहोत. आमच्या क्लाएन्ट्समधे आहेत मेडिकल आणि बिजनेस इन्स्टीट्यूशन्स,
राजनीतिक संगठन, जे प्रशासकीय अधिका-यांच्या
निवडणुकांमधे काम करतात, शिपिंग इण्डस्ट्री, कन्फेक्शनरी-फैक्टरी, पोल्ट्री-कॉम्प्लेक्स, नागरी प्रशासनाच्या अनेक कमिटीज, ज्यांत प्रमुख आहेत
शिक्षा-कमिटी. आमचे पार्टनर्स आहेत - - : पब्लिक-ओपिनियनचे अध्ययन करणा-या प्रमुख
एजेन्सीज़; आमची सफलता प्रमाणित करणारे सर्टिफिकेट्स
प्रमुखाच्या खोलीत लावलेले आहेत.}}}
{{{ मूखिनच्या
बायकोचं स्पष्ट मत आहे, की हात बाथरूममधे धुवायला हवेत,
आणि भांडे किचनमधे. भांडे किचनमधे धुवायला हवेत, ह्यावर मूखिनला काहीच आपत्ति नव्हती, पण हात धुण्यावर
लागलेल्या प्रतिबंधांचा तो आपल्या सम्पूर्ण ताकदीने विरोध करायचा. त्याने किचनमधे
हात न धुण्यास फक्त नकारंच नाही दिला, वरून भांडे धुवायच्या
साधनांनी हात धुण्यावर लावलेल्या प्रतिबंधालापण समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला,
विशेषकरून जेव्हां साधारण साबण सिद्धांतवश किचनमधे दिसायचा नाही. मी
बरेचदां विचार करतो, की सारखे नियम मोडून त्याला सिद्ध तरी
काय करायचं होतं – त्याला फळ मिळालंच.
मूखिनच्या बायकोने नव-याला
सुधारण्याची आशा नाही सोडली.
अकरा वर्ष ही “रीमेकिंग”ची, “रीफिनिशिंग”ची,
“रीशेविंग”ची, “रीफोर्जिंग”ची प्रक्रिया चालू
राहिली - - : आणि परिणाम स्वरूप, आमचा परिणाम झाला - - :
अगदी जीरो.
मूखिन असताना मी आपल्या
सवयी नाही बदलंत. स्वतःवर आग झेलतो.
हरकत नाही, सहन करूं!
शेवटी, मी
स्वतःला आठवण देतो, की बायको ती माझी नाहीये, तर बायको, ठळकपणे, कन्स्तान्तीन
मूखिनची आहे, आणि मला सहन करायची काही गरज नाहीये, किंवा, खरं सांगायचं तर, गरज
आहे, नक्कीच, मूखिन सारखी - - : सहन
करणं, पण तसं नाही, जसं मूखिनने केलं
असतं, जर तो मी नसता तर, पण मूखिनने हे
सहन कसं केलं - - : अकरा वर्ष? - - : डोकं गरगरू लागलंय.
मी हात धुतले, आणि
तेसुद्धां बाथरूममधे नाही - - : किचनमधे. शिवाय मी त्या सगळ्याचा वापर केला,
जे सिंकवर होतं - - : भाण्डे धुवायच्या केमिकलने - - : न की त्या
साबणाने जो बाथरूममधे होता! त्याहीपेक्षां वाईट काम हे केलं, की हातपण मी भांड्यांच्याच टॉवेलने पुसून टाकले - - : आणि तेसुद्धां
मूखिनच्या बायकोच्या डोळ्यांसमोर!
“कोस्त्या”, (कडक
आवाजांत बायकोने म्हटलं, जसं की असंच व्हायला पाहिजे,
म्हणजे, न व्हायला पाहिजे, कारण की मी तीन-तीन गुन्हे केले होते).
तिच्या आवाजांत मला निर्भर्त्सनेची
झाक जाणवली; आणि मग माझ्याच्याने सहन नाही झालं - - :
“कोस्त्या? तुला काय
येवढा विश्वास आहे, की मी तुझा कोस्त्या आहे?”
स्तब्धता जास्त वेळ नाही
टिकली.
“तर मग कोण आहेस?”
“कदाचित, आज मी
कोस्त्या आहे, वाद नाही घालणार, आणि
उद्या मी - - : प्रेसिडेन्ट! किंवा - - : शेजारी, जो आपल्या
खाली राहतो! किंवा बूगोर्का स्टेशनवरची बार-गर्ल ओल्या! तू कल्पना नाही करूं शकंत
कां?”
बेकार. सांगायला नको होतं.
प्रतिबन्ध लागलेला आहे.
बायको हातांत प्लेट घेऊन
जणु थिजून गेली.
“ही कसली
गंमत आहे?”(आणि मी बघितलं, की ती
घाबरली आहे).
मी चूपंच राहिलो - - :
जास्तंच बोलून गेलो होतो. बोलायला नको होतं.
“कोणची ओल्या – बार-गर्ल, कोणचा
प्रेसिडेन्ट” (बायको बडबडली).
“ज्याब्लिक24 (मूखिन
नेहमी तिला ज्याब्लिक म्हणायचा) - - : ज्याब्लिक, माझ्या लाडके, मला कधीही डिवचूं नको
02.30
वेगळ्या प्रकारचं सत्य
सांगायला” (आणि मी बोटाने वर खूण केली, सत्याच्या स्तराकडे खूण करंत,
उच्चतम स्तराकडे).
टेबलावरून उठून, हाताने
खूण करंत आज्ञा दिली, की कोणताही प्रश्न विचारू नको; आपल्या खोलींत चाललो गेलो.
आपल्या खोलींत दीवानावर
लोळलो; वर्तमानपत्र घेतलं, केलिफोर्नियांत एका भूतपूर्व
जजला साक्षीच्या दरम्यान सार्वजनिक रूपाने हस्तमैथुन करण्याच्या आरोपांत एक
वर्षाचा कारावास आणि दहा हजाराचा दण्ड भरण्याची शिक्षा सुनावण्यांत आली. त्याने
टेबलाच्याखाली एका विशेष उपकरणाचा प्रयोग केला होता. त्याच्या विशिष्ठ आवाजाने
आरोपीचं बिंग फोडलं.
विचार करण्याचा प्रयत्न
करतोय; कल्पनाशक्ति कमी पडतेय.
ती माझ्याजवळ आली.
“मला घाबरवूं नको, कोस्तेन्का,
मी बघतेय, की तुझ्याबरोबर काहीतरी ठीक नाहीये.
जणु की तू स्वतःचा नाहीयेस”.
खोटं बोलतेय.
मी स्वतःचा नाहीये, हे ती बघू
शकंत नाही - - : कारण की मी, निर्विवादपणे, स्वतःचा आहे - - : आणि मूखिनसारखा आहे.
“हा तूंच आहेस कां?”
ओह, तिची
दृष्टी खूपंच तीक्ष्ण आहे. पण, मी स्वतःच तर तिच्यासमोर
स्वीकार केलं होतं. तिला समजलंय का?
आणि ह्याने मला काय
प्राप्त झालं?
काहीही प्राप्त नाही झालं.
मी सारवा सारव केली - - :
“सगळं ठीक आहे” (चेह-यावर
हसू आणंत हळूच म्हटलं).
केसांत हात फिरवंत, तिने माझं
डोकं कुरवाळलं. मी डोळे बंद केले; मी घुरघुर करू लागलो - - :
घुर्र घुर्र घुर्र. मूखिनवर दया येतेय. अगदी मूर्ख आहे.}}}
{{{ तर,
वर्तमानपत्र ठेवून मी दीवानवर लोळलो, बाजूला
बायको बसली होती; माझं कपाळ, ज्याला ती
आपल्या ऊबदार तळहातांनी कुरवाळंत होती, सरळ होऊ लागलं,
कदाचित आठ्या असाव्यात. मी तिच्या चेह-याकडे पाहिलं - - : तिच्या
डोळ्यांत भीति होती. तिला घाबरवून मीसुद्धां खूप घाबरून गेलो होतो; हे खूप भयानक आहे - - : फालतू गोष्टी बरळणं, विशेषकरून
माझ्या परिस्थितीत. मला आशंका आहे, की ह्याचा जाब द्यावा
लागेल - - : तिच्यासमोर नाही - - : आणि तिलापण नाही - - : आणि ह्याक्षणीसुद्धां
नाही.
लक्ष दिलं पाहिजे, की
मूखिनची बायको - - : आकर्षक बाई आहे.
हे वाक्य समजण्याचा
प्रयत्न करूं या. त्याचं विश्लेषण करायल हंवय.
दुस-या भागापासून सुरुवात
करू. मूखिनची बायको - - : आकर्षक आहे. ठीक, असंच आहे. तिला सुंदर म्हणताना मी
कचरलो असतो. मी कलाकार नाहीये, पण मला माहीत आहे की
सौन्दर्याचं मापदण्ड काय असतं - - : कानांचे कोपरे डोळ्यांच्या कोप-याच्या ओळींत
असले पाहिजे, आणि कानांच्यापाळी नाकाच्या खालच्या भागाच्या
अनुरूप असल्या पाहिजे. मूखिनच्या बायकोचे एक तर कान तरी आवश्यकतेपेक्षा जास्त उंच
आहेत, किंवा नाक जरा जास्तंच खाली आहे. कदाचित, म्हणूनंच ती लटकणारे ईयर रिंग्स घालते. ते तिच्यावर उठून दिसतात. मला
असंपण वाटतं, की तिचं कपाळ नाकाच्या हाडापर्यंत अत्यंत
सौम्यपणे उतरतं, ज्याने, जर तिच्या
चेह-याकडे एका बाजूने बघितलं तर तो पुढे आलेला वाटतो. जर मूखिनने आपल्या बायकोचं
अत्यंत रिअरिलिस्टिक पद्धतीने बनवलेलं पोर्ट्रेट बघितलं असतं, आणि जर त्याला माहीत नसतं, की ही त्याची बायको आहे,
तर त्यानेच निर्णय घेतला असता - - : दुस-या एखाद्या दर्शकासारखाच -
- : की - - : जो कोणीपण कलाकार आहे - - : तो, पहिली गोष्ट,
मॉडेलच्या प्रति उदासीन नाहीये, कारण की
निर्जीव-थंड नाकाबरोबरंच तिच्यातल्या अप्रत्याशित सेक्स-अपीलला प्रदर्शित करणं
अशक्य झालं असतं, आणि दुसरी गोष्ट, रियलिस्ट-कलाकाराकडून
ह्या गोष्टीची न्यूनतम अपेक्षा आहे, कारण तो स्वतःला
किंचितश्या विलक्षणपणाची मुभा देऊन एक सनकीपणाचा भाव प्रकट करतो. सामान्य
अनुपातांपासून झालेले हे साधारण विचलन मूखिनच्या बायकोला एक विशिष्ठ मोहकपणा देतात
: तिला, जसं मी सांगितलंय, आकर्षक
बनवतात. अगदी बरोब्बर शब्द आहे. ती आकर्षित करते, आणि
कोणचीतरी गोष्ट तिच्याकडे आकर्षित करते, तिच्याबद्दल
आकर्षणाची भावना असणं अगदी सोपं आहे. म्हणजे, मला म्हणायचंय
- - : तिच्याबद्दल आकर्षण.
आता ते, जे त्या
वाक्याच्या पहिल्या भागाशी संबंधित आहे. मी म्हटलं - - : लक्ष दिलं पाहिजे.
पहिल्या शब्दावर जोर देतोय. लक्ष देणं. आकर्षण, ज्याच्याबद्दल
इतक्यांत बोलत होतो, तिच्या आकर्षणाकडे माझ्याद्वारे लक्ष
देणं बंद झालंय, जास्तंच स्पष्ट सांगायचं तर, खरोखरंच, मूखिनद्वारे आधीच लक्ष देणं बंद झालं होतं,
मी तर, तसं, ही गोष्ट
नाहीये, की लक्ष देणं बंद केलंय, उलट
मला तर तो सुवर्णावसर मिळालांच नाही की ह्या गोष्टीवर लक्ष देऊं, ज्यावर, मूखिन असल्यामुळे, केव्हांपासूनंच
मूखिनने लक्ष देणं बंद केलेलं होतं - - : त्याच्या पत्नीचं
आकर्षण. दुस-या शब्दांत, मूखिनच्या बायकोच्या आकर्षकपणावर
मूखिनसाठी नकळतंच त्याच्या द्वारे लक्ष देणं बंद झालं होतं, ज्याबद्दल
माझ्या द्वारे आत्ताच लक्ष दिलं गेलं आहे, हा अंश लिहिता
लिहिता. मूखिनला समजू शकता येतं, अकरा वर्ष बरोबर
राहिल्यामुळे ब-याच काहीवर, कदाचित, प्रत्यक्षावरसुद्धां
लक्ष देणं बंद होत असतं; आणि माझ्यासाठीपण, जो मूखिन झालेला आहे, जर माझ्या मूखिनपणाच्या (हा
शब्द काही काळानंतर माझ्या संशोधकाकडून ऐकला आणि ज्याच्या आश्चर्यजनक सटीकतेमुळे
मी त्याच्या उपयोग केल्याशिवाय नाही राहू शकंत) अल्पावधिकडे लक्ष दिलं तर, हे समजणं कठिण नाहीये. त्यांच्या असहज वैवाहिक जीवनाचा अनुभव माझ्याद्वारे
चुपचाप स्वीकारला गेला होता. त्यांच सहजीवन चांगलं असो की वाईट असो, गतायुष्यतर मी बदलू शकंत नाही, ते सुद्धा दुस-यांच
गतायुष्य.
तर हा अर्थ आहे “लक्ष दिलं
पाहिजे”चा. आणि मी लक्ष दिलं, मी त्याच्यावर लक्ष दिलं, ज्याच्यावर मूखिनने केव्हांतरी लक्ष देणं बंद केलं होतं - - : तिचा मौन
मोहकपणा, तिच्या वाकड्या-तिकड्या दातांचं आकर्षण, हृदयाला भिडणारी तिच्या नाकाची तीक्ष्णता, तिच्या
तळहातांची कोमलता, लाडिकता. तिने, नक्कीच,
ठरवलं होतं, की मी वेडा झालोय, आणि, आता दीवानावर लोळलेल्या माझ्यावर दया करंत,
अचानक उसळून आलेल्या कोमलतेने माझं कपाळ कुरवाळते आहे, आणि मी, ज्याचं कपाळ ती कुरवाळतेय, मीपण प्रत्युत्तराखातर तिच्यावर अधिकाधिक दया करंत होतो, क्रमशः वाढंत असलेल्या तीव्रतेने, कारण की हा विचार
करणंच कसं वाटतं, की तुमचा नवरा पूर्णपणे वेडा झाला आहे?
मी तिच्याकडे बघून स्मित केलं, जणु, सगळं ठीक होईल, आणि ती डोळ्यांच्या कोप-यातून माझ्याकडे
बघंत हसली. कदाचित, तिने मूखिनसाठी मला क्षमा केलं? मूखिनला क्षमा केलं - - : माझ्यांत? माझ्यांत आपल्या
मूखिनला निरोप देऊन टाकला? सगळं शक्य आहे. मी चुपचाप मूखिनशी
घृणा करत होतो. अधिकाधिक. मूखिन मूर्ख होता, ईडियट होता. मला
मूखिनवर दया नव्हती येत; मला स्वतःवर दया येत होती, जो मूखिन झाला होता. मूखिनच्या बायकोबद्दल माझी दया, जी तिच्या माझ्याबद्दल दयेंत परावर्तित होत होती, पुन्हां
माझ्यांत माझ्यांचबद्दल दयेच्या रूपांत प्रतिबिंबित होत होती, पण ह्याचा मूखिनशी काही संबंध नव्हता.
त्या वेळेपासून, जेव्हांपासून
माझ्या द्वारे मूखिन प्रस्थापित केला गेला होता, मी एकदाही
त्याच्या बायकोकडे ‘सेक्स-ऑब्जेक्ट’ म्हणून
नव्हतं पाहिलं. मूखिनला काही काळापासून - - : महिन्या, दीड-दोन
महिन्यांपासून - - : बायकोबरोबर प्रॉब्लेम्स होत्या. आणि बायकोशी असलेल्या ह्या
प्रॉब्लेम्सला मी मूखिनकडून वारसा हक्काने मिळवले होते! त्यांच्यात काहीसा बेबनाव
होता. ही वेळ नाहीये त्याबद्दल वाद घालण्याची. कारण की आत्ता, म्हणजे, तेव्हां, दीवानावर पडल्या-पडल्या
एक आश्चर्यजनक विचार माझ्या डोक्यांत आला - - : ह्या मूखिनवर बायकोच्या बदफैलीचा
ठप्पा कां न लावावा? - - : अगदी तिथेच आणि अगदी तेव्हांच!
म्हणजे इथे आणि आत्ता.
म्हणजे - - : तरीही - - :
तेव्हां.
तिच्या अंगावर निळा गाउन
होता, ज्यांत ती दीवानावर लोळंत असलेल्या माझ्याकडे आली; कोणच्यातरी
विचित्र साबणाच्या सुगंधीत मी अगदी स्पष्ट संदेश ऐकला:
“सलोखा आणि तत्परता”.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें