बुधवार, 24 जनवरी 2018

धनु कोष्ठक - 16



15.05

जेवण झाल्यावर कपितोनव शो-केसकडे येतो. जॅमचे डबे ठेवलेले आहेत – रास्पबेरी, स्ट्राबेरी, ब्लूबेरीचे. आन्कासाठी घेऊं का – पीटरहून गिफ्ट? आठवला तिचा पुरळ आलेला, ब्लूबेरीचे डाग पडलेला चेहरा, जेव्हां ते तिघं जंगलांत बेरीज़ गोळा करंत होते – तेव्हां नीन्काचा चेहरापण जांभळा झाला होता, आणि संध्याकाळी, जेव्हां ते व्हरांड्यात बसून बाऊलमधून खात होते, तेव्हां नीनाचे ओठ आणखी गडद काळे पडले होते, जसे सुरेख डाकिणीचे असतांत, आणि, आन्काला झोपवल्यानंतरसुद्धां तिने त्यांना धुतलं नव्हतं...पण, कपितोनव स्वतःशीच म्हणतो, हा डबा ब्रीफकेसमधे नाही घुसणार, सध्यां ह्याला ठेवायला कुठे जागापण नाहीये. विकत तर घ्यायचा आहे, पण नंतर.
किनीकिन त्याच्याजवळ येतो:
“तो वाट बघतोय.”

15.07

“आणि तुम्हीं इतके घाबरंत होते. चला.”
हे फार बेफिकिरीने म्हटलं होतं. आपल्या सगळ्या हाव-भावाने किनीकिन कपितोनवला हे समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की ब्रीफकेसेसच्या अदला-बदलीची गरंज त्याच्या तुलनेंत कपितोनवला जास्त आहे, आणि ह्यामुद्द्यावर कपितोनव सहमति दाखवायला तयार आहे – त्याला समजंत नाहीये, की ह्या हेरा-फेरीवाल्या – उठाइगीर जादुगाराला कैबेजच्या कटलेट्समधे काय विशेष आढळलंय.
बर्फाच्या ढिगांपासून स्वतःला वाचवंत ते रस्ता पार करतात, भूतपूर्व दिवाळखोर लोकांची मदत करणा-या सोसाइटीच्या बिल्डिंगमधे जातात. “सी-9”च्या कॉरीडोरमधे येतात.
“नाही, नक्कीच, मला कळतंय,” किनीकिनच्या मागे-मागे चालंत कपितोनव म्हणतो, “मांजरींना खायचे आहेत, तुम्हांला मांजरी आवडतात...पण तुम्हीं ह्या कटलेट्सच्यामागे इतके कां लागले आहांत? कदाचित, तुम्हीं त्यांना काही केलंय? कदाचित, ते विषारी असतील?”
“मला तुमचं बोलणं ऐकूं येत नाहीये,” किनीकिन न वळतां म्हणतो.
“असं? आणि, मी म्हणतोय, की पैसा कमावण्याचे शेकडों जास्त चांगले मार्ग आहेत...तुमच्यासारखी योग्यता असताना...जसं लंचमधे मासे दिले होते...ह्या कटलेट्समधे असं काय विशेष आहे?”
“मला शंका आहे, की तुम्हांला कळणार नाही,” आपला वेग कमी करंत किनीकिन उत्तर देतो, “प्रत्येकाचा आपापला एजेण्डा असतो. माझा – कटलेट्स आहे. आणि मी त्याला एखाद्या फालतू गैरसमजामुळे बदलायचा इच्छुक नाहीये. जास्त गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला नको, बिल्कुल नाही.”
खरंच, मला काय फरक पडतोय’ – बेकारच्या उत्सुकतेसाठी स्वतःला दोष देत कपितोनव विचार करतो. आणि खरंच, ह्या गोष्टीने त्याला काय फरक पडतो, की आपल्या कार्यकलापांसाठी किनीकिनला कुठून प्रेरणा मिळते. आणि किनीकिनच्या डोक्यांत एक नवा विचार येतो – अचानक तो थांबतो आणि कपितोनवकडे एकटक बघतो.
“मला असं वाटतं, की तुम्हीं मला कोणी छोटा-मोठा बदमाश, चोरटा समजतां आहांत. तुम्हांला कळतंय कां, की तुम्हीं मला काय म्हणता आहांत? तुम्हांला माहीत आहे का, की बुफेआणि ला कार्तेमधे काय फरक असतो? त्यावेळेस बुफेचालला होता. प्रत्येक माणूस, ज्याचे कटलेट्स गायब झाले होते, पुन्हां जाऊन तसंच एक किंवा जास्तसुद्धां, कटलेट्स घेऊं शकंत होता. आश्चर्याची गोष्ट आहे, आणि जर आता तुमच्या प्लेटमधला मासा गायब झाला असत, तर काय – तुम्हीं दुस-यांदा देण्याची मागणी केली असती, हँ? जर मी तसं केलं असतं, जसं तुम्हीं म्हणताय, तर मी तुमचं जेवणंच गायब करून टाकलं असतं. पण, मी चोर नाहीये. तुम्हीं ही गोष्ट समजून घ्या, चांगलं राहील.”
“पण,” पण ह्या पणच्या नंतर काय म्हणावं, कपितोनवला माहीत नाही.
“माझ्या मागे-मागे या,” किनीकिन म्हणतो.
नेक्रोमैन्सर कॉरीडोरमधे उभा आहे आणि भिंतीवर लावलेले मंगोलियन चित्र बघतोय. त्याचे हात पाठीच्या मागे आहेत, आणि दोन्हीं हातांनी त्याने हैण्डलने ब्रीफकेस पकडली आहे.
“तर,” किनीकिन म्हणतो, “नेक्रोमैन्सर महाशय, कृपाकरून प्रेमाने मेहेरबानी करा.”
“चांगली एक्ज़िबीशन आहे,” नेक्रोमैन्सर कपितोनवला म्हणतो. “गोबीचं वाळवन्ट, स्तेपी, तलाव. म्हणतात की तिथे मेंढ्यांची संख्या तिथल्या निवासांच्या दहापट आहे. तुम्हीं मंगोलियाला गेला आहांत कां?”
कपितोनवने थोडक्यांत उत्तर देण्याचा निश्चय केला.
“नाही.”
“मी पण,” किनीकिनने उत्तर दिलं, तसं त्याला कुणीही विचारलं नव्हतं. “तुम्हीं जेवले नाहीत ना?”
“मी कुणाच्यातरी घरी खाल्लं,” नेक्रोमैन्सर महाशय बेफिकीरपणे म्हणतो.
“चला, तर बदलून घेऊं. तुमच्याकडे कपितोनव महाशयांची ब्रीफकेस आहे, माझ्याकडे – तुमची आणि कपितोनव महाशयाकडे – माझी. प्रत्येकाने खिडकीवर ब्रीफकेस ठेवावी आणि प्रत्येकजण आपापली घेऊन घेईल.”
ठेवल्या – घेऊन घेतल्या.
किनीकिन लगेच आपली ब्रीफकेस घेतो, उघडतो आणि, कटलेट्स बघून निःश्वास सोडतो.
कपितोनव किनीकिनच्या दूर जाण्याची वाट बघतो, आणि मग आपली ब्रीफकेस उघडतो.
“मला हेंच वाटलं होतं!” कपितोनव उद्गारतो. “आणि, माझी नोटबुक कुठे आहे?”
“ती तुमची नोटबुक नाहीये,” नेक्रोमैन्सर महाशय उत्तर देतात. “ती मरीना वालेरेव्ना मूखिनाची प्रॉपर्टी आहे.”
“तुम्हांला कसं माहीत?”
“त्यांत तिचं विज़िटिंग कार्ड पडलं होतं. स्वाभाविकंच आहे, की मी ती नोटबुक तिला परत केली, मरीना वालेरेव्नाला फोन करून, तिच्याशी मीटिंग फिक्स करून. तुम्हांला हे माहीत आहे.”
“तुम्हांला कसं माहीत की मला माहीत आहे?”
“तुम्हांला मरीना वालेरेव्नाचा मैसेज आला होता, तिने तुम्हांला सूचित केलं होतं की नोटबुक तिच्याकडे आहे, आणि हे पण लिहिलं होतं की कुणी तिला दिली होती.”
“इन्नोकेन्ती पेत्रोविच.”
“हो, तिच्यासाठी,” नेक्रोमैन्सर म्हणतो, “मी इन्नोकेन्ती पेत्रोविच आहे. मित्रांमधे मला माझ्या विशिष्ठ नावाने बोलावतांत – नेक्रोमैन्सर महाशय. जगासाठी मी – इन्नोकेन्ती पेत्रोविच आहे.”
सगळं ठीक आहे, तो खरंच सांगतोय : कपितोनव तेव्हांच, लंचच्या आधीच समजून गेला होता, की इन्नोकेन्ती पेत्रोविच – हे नेक्रोमैन्सर महाशयंच आहेत.
पण.
“थांबा. तुम्हांला कसं माहीत, की मला मैसेज मिळालाय?”
“मरीना वालेरेव्नाने माझासमोरंच लिहिला होता. आणि, काही प्रमाणांत माझ्याच सल्ल्यावरून.”
“तुम्हीं तिला सल्ला दिला – मला मैसेज पाठवण्याचा?! तुम्हीं – तिला?!”
“तिला तुम्हांला धीर द्यायचा होता. तिला माहीत होतं, की नोटबुकमुळे तुम्हीं घाबरून जाल आणि तुम्हांला कल्पनासुद्धां करता येणार नाही, की नोटबुक परत केलेली आहे. तुम्हांला तर माहीतंच आहे, की नोटबुकसाठी ती कॉन्फ्रेन्समधे येण्याची तयारी करंत होती – तुमच्याकडे, इथे, पण परिस्थिति बदलली. मला कळंत नाहीये की तुम्हीं इतके कां वैतागंत आहांत. सगळं ठीक-ठाक झालं. आम्हीं काही वेळ बसलो, गोष्टी केल्या. तिचं किचन खूप छान आहे. ती, बाइ द वे, माझ्याबरोबर तुमचं झोपेचं औषध पाठवणार होती, जे तुम्हीं तिच्या घरी विसरले होते. पण मी, सैद्धांतिक रूपाने वालोकोर्दीनच्या विरुद्ध आहे. माफ करा, मी नाही घेतलं.”
“हे सगळं, माहीत नाही कां, माझ्या डोक्यांत उतरंत नाहीये...ऐका. पण ही माझी ब्रीफकेस आहे, नोटबुक माझ्या ब्रीफकेसमधे पडली होती!...हे माझं काम आहे, तुमचं नाही, की त्यांत ठेवलेल्या वस्तूंचं काय करायचं!...नोटबुक मी परंत करायला पाहिजे होती, तुम्हीं नाही.”
“सॉरी, ब्रीफकेसवर हे लिहिलेलं नव्हतं की ती कुणाची आहे. पण विज़िटिंग कार्डने मला अचूक निर्णय घेण्यास मदत केली: मी त्या पत्त्यावर गेलो. मरीना वालेरेव्ना आणि कन्स्तान्तिन अन्द्रेयेविच फार भाग्यवान आहेत, की नोटबुक माझ्या हातांत पडली.”
“कन्स्तान्तिन अन्द्रेयेविच ह्या जगांत नाहीये.”
“मला माहीत आहे.”
“तर मग असं नका म्हणूं की तो भाग्यवान आहे. मी नोटबुकच्या मालकिणीला शब्द दिला होता, की माझ्याशिवाय कुणी दुसरं हे नोट्स बघणार नाही. आणि तुम्हीं, कबूल करताय, की तुम्हीं नोटबुकमधे डोकावले आहांत, हो न?”
“डोकावलो आहे? मी पूर्ण वाचलीपण आहे – अथपासून इतिपर्यंत. लगेच – नोटबुक उघडताक्षणीच. तिनेच मला लगेच हालचाल करायची प्रेरणा दिली.”
“तुम्हीं परवानगीशिवाय दुस-याचे नोट्स वाचलेत.”
“मरीना वालेरेव्नाने न केवळ मला माफ केलं, तर मोठ्या उत्सुकतेने तिच्याबद्दल माझं मतसुद्धां ऐकलं. आधीतर ती सतर्कतेने वागत होती, पण, जेव्हां तिला समजलं, की कोणाशी बोलते आहे, तर तिने ब-याचश्या गोष्टी मला सांगितल्या. तिला बरेचसे प्रश्न विचारायचे होते.”
“असं कसं?... आणि तुम्हीं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत?”
“अनेक प्रश्नांची उत्तर माहीत नसणं तिच्यासाठी जास्त चांगलं आहे. असल्या प्रश्नांची, साहजिक आहे, मी उत्तरं नाही दिली.”
“हो, खरंय...आणखीही...” कपितोनव स्वतःशी पुटपुटतो, हे बघून की नेक्रोमैन्सरला आपली ब्रीफकेस उघडायची काहीच घाई नाहीये.
“आणि मग,” नेक्रोमैन्सर महाशय, तोच इन्नोकेन्ती पेत्रोविच आहे, म्हणतात, “चला, प्रामाणिकपणे बोलूं या. “ह्या बाबतीत तुम्हांला मरीना वालेरेव्नाला काहीही सांगायचं नव्हतं. आणि मला बरंच काही सांगायचं होतं.”
“ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे?”
“पूर्णपणे.”
“आणि नवरा?”
“काय नवरा?” नेक्रोमैन्सरने प्रतिप्रश्न केला.
“तुम्हीं बोलंत असताना तो तिथे होता कां?”
“सुदैवाने, नवरा घरी नव्हता. नाहीतर बोलतांच आलं नसतं. त्यालातर नोटबुकबद्दल काहीच माहीत नाहीये.”
“तुम्हांला हेसुद्धां माहीत आहे...तर, हा डेवेलपरकोण आहे?”
“संशोधक,” नेक्रोमैन्सर महाशय चूक दुरुस्त करतो. “तुम्हांला त्याबद्दल विचार करायची काय गरंज आहे? तुम्हीं संख्या ओळखंत राहा. आणि त्या भानगडीपासून तुम्हांला दूर राहायला पाहिजे. मी स्वतःचं सोडवीन. तुम्हीं झोपायचा प्रयत्न करा, तुम्हांला झोपलं पाहिजे. टैब्लेट्स आणि वालोकार्दिन न घेतां.”
“माहीत आहे, मला वाटतं की तुम्हीं स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेत आहांत!”
“ओह, हो,” नेक्रोमैन्सर महाशय सहमति दर्शवतो. “मी खरंच स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेतो आहे.”                 
कपितोनव ब्रीफकेस बंद करणारंच होता, की तेवढ्यांत त्याला वाटलं की कोणचीतरी वस्तू कमी आहे. डेलिगेट्सच्या नावांच ब्रोश्यूर, नोटपैड, पेन्स, पीटरबुर्गच्या रहस्यमय स्मारकांबद्दल पुस्तक-सुवेनीर – हे सगळंतर आहे, पण जादूची छडीनव्हती. ह्या जादूच्या छडीची खरं म्हणजे त्याला बिल्कुल गरज नव्हती, पण नेक्रोमैन्सर इन्नोकेन्ती पेत्रोविचबद्दल त्याच्या मनांत इतकी घृणा भरून गेली आहे, की जर मौका मिळालाय तर तिला प्रकट न करणं पाप ठरलं असतं.    
“माझ्यामते ह्यांत आणखी एक वस्तू होती,” खुनशीपणाने स्मित करंत कपितोनव म्हणतो.
“आह, हो,” थोडा वेळ विचार केल्यावर नेक्रोमैन्सरला आठवण येते. “ती मी ठेवून घेतलीये. माफी मागतो.”
तो कोटाच्या आतल्या खिशांतून एक चामड्याची केसकाढतो, अशी जशी किल्ल्यांसाठी असते, पण त्यांत ना तर किल्ल्या होत्या, ना कैची, जर, उदाहरणार्थ ती चाकूची केसअसती, उलट तिच्यातून दोन छड्या बाहेर डोकावंत होत्या. कपितोनवच्या पुढे करतो, आणि जेव्हां कपितोनव पहिल्या छडीकडे हात करतो, तेव्हां त्याला दुरुस्त करतो:
“ही माझी आहे. तुमची दुसरी आहे.”
कपितोनव जी स्वतःची नाहीये, ती छडी परंत करतो आणि आपली, दुसरीवाली, अगदी तश्शीच छडी घेतो. छड्यांमधे जराही फरक नाहीये. त्याला वाईट वाटलं, की त्याने कां हा खेळ सुरू केला – स्वतःला मूर्ख समजण्यांत आनंद नाही वाटंत.

15.21

इंटरवल संपला. हॉलमधे लोक खुर्च्यांवर बसूं लागले आहेत. कपितोनवपण एका रिकाम्या खुर्चीकडे जातंच होता की तलावने त्याला थांबवलं:
“तुम्हीं काल पार्टीशन बरोबर आपल्या कार्यक्रम दाखवायचं कबूल केलं होतं. चला, होऊन जाईल. अजून पाच मिनिट आहेत.”
तलावबरोबर हॉलच्या शेवटापर्यंत जावंच लागतं. एक दार प्रकाश व्यवस्था करायच्या खोलीकडे जात आहे, आणि दुसरं त्या खोलींत जिथे माइक्रोफोन्स, फालतूच्या खुर्च्या आणि सगळ्या प्रकारचं भंगार पडून आहे, - दार उघडून तलावकपितोनवला इथेच आणतो.
तुम्हीं थोडे नाराज दिसताय. तुम्हांला खूश करूं का? तर ऐका, जशी तुमची इच्छा होती, बोर्डसाठी तुमची निवड झालेली नाहीये. आत्ताच रिजल्ट्स ऐकून आलोय. पण, हे सीक्रेट आहे. चला, आत्ता घोषणा करतीलंच.”
“खरंच, ही गुड-न्यूज़ आहे,” कपितोनव सहमति दाखवतो.
भिंतीपासून थोडी दूर, दोन पायांवर आणि क्रॉसच्या आधारावर प्लायवुडची एक फ्रेम उभी आहे – त्यावर नवीन वर्षाच्या क्रिसमस ट्रीची जाहिरात चिटकली आहे: सांता क्लॉज़, डावा हात छडीवर टेकवून आणि उजवा हात लेनिनच्या स्टाइलमधे पसरून उभा आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे विचित्र वाटतं.
“हे पार्टीशन नाहीये, पण चालेल,” ‘तलावम्हणतो आणि त्या फ्रेमचा पाय उचलतो.
कपितोनव दुसरा पाय उचलतो.
तुमच्या पक्षांत फक्त दोन मत होते. एक माझं होतं.”
दोघं मिळून पार्टीशन सरकावतात.
“पण, तुम्हांला, आशा आहे, की निवडलंय?”
“प्रश्नंच नाही. प्लीज़ परवानगी द्या, मी हे नाही सांगणार की माझ्या पक्षांत किती मतं पडले. लवकरंच माहीत होईल. तुम्हीं इथे उभे राहा, आणि मी तिकडे राहीन – तलावनिर्देश देतो आणि पार्टीशनच्या पलिकडे कपितोनवपासून लपून जातो.
“मला अजूनही समजंत नाहीये, की माझं नाव कशाला द्यायचं होतं,” कपितोनव म्हणतो.
“आम्हीं सगळं बरोबरंच केलं होतं. आणि तुम्हीं आमची मदद अश्याप्रकारे केली, की आपल्या उमेदवारीचा विरोध नाही केला. समजावण्याला खूप वेळ लागेल. पण तुम्हांला – थैन्क्स.”
दार किंचित उघडून कोणीतरी हॉलमधून डोकावलं.  
“प्लीज़, डिस्टर्ब नका करू! आमच्यांत पुरुषांची गोष्ट चालली आहे!” पार्टीशनच्या मागून तलावओरडतो, आणि लगेच दार बंद होतं.
“तुम्हीं तयार आहांत?” कपितोनव विचारतो.
“मी नेहमीच तयार असतो. मला काय करायचंय. पण तुम्हीं तयार आहांत कां? लक्ष केंद्रित कराल कां?”
“नाही करणार.”
कपितोनव दीर्घ श्वास घेतो.
“दोन अंकांची संख्या मनांत धरा,” कपितोनव नेहमीसारखं म्हणतो.
“धरली.”
“त्यांत 13 जोडा.”
“जोडले.”
“अकरा वजा करा.”
“तुम्हीं 21 धरले होते.”
“ब्लैक जैक.” (पत्त्यांचा एक खेळ – अनु.)
“काय ब्लैक जैक?”
“पुन्हां पत्ते.”
“तुम्हीं समजतांय की माझ्याकडे सुपर-इन्ट्यूशन आहे.”
“ठीक आहे. धरली.”
“त्यांत 8 जोडा.”
“आणि जर नाही जोडले तर?”
“तुम्हीं जोडा नं!”
“ठीक आहे, जोडले.”
“4 वजा करा.”
“हेंच तर, कशाला, कशाला? ठीक आहे, वजा केले.”
“73”.
तलावअर्धा मिनट चुप राहतो, मग निर्णयात्मक घोषणा करतो:
“सगळं स्पष्ट आहे. तुम्हीं चेहरा नाही बघंत, पण आवाज ऐकता. हे, आवाजाने. पुन्हां, पण ह्यावेळेस मी चूप राहीन.”
“संख्या धरा,” कपितोनव म्हणतो, “दोन अंकांची.”
तलावउत्तर नाही देत. मग कपितोनव म्हणतो:
“त्यांत 5 जोडा.”
तलावचूपंच राहतो.
“3 वजा करा,”
त्याला उत्तर नाही मिळंत.
“तुम्हीं धरली होती 99.”
त्याबाजूने पार्टीशनवर प्रचण्ड धक्का बसला. हा तलावखाली पडतोय. कमकुवंत आधारामुळे एका कोप-याने कपितोनवच्या चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन उसळतंय.
पार्टीशनसोबत तलावपण धप्पकन फरशीवर पडतो.
कपितोनव तिकडे धावतो, आणि भीतीने थिजून जातो. तलावपाठीवर पडला आहे. त्याचा चेहरा विकृत होत आहे. त्याचे डोळे उघडे आहेत. तो अजूनही श्वास घेतो आहे (की कपितोनवला असं वाटतं की तो अजूनही श्वास घेतोय).
“एम्बुलेन्स! एम्बुलेन्स!” कपितोनव ओरडतो, आणि हाताच्या झटक्यामुळे खिशांत ठेवलेला मोबाइल छताकडे उसळतो.
दार धाडकन् उघडतं, आणि कोणीतरी फरशीवरून मोबाइल उचलणा-या कपितोनवला टक्कर मारतो. आणखी दोन जादुगार धावतंच खोलीत येतात.
आणि, कपितोनवच्या हातांतून मोबाइल पुन्हां बेडका सारखा उडी मारतो.
“त्याने संख्या धरली होती...99...मला वाटलं नव्हतं...मला असं वाटंत नव्हतं...कोणीतरी एम्बुलेन्स बोलवा.”
तिला बोलावलेलं होतं.
आवाज ऐकू येतात:
“त्याने त्याला काय केलं?”
“तुम्हीं त्याला काय केलं?”
“हा तर मेलाय.”
“कोणी हृदयाची मसाजकरू शकतं कां?”
“नेक्रोमैन्सरला बोलवा!”
“तो नेक्रोमैन्सर (ओझा) आहे, जीवनरक्षक नाही!”
“बघा, इथे रक्त आहे!”
रक्त कपितोनवच्या चेह-यावर आहे – पार्टीशनच्या कोप-यामुळे त्याची हनुवटी खरचटली होती.
अंधार होऊं लागला, धुकं दाट झालं, धुंध पसरली, प्रत्येक गोष्ट तरंगत असलेली वाटू लागली – हे सगळं त्याच्या डोळ्यांत आहे, तो ग्लासेससारख्या, एकांत एक ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांच्या टॉवरचा आधार घेऊन उभा आहे. तलावच्या उघड्या डोळ्यांबद्दल फक्त येवढंच सांगता येतं: डोळ्यांची बुब्बुळं स्थिर आहेत.     
खोलींत लोकांची गर्दी वाढू लागलीय. सगळ्यांना एकच काळजी आहे कि कपितोनव कसा वागतो आहे, ‘तलावकसा पडला आहे.
आपसांत विचार-विमर्श करतात:
“काय भांडण झालं होतं?”
तलावने म्हटलं होतं की त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होणार आहेत!”
ज्युपिटेर्स्की सगळ्यांना बाहेर काढण्याची जवाबदारी घेतो.
एडमिनिस्ट्रेटर येतो, तो पुनरावृत्ति करतो: “हे भयंकर आहे! हे भयंकर आहे!”
ही गोष्ट सगळ्यांना कळलीये की तलावने 99 संख्या धरली होती.

15.42

लिओन्ती करास, ड्राइंगरूम-मैजिक मास्टर, ज्याने अंगणांत एम्बुलेन्सच्या टीमचं स्वागत केलं होतं, तिला घेऊन मृत देहाजवळ येतो: एक महिला डॉक्टर आणि दोन उत्साही सहायक झर्रकन खोलींत येतात, त्यांना अजूनही काही आशा आहे.
“खोली रिकामी करा,” डॉक्टरने हुकुम सोडला.
खोली फक्त दोनंच लोक रिकामी करूं शकतात (बाकी लोक निघून गेले होते) – कपितोनव, जो जसा उभा होता, तसांच उभा आहे, आणि जादुगार-माइक्रोमैजिशियन झ्दानोव, ज्याला चौकस ज्युपिटेर्स्कीने स्वतः कपितोनवकडे लक्ष ठेवण्याचा निर्देश दिला होता.
दोघं दाराकडे जातंच होते, की त्यांच्यामागे डॉक्टर ओरडली. मागे वळले.
“हे काय आहे???”
तलावच्या कोटाच्या बाहीतून पांढरा उंदीर बाहेर निघाला. तो तलावच्या गार पडलेल्या हातावर नाकाने टक-टक करतोय.
तलावफक्त पत्त्यांच्या जादूचाच स्पेशलिस्ट नव्हता, त्याला आणखीही अनेक प्रकारचे जादू येत होते.
“ज़्यूज़्या,” झ्दानोव म्हणतो.
झ्दानोव ज़्यूज़्याला उचतो आणि आपल्या रेघांच्या कोटाच्या चौड्या खिशांत ठेऊन घेतो, कपितोनवला रस्ता देऊन स्वतः त्याच्या मागे-मागे बाहेर निघतो.

15.47

हॉलमधे जादुगार उगीचंच इकडे-तिकडे फिरंत आहेत. काही लोक खुर्च्यांवर बसलेय. आणि, कारण की ते त्या दाराकडे पाठ करून बसले आहेत, ज्यांतून कपितोनव आणि झ्दानोव बाहेर निघाले होते, म्हणून कपितोनव हॉलमधे परत आलाय, हे त्यांना फक्त तेव्हांच कळतं, जेव्हां हॉलमधे हिंडत असलेले लोक आपापाल्या जागेवर थिजून जातात. ते, जे बसलेले आहेत, वळले आणि चुपचाप कपितोनवकडे बघूं लागले.
“मी पुन्हां कधीच नाही...कधीच नाही...” कपितोनव जणु स्वतःच्या आवाजांत नाही बोलंत, “कधीच...कोणालाही...नाही म्हणणार...मनांत संख्या धरायला.”
जेवढं त्याला सांगायचं होतं, त्यापेक्षां जास्तच बोलून गेला, आणि जोर देऊन:
“कधीच नाही...” कपितोनव म्हणाला.
पण:
“शांत व्हा, शांत व्हा!” आपल्या समोर नीनेलला बघतो.
त्याने आठ्या चढवल्या – ती हनुवटीच्या जखमेखाली रुमाल ठेवते.
“एकही शब्द नका बोलूं. जे पण तुम्हीं बोलाल, त्याचा तुमच्या विरुद्ध उपयोग होऊ शकतो.”
दोघापैकी एक सहायक – कपितोनवला दोघांमधे फरक करणं जरूरी नाही वाटलं – खोलीतून बाहेर निघून त्याच्याजवळ येतो:
“तुम्हीं साक्षीदार आहांत कां? मला काही प्रश्न विचारायचेत.”
“कशाला?” नीनेल कडकपणे विचारते.
“कॉल-चार्ट भरतो आहे. मृत्युची वेळ, तुमच्या हिशोबाने, पंधरा मिनिटांपूर्वी? नोट केलं होतं कां?”
“हे बरोबर आहे, मी त्याला फक्त संख्या धरायला सांगितलं होतं!”
हे काय साधारणपणे आहे?”

15.51
मृतकाला खोलींत त्याच्याच भरवशावर सोडलेलं आहे. एम्बुलेन्सची पूर्ण टीम (ड्राइवरला सोडून) हॉलमधे बसली आहे. कुठे जायची घाई नाहीच आहे. कागद-पत्र भरतांत आहे. डॉक्टर कॉल-कार्डवर नजर टाकते, जे सहायकाच्या हातांत आहे.
“ठीक आहे, सेन्या, स्टेटमेन्टमधे तीन मिनिट आधीची वेळ टाक...तसं, नाही, थांब, आपण केव्हां पोहोचलो होतो?...आणि तुझ्याकडे मृत्यु किती वाजता झाला?…सध्या जे आहे, तेच लिही. आता किती वाजलेत?”
                     
         
15.57

मेडिकल टीम आता कपितोनवमधे उत्सुकता नाही दाखवंत आहे. इथे इतर लोकपण आहेत, जे कपितोनवपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. जादुगार-माइक्रोमैजिशियन डॉक्टरला सूचित करतो की “त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होत होत्या”, आणि फक्त आतांच कपितिनवला कल्पना येते, की तो झ्दानोव होता, जो त्या वेळेस खोलींत डोकावला होता. जर कपितोनवला सोडलं, तर जादुगार-माइक्रोमैजिशियन झ्दानोव शेवटचा होता, ज्याने मृत तलावला शेवटचं ऐकलं होतं (पण सान्ताक्लॉज़वाल्या पार्टीशनमुळे बघितलं नव्हतं!).
डॉक्टरला दुस-याच एका गोष्टीबद्दल माहिती हवी होती. कुणी अशी व्यक्ति आहे का, जी अगदी बरोब्बर सांगू शकेल, की तलावएथेरोस्क्लेरोसिसची ट्रीटमेन्ट घेत होता कां. प्रमाण विरोधाभासी आहेत.
“बाइ चान्स, इथे कुणी नातेवाईक आहेत?”
इथे कुठून आले नातेवाईक?
पण त्यांना सूचना दिलेली आहे. भाऊ लवकरंच पोहोचतोय.
ही विनंती करण्यांत येते – आणि ह्या शब्दसमूहाचा सगळ्यांवर फार मोठा प्रभाव पडतो – सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप येईपर्यंत कुणीही खोलींत येऊं नये.
“कुणावर संदेह आहे का? मुद्दा, शेवटी काय आहे?” नीनेल उठून विचारते.
“आकस्मिक मृत्यु, आम्हांला त्यांना बोलवावंच लागेल.”
कपितोनव खिडकीजवळ बसलाय. नीनेल त्याच्याजवळ आली.
“घाबरूं नका, त्यांना बोलवावंच लागतं.”

16.04

डॉक्टर:
“तुमची हनुवटी.”
“हनुवटी – खड्ड्यांत जाऊं द्या, पण झोपेचं औषध आहे कां?”
“तुम्हांला सेडेटिवची गरज आहे.”
नीनेल:
“त्यांना सेडेटिवची काही गरज नाहीये. मी स्वतःच त्यांना शांत करेन.”
त्याच्याजवळ बसून, त्याच्या हातावर हात ठेवते.
“कपितोनव शांत राहा, मी इथे आहे.”
तो उठून पैसेजमधे मागे-पुढे हिंडू लागतो.

16.06

डॉक्टर आणि सहायक जात आहेत. पोडियमच्या जवळ महाशय नेक्रोमैन्सर उभा आहे, रिमोटिस्टला चुकवून जाणं अशक्य आहे. डॉक्टर आणि सहायक थांबले.
“मित्रांनो,” नेक्रोमैन्सर म्हणतो. “होमिओस्टेसिस (समस्थापन – अनु.). फीडबैक. नाज़ुक, सगळंच अगदी नाज़ुक, मित्रांनो”
डॉक्टर:
“तुम्हीं डॉक्टर आहांत कां?”
“मी नेक्रोमैन्सर आहे.”
ते कडेकडेने त्याच्याजवळून जातात, जातां-जातां त्याला बघंत राहतात.

16.13

महाशय, असं वाटतंय, की सगळं काही अगदी स्पष्ट आहे. आपण वलेन्तीन ल्वोविचच्या स्मृतींत एका मिनिटाचं मौन ठेऊन मग ऑडिट-कमिटीची रिपोर्ट ऐकूं शकतो कां?”
कपितोनवला हेपण ऐकूं येतं:
“थांबा, शरीर अजून गार नाही झालंय.”
“कमींत कमी शरीर गार होईपर्यंत तरी थांबू या.”
“शरीर – शरीर आहे, आणि काम – काम.”
सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप येईपर्यंत तरी थांबलंच पाहिजे आणि ते गेल्यावरंच सेशनचं काम पुढे नेऊं या.”
“वाट बघू. घाई करण्याची गरंज नाहीये.”

16.38

“कपितोनव, ओळखतांय न? मी नीनेल पिरोगोवा आहे. घाबरूं नका, सगळं ठीक आहे. तुम्हांला तुमच्या योग्यतेबद्दल सांगावसं वाटतंय. तुम्हांला वाटतंय की तुम्हीं बस, असेच आहांत. विचार करा, संख्या! आणि कदाचित, संख्या – त्या फक्त आइसबर्गचा तो भाग असतील, जो दिसतो, तोसुद्धां तुम्हांला सगळ्यांत जास्त दिसणारा. कदाचित, तुम्हांला...माहीत आहे...जसे प्राचीन हीरो...पर्सियस किंवा हर्क्युलस...किंवा त्यांच्याहीपेक्षा उत्तम! तुम्हीं प्राचीन देवता आहांत, फक्त तुम्हांला स्वतःलाच ह्याबद्दल माहीत नाहीये. कपितोनव, मी गंमत नाही करंत, तुम्हीं देव आहांत. नाहीतर संख्या...विचार करा, संख्या!”
“नीनेल, मी थोडा थकलोय. तुम्हीं मला एकटं सोडूं शकता कां?”
“हो, नक्की, फक्त आपला आत्मविश्वास नका गमावूं.”

16.51

हॉलमधे तलावचा भाऊ प्रवेश करतो, जणु खूद्द तलावंच आहे, पण मोठा.
काढलेला ओवरकोट खुर्चीवर फेकतो, ओवरकोटच्या खांद्यांवर बर्फाच्या विरघळलेल्या कणांचे डाग आहेत.
विणलेली टोपी तो नाही काढंत.
माहीत नाही कां, सगळेंच, जे त्याच्याकडे बघंत आहेत, अंदाज़ लावतात आहे, की तो नातेवाइक आहे, भाऊंच आहे, जणु तलावंच आहे, पण – मोठा.
“जर थोडा वेळ इथे थांबायचं असेल,” मृत्यु झालेल्या खोलीचं दार उघडंत ज्युपिटेर्स्की म्हणतो, “तर, प्लीज़, या, पण अगदी थोडांच वेळ इथे थांबा, बघून घ्या, म्हणजे, हात नका लावूं. आम्हीं इन्वेस्टिगेशन टीमची वाट बघतोय.”
तलावचा भाऊ चुपचाप आत जातो.
एक-दोन मिनिट तिथे थांबून बाहेर येऊन जातो.
हेरा-फेरीवाला जादुगार चुबार त्याच्या बाजूलांच होता, तो त्याला काही म्हणतो, हळूंच, डोळ्यांनी इकडे-तिकडे खुणा करंत. तलावचा भाऊ तीक्ष्ण नजरेने हॉलकडे बघतो, आणि कपितोनवला वाटतं की त्यालांच शोधताहेत.
जादुगार-माइक्रोमैजिशियन पहिल्या सारखांच कपितोनवपासून दूर नाही होत, म्हणून तलावचा भाऊ, जेव्हां जवळ आला, तर त्या दोघांच्याही जवळ आला. कपितोनव ह्या गोष्टीसाठी तयार होता, की त्याला काहीतरी विचारतील, पण तो चुकला – तलावचा भाऊ झ्दानोवकडे वळतो.
“मला सांगण्यांत आलंय, की तुम्हीं ते शेवटचे व्यक्ति आहांत, ज्याने माझ्या भावाचा आवाज ऐकला होता.”
“शेवटच्या आधीचा,” झ्दानोव उत्तर देतो. “मी दार उघडलं, आणि तुमच्या भावाने मला सांगितलं, की त्यांच्यांत पुरुषांची गोष्टहोते आहे – ह्याच्यासोबत. मला माहीत नाही की नंतर त्यांने कशाबद्दल गोष्टी केल्या.”
“कशाबद्दल?” ‘तलावचा भाऊ कपितोनवच्या डोळ्यांत बघतो.
“जितकं मला आठवतंय,” कपितोनव म्हणतो, “तो चूप होता, आम्ही ठरवलं होतं की बोलेन फक्त मी. आणि पुरुषांची गोष्ट’ – हा फक्त अलंकार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, त्याहून जास्त काही नाही. त्याने फक्त संख्या मनांत धरली, मी ओळखली, आणि...माझ्या संवेदना स्वीकार करा. मला खरंच अत्यंत दुःख आहे.”
“कोणची संख्या?”
“99.”
“माझ्या भावाने कोणची संख्या मनांत धरली होती?”
कपितोनवने पुन्हां सगळ्याची पुनरावृत्ति नाही केली.
“आणखी कोणची पुरुषांची गोष्टअसू शकते? ज़्यूज़्या कुठेय?”
झ्दानोवने असं दाखवलं, जणु ऐकलंच नाहीये.
“ज़्यूज़्या कुठेय?” ‘तलावच्या भावाने पुन्हां विचारलं.
झ्दानोव जायला बघतो, पण तेवढ्यांत कपितोनव म्हणतो:
“झ्दानोव, थांबा!”
झ्दानोव अनिच्छेनेच पांढरा उंदीर खिशांतून बाहेर काढतो, ‘तलावचा भाऊ डाव्या हाताने त्याला घेतो, उजव्या हाताने डोक्यावरची विणलेली टोपी काढतो आणि त्यांत उंदराला ठेवून देतो. राहिला टोपीचा प्रश्न, तर त्याने आता तिला पिशवीसारखं धरलंय. ज़्यूज़्या आता पिशवीत आहे.

तलावचा भाऊ शेवटच्या रांगेपर्यंत जातो, खुर्चीवर बसतो आणो हातांत टोपी-पिशवी धरून बसून राहतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें