शनिवार, 20 जनवरी 2018

धनु कोष्ठक - 15


किनीकिनशी बोलणं झाल्यावर कपितोनवचं मन थोडं शांत झालं होतं, म्हणून कशी वोटिंग करावी ह्याने त्याला काही फरक पडंत नव्हता. पण, नाही, तो इतक्या खालच्या पातळीवरपण नाही उतरणार की पत्तेबाज आणि हाइपरचीटर्सशी झालेल्या कालच्या भांडणानंतर त्यांना मत देईल, आणि इथे तो तलावच्या संपर्कांत आहे. तो शब्द देतो, की अगदी बरोबर मत देईल.
“तुमच्याकडे नेक्रोमैन्सरचा नंबर आहे कां?” कपितोनव विचारतो.
“तुम्हांला कशासाठी हवाय?” ‘तलावसतर्क होतो.
“त्याच्याजवळ माझी ब्रीफकेस आहे. परंत घ्यायची होती.”
“फोन नंबर नाही देऊं शकंत. पण तुम्हीं घाबरू नका, तो इतक्यांत येईलंच. एकही मत गमवायला नको. त्याने आत्ताच मला फोन केला आहे.”
“आणि तो गेला कुठे होता, त्याने काही सांगितलं कां?”
“मी विचारलंच नाही.”
“खरंच? दिवसभर तो सेशन्समधे नव्हता, आणि तुम्हीं विचारलं नाही?”
“जेव्हां तो येईल, तेव्हां स्वतःच विचारून घ्या. पण हा वाईट सल्ला आहे. चांगला हा आहे: चांगल हे आहे, की कशाहीबद्दल नका विचारू. जसा मी. तुमच्यासाठी हे आवश्यक आहे कां?”
“मला कमीत कमी येवढं कळेल का, की नेक्रोमैन्सर महाशयांच नाव काय आहे. मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेण्टने सांगितलंय की ते काही सीक्रेट नाहीये.”
“तर तुम्हीं मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेण्टलाच विचारलं असतं.”
“इन्नोकेन्ती पेत्रोविच आहे न?”
“मी मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेण्ट नाहीये. बाइ द वे, तुम्हीं कबूल केलं होतं की पार्टीशनच्यामागे मला आपला प्रोग्राम दाखवाल.”
बाइ द वे’?” कपितोनव पुनरावृत्ति करतो. “काही संबंध आहे कां?”
“कसा नसणार? आपल्या जगांत प्रत्येक वस्तू संबंधित आहे, प्रत्येक वस्तूशी.”
कपितोनवला प्रतिवाद करायचांय: त्याचं मत आहे की आपल्या जगांत रैण्डम-फैक्टर खूप मोठा आहे, पण तेवढ्यांत घोषणा होते की सगळं तयार आहे आणि सुरू करायची वेळ आलेली आहे.

13.25

मतदान व्यवस्थितपणे सम्पन्न होतं, कोणत्याही गडबडीशिवाय.
मत देऊन झालेले लोक रस्त्याच्या पलिकडच्या कैफेत लंचसाठी जातात.
कपितोनव आपल्या वचनाप्रमाणे जी नावं खोडायची आहेत, ती खोडून टाकतो, आणि स्वतःचपण (तो विसरूनंच गेला होता, की तो पण एक उमेदवार आहे, आणि त्याला बुलेटिनमधे स्वतःचं नाव बघून फार आश्चर्य झालं होतं).

13.58

कैफे रस्त्याच्या पलिकडे आहे. जेवण तसंच आहे.
आणि हे जेवणकाय असतं? नाही, हे तर कळतं की जेवणकाय असतं, हे कळंत नाही की जेवणाचं काय करतात – कोणत्या क्रियेला तो स्वतःवर होऊ देतो?
जेवणखातांत, - आणि जेवणाबद्दल सगळं अगदी बरोब्बर सांगता येतं, पण तरीही, जास्त एब्स्ट्रेक्ट रूपांत सांगितलं तर, ‘जेवणाचं काय होतं, जर जेवण शब्दाने टेबलवर होत असलेल्या लांब लचक प्रक्रियेबद्दल विचार केला तर, ज्यांत अन्नाची नितांत आवश्यकता असते?”
जेवणलांबतंय? ‘जेवणहोतंय? काय जेवणहोण्याची कोणची जागा असते?
साधारणपणे जेवणज्यांत कपितोनव भाग घेतो आहे, त्याची एक जागा आहे, नक्कीच, त्याचं अस्तित्व आहे, ते लांबतं, होत असतं, पूर्ण होतं –मित्रांच्या जेवणाच्यामैत्रीपूर्ण आणि शांततेच्या वातावरणांत.
जेवणचांगलं खाल्लं जातं.
कपितोनवला आठवलं की जेवणाबद्दल काय म्हणतात: जेवणचाललंय.
ह्या दृष्टीने जेवणजीवनाची आठवण करून देतं.
की जीवन जेवणाचीआठवण देतं.

14.00

हा आहे कपितोनव, तो गार वेजिटेबल सूप खातो आहे. डेलिगेट्सला लंचसाठी दोन पर्याय दिलेले होते – पहिल्यांत साधारण सूप, दुस-यांत गार सूप. काल प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत मेन्यूमधे , चिन्ह बनवलं होतं. थण्डीमुळे बहुतांश लोक गरम सूप घेत होते. ह्या कॉन्फ्रेन्समधे उशीरा आल्यामुळे कपितोनवकडे सीमित पर्याय आहे. वरून त्याला गार सूप आवडतं. हिवाळ्यांतसुद्धां.
जेवण, किंवा डिनर म्हणा – टेबल्सवर होत आहे : इथे सहा-सहा सीट्सवाले टेबल्स आहेत. निळ्या चोग्यांत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आणि कपितोनवला, कॉन्फ्रेन्सला उशीरा आल्यामुळे, शेवटच्या, लांब टेबलाशी बसावं लागलं. ह्या लांबोळ्या टेबलाशी त्यांच्याबरोबर बसले होते – हेरा-फेरीवाला पेत्रोव आणि माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी. दोन खुर्च्या रिकाम्या होत्या.
हेरा-फेरीवाल्या पेत्रोवने सूपचा एक चमचा चाखून नेक्रोमैन्सरबद्दल विचारपूस सुरू केली.
“नेक्रोमैन्सर महाशय,” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उत्तर देतो, “क्वचितंच येईल.”
“असं कां?” कपितोनव सतर्क झाला.
“कारण की मी इथे आहे,” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उत्तर देतो.
“आणि काळ-भक्षक?” अदिनोच्नी विचारतो.
“काळ-भक्षक अन्य कारणाने नाही येणार.”
ते खात आहेत.
जेवताना चारीकडे लोक बोलतांत आहे. वेगवेगळे आवाज येत आहेत:
“अरे, जर तुम्हांला माहीत असतं, की इंडियामधे आम्हांला कसं खाऊ घातलं होतं – फकीरांच्या उत्सवांत!”
“कोणी फिश-मीटबॉल्सला चॉकलेट-ट्रफल्समधे बदलूं शकतो कां?”
“हा प्रश्न श्रामसाठी आहे, त्याला सम्मोहन-क्रियायेते.”
“मीशा, तू तर पार गेलास!”
“ट्रफल्स, ट्रफल्स!”
“पण, सगळ्यांच्याचसाठी!”
“मित्रांनो जे तुम्हांला देतात आहेत, खा,” श्राम उत्तर देतो. “तुम्हीं तर समजूं शकता, की फिश-मीटबॉल्स आणि ट्रफल्सच्या किंमतीत किती अंतर असतं? ही फार महागडी वस्तू आहे.”
जेवण्याने सगळ्यांना शांत केलं आहे – जेवणाच्या दरम्यान सगळ्यांकडे एकंच काम आहे : जेवणावर काम करणं.
“मित्रांनो, अटेन्शन! मैक्सिम नेगराज़्दक आपला जादू दाखवतात आहेत!”
“हा नटबघताय ना?” मैक्सिम नेगराज़्दक उठून उभा राहिला. “मोट्ठा, वजनदार. आता मी ह्याला गिळून टाकेन.”
नटतर्जनीवर चढवलेला होता. हेराफेरीवाला – गिळंकृत करणारा मैक्सिम नेगराज़्दक फोर्कने नटवर मारतो, धातूचा आवाज प्रदर्शित करण्यासाठी. नटने टेबलवर ठकठक करत, लाकडाचा आवाज प्रदर्शित करायला. तोंड उघडतो, तिथे नटघुसवतो, आणि थोडं थांबून गिळून टाकतो.
त्याचे डोळे सामान्य स्वरूपांत बाहेर निघतात, आणि कपितोनवला समजंत नाही, की ही आर्टिस्टिक ट्रिक होती की शरीराची स्वाभाविक प्रतिक्रिया.
मैक्सिम नेगराज़्दक कैनबेरी-जूस पिऊन नटला आत ढकलतो.
लोक टाळ्या वाजवतांत, पण सगळे नाही.
तो काय खरंच गिळून गेला?” कपितोनव आपल्याबरोबर जेवंत असलेल्या लोकांना विचारतो.
“जोकरंच जाणे,” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी म्हणतो. “माझ्या हातांत असतं तर मी अखाद्य वस्तूंच्या कार्यक्रमावर बंदी घातली असती.”
“असं शक्य नाहीये,” हेरा-फेरीवाला पेत्रोव म्हणतो. “ह्याच्यामागे एक मोठी परंपरा आहे. तलवारी खाणारे, काच खाणारे...”
फिश-मीटबाल्सच्या ऐवजी फिशचा आणखी एक प्रकार देण्यांत येतो, ‘कॉडभरलेले आलू वडे.
“मित्रांनो,” मोबाइल दूर करंत तलावउठून म्हणतो. “गुड एपेटाइट, पण माझ्याकडे दोन बातम्या आहेत, दोन्हीं चांगल्या आहेत. पहिली : ऑडिट कमिटी साडे तीन वाजेपर्यंत काम पूर्ण करेल. आणि दुसरी: इतक्यातंच पक्की बातमी आलीये, की हॉटेलचा फायरप्लेसवाला हॉल आपल्याकडेच राहील. ग्राण्ड-डिनर बरोब्बर वेळेवर आणि निश्चित ठिकाणीच होईल!”
डेलिगेट्स यंत्रवत् टाळ्या वाजवतांत, आणि त्यांच्या तोंडातून हुर्रेसुद्धां येतं. आणि एक व्यक्ति ओरडतो:
“माफ केलं!”
जेवणाच्या दरम्यान हेराफेरीवाला पेत्रोव ईवेन्ट्स-आर्किटेक्टकडे तिरप्या नजरेने बघंत होता, शेवटी त्याने विचारूनंच घेतलं:
“मला कळलं नाही की तुम्हीं करता काय, पण मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, की आपल्या कलेबद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे? तुम्हांला वाटतं का की तिचा जादूगरीशी काही संबंध आहे?”
“म्हणजे, तुम्हांला म्हणायचं आहे, की जादूच्या खेळांशी?” आपल्या ओवरॉलचा पट्टा ठीक करंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट त्याला नीट करतो.
“हो, तुमच्या कलेसाठी ह्या शब्दाचा उपयोग करायला मी घाबरंत होतो.”
जादूह्या शब्दाने मी घाबरंत नाही. प्रोफेशनल क्षेत्रांत तसा तो खूपंच गुळगुळीत झालेला आहे. पण जेव्हां आपण जादूह्या शब्दाचा प्रयोग करतो, तेव्हां आपल्याला ह्या महान शब्दाच्या सगळ्याच अर्थांकडे लक्ष द्यावे लागेल.”
“विशेषकरून तुमच्या तोंडून हे ऐकून आनंद झाला.”
“आणि मग, अशी वस्तू घ्या, जसं युनिवर्स. युनिवर्सचा प्रादुर्भाव, हा मोट्ठा जादू नाही तर काय आहे. ते, ज्याला आपण मोठा-विस्फोटम्हणतो, त्याला मोठा-जादूम्हणायला हवं.”
“आणि काय खरोखर विस्फोट झाला होता? काही लोकांचं मत आहे की काही विस्फोट-बिस्फोट नव्हता झाला.”
“कदाचित ही लक्ष वळवण्याची पद्धत असेल?” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी नाक खुपसतो.

“युनिवर्सच्या संदर्भांत लक्ष वळवण्याची पद्धतम्हणणं, निःसंदेह अपमानजनक आहे. पण पहिल्यांदा असंही म्हणता येईल. तुम्हीं बरोबर म्हणताय, सगळ्यांना असाधारणतेचंआकर्षण असतं. पण त्याची काही ग्यारंटी नाहीये, मुख्य मुद्दा – आणखीनंच काही आहे.”

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें