शुक्रवार, 5 जनवरी 2018

धनु कोष्ठक - 10




आपल्या खोलींत (अजून वेळ आहे)

08.55

तो टी.वी. सुरू करतो आणि कपडे बदलतो.
तो गिफ्ट मिळालेली ब्रीफकेस उघडतो आणि विचार करतो, की कॉन्फ्रेन्समधे महत्वाचे कागदपत्र आणि जादुची छडीघेऊन जावी, किंवा नाही. तो ठरवतो की ब्रीफकेसमधून काहीही बाहेर नाही काढणार आणि त्यांतच मूखिनची नोटबुक ठेऊन देईल – म्हणजे की कशी तरी मरीनाला परंत देता येईल.
तेवढ्यांत मरीनाचा फोन आला. लवकरंच आहे. त्याने विचार केला, की गोष्टी नंतर होतील. ह्यावेळेस तो बोलायला तयार नाहीये. म्हणून लगेच कनेक्ट नाही केला.
“वाचलं?”
“वाचलं.”
“काय म्हणशील?”
“काय म्हणेन... तुला काय ऐकायचंय?”
“हा संशोधक कोण आहे?”
“मरीनोच्का, मला नाही माहीत. ते नोट्स बघतां, तुला, कदाचित माझ्यापेक्षां जास्त चांगलं माहीत आहे.”
“मला माहीत नाही, की संशोधक कोण आहे,” मरीनाने उत्तर दिलं. “पण हे सगळं भयानक होतं. मी खरंच दार तोडणार होते. सांग तर, मी बरोबर केलं ना? मला ह्यांत गोवण्यांत आलं, विचारपूस करण्यांत आली...माझी आइडेन्टिटी माहीत असूनसुद्धां. माझ्यावर शंका घेण्यांत आली. तू कल्पना करू शकतो कां? आणि मीपण नोटबुक नाही दाखवली. दाखवायला हवी होती कां? मी ठीक केलं ना, की नाही दाखवली?”         
“मरीन, तू त्यांना दाखवलं जरी असतंस, तरीही काही विशेष चांगल झालं नसतं. तू प्रत्येका गोष्टीचा नुसता गुंता करून ठेवला असता, त्यांत बरेचसे अंधारे कोपरे आहेत, ज्यांना समजावणं शक्यच नाहीये. तू अगदी बरोबर केलंस.”
“तू, तरीही, काय म्हणतो, त्याने हे सगळं कां लिहिलंय?”
“मरीनोच्का, मला नाही माहीत.”
“तो काय वेडा झाला होता? तो वेडा नव्हता. की होता?”
“जर तू समजतेस, की नव्हता, म्हणजे नव्हता. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यावेळेस तुझ्याशिवाय कुणी दुसरं नाही देऊं शकंत. जसं तू समजतेस, तसंच आहे. जसं तू म्हणशील, तसंच होईल.” 
“आणि, नोटबुक प्रमाण नाहीये कां?”
“नोटबुक - नोटबुक आहे.” त्याला पुढे हेसुद्धां म्हणायचंय की तो एक वाईट शेरलॉक  होम्स आहे, पण मरीनाने मधेंच म्हटलं:
“नंतर फोन करीन. गुड लक.”
कदाचित, नवरा आला होता. कपितोनवला सिग्नल्स ऐकू येतात.
तो नोटबुक ठेवलेली ब्रीफकेस बंद करतो.
कपितोनवचे डोळे लाल आहेत (तो आरशांत बघतो). जर दुस-या कोणाचं असं थोबाड असतं, तर कपितोनवला वाटलं असतं, की त्या माणसाची आत्ताच झिंग उतरली आहे. परिस्थिति विकट आहे. प्रत्येकाला तर तो समजावूं शकंत नाही, की अनिद्रेमुळे त्रस्त आहे.
हॉटेलमधे आग लागल्याची बातमी देताहेत – इण्डियात किंवा बांग्लादेशांत. 17 माणसं मेलेत. काय बांग्लादेशांत की इण्डियात?
आणि हे आहेत एक मुलगा आणि एक मुलगी, नवव्या वर्गाचे विद्यार्थी, एकमेकाचा हात धरून अकराव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर उडी मारली.
भिंतीच्या मागे काळ-भक्षक (कपितोनवचा शेजारी तोच आहे) गुरगुरतोय आणि ज़ोर लावतोय – तो ओकारी करण्याचा प्रयत्न करतोय.

09.12

कपितोनव खाली हॉलमधे आला. काळ्या ब्रीफकेसेस घेतलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स येऊं लागले आहे – आतापर्यंत जवळ-जवळ दहा-पंधरा लोक आलेत: दीवानवर आणि खुर्च्यांवर बसले आहे. काही लोक हिंडताहेत. ब्रोश्यूरमधे पाहिलेल्या फोटोने तो लगेच महाशय नेक्रोमैन्सरला(ओझा, मांत्रिक - अनु. ) ओळखतो, ज्युपिटेर्स्कीला ओळखतो, इतरांमधे तलावला बघतो...कालच्या घटनेनंतर हॉटेल प्रशासनने कॉन्फ्रेन्स हॉल मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांसाठी बंद करून टाकला होता, म्हणून आज दुस-या बिल्डिंगमधे मीटिंग होणार आहे, जी इथून फार दूर नाहीये. सगळे लोक जमले की त्यांना तिथे घेऊन जातील. कपितोनवच्या अंगावर आहे ओवरकोट आणि कैप.
त्याच्याजवळ हस्तांदोलन करण्यासाठी उत्सुक तलावयेतो, - अभिनंदन करतांना कपितोनवला त्याच्या डोळ्यांमधे किंचित उत्सुकता दिसते आणि तो लगेच न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो:
“अनिद्रा.”
“ओह, तुम्हीं पण काय! इथेसुद्धां? इथे अशी कोणची वस्तु आहे, जी तुम्हांला आराम नाही करूं देत आहे?” ‘तलावतक्रारीच्या सुरांत म्हणतो. “तसं, बाइ द वे,” तो कपितोनवला एका माणसाकडे आणतो, जो कंटाळल्यासारखा बाहुल्यांच्या शो-केस जवळ उभा होता. “ह्यांना भेटा – इथे फक्त तुम्हीं दोघंच मेन्टलिस्ट्स आहांत.”
दुस-या मेन्टलिस्टचं नाव आहे मिखाइल श्राम, त्याचं स्पेशलाइज़ेशन आहे – लपवलेल्या वस्तूंना शोधून काढणं. शिवाय त्याला सम्मोहनच्या प्रक्रियेचंसुद्धां ज्ञान आहे, आणि तलावची इच्छा आहे, की एखादा मिनट काढून श्राम31ने  कपितोनवला आपली झोप पूर्ण करण्यास, किंवा कमीत कमी डुलकी घेण्यांतच मदत करावी.
दोघांच्या खांद्यावर आत्मीयतेने थाप मारतो.
“आशा करतो, की तुमचं छान जमेल,” असं म्हणंत, रस्त्यावरून येणा-या टेलिविजन-टीम ला मित्रभावाने हाताने खूण करंत जाऊ लागतो.
श्राम कपितोनवला विचारतो:
“संख्यांवर, कदाचित, दोन अंकांच्या? तर, मी एखादी संख्या मनांत धरूं?”
“इच्छा असेल तर,” कपितोनव म्हणतो.
तो बेरीज, वजाबाकी करायला सांगतो, मनांत धरलेली संख्या सांगतो.
“समजलं,” श्रामला आश्चर्य नाही होत. “माझं सम्मोहन तुमच्यावर परिणाम नाही करणार.”
“मी सम्मोहनाच्या विरुद्ध आहे.”
“अस कशाला”? घाबरताय कां, की काहीतरी चोरून घेईन? मी मेंदू-चोर नाहीये.”
कोणनाहीये?”
“असं बघा, उठाईगीर असतात, खिसेकापू असतात, आणि मेंदू-चोरसुद्धा असतात. आशा आहे, की तुम्हीं मेंदू-चोर नाही.”
“नाही, हे काय म्हणताय, मी मेंदू-चोर नाहीये.”
“विकणार तर नाही? आम्ही विकतं घेतलं असतं. तुमचा रेट काय आहे?”
“प्रोग्राम? मेंदू? कशाबद्दल बोलतांय?”
“स्पष्ट आहे, प्रोग्रामबद्दल.”
“हे व्यावसायिक सीक्रेट आहे,” कपितोनव उडवा-उडवी करतो. “तुम्हीं तर सांगणार नाही, की तुमच्यावाल्याचा रेटकाय आहे.”
“कां नाही सांगणार? माझी प्राइस-लिस्ट सगळ्यांना ठाऊक आहे. प्रोगाम्स बरेचसे आहेत – कोणचा पाहिजे? दाखवलेल्या प्रोग्राम्सपैकी सर्वांत स्वस्त आहे – “कागद शोधा”, पाच हज़ार डॉलर्स, “लपवलेला गोल” – पन्नास. सम्पूर्ण निर्देशन-पत्रिकेसहित, गोलांच्या सेटसकट, ट्रेनिंग क्लासेस सहित. तीन क्लासेस पुरेशे आहेत. तरी, तुमचावाला कितीचा आहे? भाव खाण्याची गरंज नाहीये.”
“माझा – फक्त डोक्याने.”
“नम्रपणे धन्यवाद देतो. एक्स्ट्रा लफडं नाही घेणार.”
हॉटेलमधे राहणा-या सगळ्या लोकांना माहीत नाहीये, की मीटिंग इथेच कुठे नाही होणार आणि बर्फावर चालंत जावं लागेल. ब्रीफकेसेस हॉलमधेच ठेवून, ते गरम कपडे घालायला आपापल्या खोल्यांमधे जातात. काळ्या ब्रीफकेसेस फरशीवर उभ्या आहेत, आणि रिसेप्शन-काउन्टरवाले त्यांच्याकडे अप्रसन्नतेने बघताहेत.
“कालच्या घटनांच्या संदर्भात हे खरोखरंच चिंताजनक वाटतंय...विपत्तीच लक्षण नाही म्हटलं तर,” श्रामने जणु डोळ्यांने ब्रीफकेसेसवर नेम धरंत म्हटलं.
“पण, जर काही असेल, तर तुम्हांला तर बाहेरूनच बघून कल्पना येईल.”
“बाहेरून बघून नाही, तर साधारणपणे.”
“काळजीचं कारण तर नाहीये ना?”
मिखाइल श्राम चूप राहिला. जणु तो कपितोनवच्या कौशल्याचं उत्तर आपल्या एखाद्या विशिष्ठ चमत्काराने द्यायच्या बेतात आहे. त्याची नजर ड्रैगनवाल्या चीनी मातीच्या फ्लॉवरपॉटजवळ ठेवलेल्या ब्रीफकेसवर थांबते.
“ही माझी आहे,” कपितोनवने सावध केलं, ज्याने चुकीचा समंज व्हायला नको.
“ह्यांत कोणची तरी बाहेरची वस्तू आहे.”
“एका माणसाची नोटबुक आहे,” कपितोनव आनंदाने स्वीकार करतो.
श्रामच्या चेह-यावर लिहिलंय, “ मी तर नव्हतं विचारलं”; कपितोनवच्या सहमतिने दुःखी होऊन तो ह्या टिप्पणीकडे लक्ष नाही देत:
“नाही, तिथे आणखी काहीतरी आहे.”
आणि तो शो-केसकडे वळतो, चेह-यावर असा भाव आहे, जसं जरा जास्तंच बोलून गेलाय.
आपलं हसू आवरण्यास असमर्थ कपितोनवपण शो-केसकडे सरकतो – दुस-या : हिच्यांत पीटरबुर्गशी संबंधित सगळ्या प्रकारचे स्मृति-चिन्ह ठेवले आहेत. त्याला खूप हास्यास्पद वाटतंय, तो खुर्चीवर बसून जातो.
जास्तीत जास्त डेलिगेट्स येताहेत, आणि जवळ-जवळ सगळ्यांच्याच जवळ काळ्या ब्रीफकेसेस आहेत.
कपितोनवपासून तीन पावलांवर तलावटेलिविजनवाल्यांना इंटरव्यू देतो आहे.
09.25

“नॉनस्टेजर्स म्हणजे कोण?” कपितोनव रिपोर्टरचा खणखणीत आवाज ऐकतो (ज्या आत्मविश्वासाने ती कठीण शब्दांच उच्चारण करंत होती, त्यावरून कळंत होतं की मुलगी चांगली तयारी करून आली आहे).
“नॉनस्टेजर्स – आम्ही आहोत,” ‘तलावगर्वाने म्हणतो. “जादुगार, जे प्रदर्शनासाठी प्रयुक्त केल्या जाणा-या जागांशी संबंधित नसतात, - मग तो सर्कसचा अरेना असो, रॉम्प असो, किंवा एखादा स्टेज असो, ह्या शब्दांत दडलेल्या सगळ्यांच अर्थांच्या संदर्भात. आम्ही आपल्या कलेचं प्रदर्शन जगाच्या कोणच्याही कोप-यांत, आणि कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. ऑफिसमधे लहानशी पार्टी आहे? प्लीज़. कुणी कॉर्पोरेट आलाय? जितकं पाहिजे तितकं. ट्रेनचे रेस्टॉरेन्ट? कां नाही? जहाज-दुर्घटनेला सामोरे गेलेल्या लोकांची नाव? तिथेसुद्धां आम्ही तुमची मदत करू. कारण की आमचं काम आहे – लोकांचं मूडचांगलं करणं, त्यांना आनंदित करणं, सगळ्यांत जास्त आवश्यक आहे, त्यांना चकित करणं, चकित करणं आणि अनेक वेळा चकित करणं!”
आजच्या माणसाला तुम्हीं कसं चकित करूं शकता? जादूच्या साधारण खेळांनी?”
“कौशल्याने! नॉनस्टेजिंग – अत्यंत उच्चकोटीचं कौशल्य आहे. ते दर्शकापासून अत्यंत कमी अंतरावर प्रदर्शित केलं जातं, जेव्हां तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर फक्त वार्तालापाच्या माध्यमाने दर्शवलं जाऊं शकतं. आमच्या असोसिएशनमधे उगीचंच अत्यंत भिन्न-भिन्न प्रकारचे लोक नाहीत – माइक्रो मैजिशियन्स, हे आजकाल प्रचलित नाव आहे, पण तुम्हीं, कदाचित, त्यांच्याबद्दल ऐकलेलं नाहीये?...तुम्हीं म्हणता जादूचे साधारण खेळ’. पण माइक्रो मैजिशियन तुम्हांला असे-असे जादू दाखवेल...आगपेटीने किंवा साधारण चश्म्याने...तुमची मतीचं गुंग होऊन जाईल! माइक्रो मैजिशियन – सुपर जादुगार आहे, साध्या-सरळ, ओळखीच्या वस्तूंनी चमत्कार करतो. तो, उदाहरणार्थ, तुमचा माइक्रोफोन घेऊन बघता-बघता त्याला काकडीत बदलू शकतो, किंवा, जसं , मी तुमची अंगठी बघतो आहे...”
“ओय, ओय, राहू द्या! इथे पत्तेचोरआणि ठगसुद्धां आहेत...”
“मी विरोध करतो! हाइपर-पत्तेचोर आणि हाइपर-ठग. कृपा करून साधारण पत्तेचोर आणि ठगांशी ह्यांची तुलना नका करू. तसं तेसुद्धा काम करतातंच, अंगुश्तान आणि पत्त्यांने. पण आमचे, ते, जे हाइपर आहेत, असे आर्टिस्ट्स आहे, ज्यांचे साधारण पत्तेचोरांशी आणि ठगांशी अश्या प्रकारचे संबंध आहेत, जसे कायद्याचं पालन करणा-या ऑस्ट्रेलियन्सचे – आपल्या पूर्वजांशी, प्रत्येका प्रकारच्या गुन्हेगाराशी, ज्यांना जगाच्या दुस-या टोकावर निष्कासित केलेलं आहे. आमच्या पत्तेचोर आणि ठग उस्तादांसाठी अंगुश्तान आणि पत्ते – दर्शकांसाठी खेळाची महान सामग्री आहे, ह्या खेळांत जागरूक दर्शक हिरीरीने भाग घेऊं शकतो, चांगल्या प्रकारे कळंत असूनही की त्याला...कसं म्हणूं...हरवतांत आहे. पण त्याला कळतंच नाही – कश्या प्रकारे.”
“हाताची सफाई आणि कोणत्याही प्रकारचा घोटाळा न करता.”
“बरोबर, कोणताही घोटाळा न करता. आणि घोटाला करायचा तरी कशाला? हे तर आर्ट आहे. जर हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर त्याच्याशिवाय काम कसं चालणार, पण इथे न केवळ हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर मनोविज्ञानाची जाणीव असणंसुद्धां आवश्यक आहे, विश्लेषणात्मक बुद्धीचीपण गरज आहे. अश्या घटनासुद्धा होतात, जेव्हां हातांचा उपयोगंच नाही होत. मेंटलिस्ट जादुगार, उदाहरणार्थ, हाताच्या सफाईचा प्रयोग नाही करंत, उलट ते असाधारण कौशल्याने, ह्या शब्दाच्या प्रयोगासाठी मला क्षमा करा, तुमच्या देहभानावर अधिकार करतात. आमच्यांत एक मेंटलिस्ट आहे, जो कोणतीही लपवलेली वस्तू शोधून काढतो, तुम्हांला एकही प्रश्न न विचारतां, भले ही त्याला स्वतःलापण माहीत नसो की तुम्हीं कोणची वस्तू लपवली आहे. म्हणजे, त्याला तर माहीत आहे, प्रेज़ेन्टेशनच्या वेळांत सगळं काही जाणून घेतो. हे आहेत आणखी एक मेंटलिस्ट. तुम्हीं एखादी संख्या मनांत धरा, ते ओळखतील. कपितोनव महाशय, प्लीज़...”
खुर्चीत खचलेला कपितोनव चेह-यावरून असं दाखवतो की हे आवश्यक नाहीये, पण मुलगी त्याच्याकडे न बघतांच तलावला म्हणते:
“गरंज नाहीय्र! मला प्रश्न विचारून-विचारून बेजार करून टाकतील, फ्रेममधे फक्त तुम्हीं बोलाल, एकटे, म्हणून मला काही मनांत धरायची गरज नाहीये, मी नंतर स्वतःच धरीन, चला, पुढे चलूं. आणखी, काय तुमच्याकडे अतिरिक्त-संवेदी आहेत?”
“अतिरिक्त-संवेदी – ही वेगळी गोष्ट आहे. आम्हीं, मी पुन्हां सांगतो, एक्टर्स आहोत.”
“पण तुमच्याकडे ईवेन्ट्स-आर्किटेक्ट्स, स्थान आणि काळ-भक्षक तर आहेत...”
“त्यांच्यासाठी बहुवचनाची गरज नाहीये. त्यांच्यापैकी प्रत्येक अद्भुत आहे, अद्वितीय आहे. आमच्याकडे एक काळ-भक्षक आहे, तो स्थान भक्षण नाही करंत...एक ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे...: - त्याला पुढे म्हणायचं आहे “एक नेक्रोमैन्सर”, पण त्याला दाराजवळ उभा असलेला पाहून, त्याच्याकडे जास्त लक्ष आकर्षित न करण्याचे ठरवतो, नाहीतर रिपोर्टर लगेच त्याचा इंटरव्यू घ्यायला निघून जाईल, आणि गडबडून पुन्हां आपल्या विचारांची जुळवा-जुळव करूं लागतो. – “दुस-या शब्दांत,” ‘तलावपुढे म्हणतो, “प्रकाराच्या दृष्टीने आम्ही आपल्या समूहात विविधता आणायचा प्रयत्न केला आहे, म्हणून आम्ही तथाकथित रिमोटिस्ट्सला, नवीन, पण प्राचीन परंपरेवर आधारित प्रणालीच्या प्रतिनिधींनासुद्धां आमंत्रित केलं आहे. ह्यांच्याबद्दल दर्शकांचं आणि विशेषज्ञांचं मत नेहमीच एकसारखं नसतं. पण ह्या विशिष्ट मास्टर्सशी सहयोग करण्यांत खूपंच मजा येते.”
“काय नेक्रोमैन्सरसुद्धां त्यांच्यापैकीच एक आहे? तो मृतकांसोबत काम करतो कां?”
“मी पुन्हां एकदा सांगतो, आम्ही आर्टिस्ट्स आहोत, आर्टिस्ट आपल्या पात्राबरोबर न्याय करंत असतो. आणि मग, स्वतःला बुल्गाकोवच्या नायकाच्या जागेवर ठेवण्याची माझी इच्छा नाहीये, जो पब्लिकला समजावतो की काळ्या जादूचं अस्तित्व नसतं.”
“पण त्याचं अस्तित्व असतं कां?”
“आधुनिक मायावादात एका सुरेख प्रणालीचं अस्तित्व आहे, जिचं प्रतिनिधित्व – आम्हीं, जादुगार-नॉनस्टेजर्स करतो, आणि मी विनंती करतो, की ह्याच स्वरूपांत आमच्यावर प्रेम करावं, आणि आमची मदत करावी.”

09.31

“चला, मित्रांनो! वेळ झाली! तुतारी मार्चसाठी बोलावतेय!”
काही तुतारी-बितारी नव्हती, पण तुतारीशिवायंच – ऑर्गेनाइज़िंग कमिटीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार – माइक्रोमैजिशियन र्‍यूमिन लीडरचं कर्तव्य पार पाडायला समोर आला.
दाराजवळ उभा राहून तो जोराने घोषणा करतो:
“आपल्याला दुस-या बिल्डिंगमधे जायचंय, हे इथे जवळंच, ह्याच रस्त्यावर आहे.पण सावधगिरीचा इशारा देतो, महाशय, विशेषकरून जे लोक बाहेरच्या शहरांतून आले आहेत: रस्ता खूप निसरडा आहे!”

जादुगार हालचाल करूं लागतात आणि एक-एक करून हॉटेल सोडूं लागतात.
“एक-एक करून, एक-एक करून! षडयंत्राबद्दल विसरू नका!”
ही गम्मत सगळ्यांना आवडते – काळ्या ब्रीफलेसेस हातांत असल्यामुळे ह्यांना कुणीही सीक्रेट ऑर्गेनाइज़ेशनचा मेम्बर समजू शकंत होता, जो काळोख्या रात्रीत जागत्या पहा-यानंतर बाहेर पडतांत (ह्या शहरांत श्वेत-रात्री असतात, पण हिवाळ्यांत नाही; आणि हिवाळ्यांततर इथे काळोख्या रात्री सारखंच असतं – सकाळी उशीरापर्यंतसुद्धा).
रस्त्यावर येऊन कपितोनव पहिलं ऋतुजैविकी अवलोकन करतो : बर्फ जमला होता. तो आपला स्कार्फ व्यवस्थित करतो आणि, डाव्या पायाने धक्का देऊन, तळपायांवर सुमारे दीड मीटर घसरतो. अश्या परिस्थितीत, नेहमीसारखं त्याला आठवतं, की त्याला आठवण आहे, की लहानपणी त्याला माहीत होतं – रस्त्याला झाकणा-या बर्फात आणि निसरड्या बर्फांत काय फरक असतो.
फुटपाथचा भाग, जिथे नरम आणि कडक बर्फ नव्हता, हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून दहा पावलांवर संपतो.
“संतुलन कायम ठेवण्यासाठी, प्लीज़ जोड्या बनवा!”
ह्यावेळेस माइक्रोमैजिशियन र्‍यूमिन गंमत करतोय का, समजणं कठीण आहे – असं वाटतं, की हो : जोडीने जाणं खूपंच कठीण आहे. फक्त – एकामागे एक, बर्फ स्वच्छ करायच्या फावड्या जितक्या चौडाईत आणि समोरून चालंत येणा-या लोकांच्या चांगुलपणावरंच चालावं लागेल.
सगळ्यांत आधी र्‍यूमिनंच पडतो, लीडर – त्याला उचलतात आणि अंगावरून बर्फ झटकतात, तो चकित होऊन चारीकडे बघतो : अचानक कसा पडला.
“तलावमागून येऊन कपितोनवला पकडतो, “थैन्क्यू” कुजबुजंत, कारण की तो एकीकडे सरकून गेला होता. मग वळून म्हणतो:
“बाइ द वे! मला आत्तांच श्याम-वनने फोन केला होता, ‘ऑडिट-कमिटीचे बाइ-इलेक्शन्स होणार आहेत. आम्हीं – तुम्हांला.”
“मला?”
“तुम्हीं मैथेमेटिशियन आहांत, आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे. दुस-या कुणावर विश्वास नाही ठेवता येत. नाहीतर, तसले तर बोर्डांत भरमसाठ आहेत!...वाद तर घालूंच नका, कोणताही आक्षेप नको!”
आणि तो तीरासारखा पुढे धावला, आधी पोहोचण्यासाठी.
“काही हरकत नाही, काही हरकत नाही, लवकरंच हिवाळ्याचे दिवस संपताहेत,” कपितोनवच्यामागे कोणी भिणभिणलं, पण कपितोनवला कुणाशी बोलायची इच्छा नाहीये आणि तो असं दाखवतो, की त्याने काळ-भक्षकाचं बोलणं ऐकलंच नाही.
समोर आइसिकल्स तुटून पडतात आहेत – जाण्यासाठी रस्ताच नाहीये. सगळे लोक बर्फाचे जमलेले डोंगर सुखरूप पार करतात, ज्याने की रस्त्याच्या फेन्सिंग लावलेल्या भागांतून दूर होऊन वाहनांच्या रस्त्यावर जाता यावे. रस्त्याच्या दुस-या कडेला चीनी उभे आहे आणि बघताहेत की आइसिकल्स कसे पडताहेत. कपितोनव चीन्यांकडे बघतो, आणि तेव्हांच

09.37

त्याची पाळी येते – तो घसरून पडतो.
वाईट प्रकारे पडला – पाठीवर. डोकं बर्फावर आपटलं. विव्हळला. ब्रीफकेस एकीकडे जाऊन पडली, हे तर बरं झालं, की कारच्या खाली नाही आली.
आणि, लगेच उडी मारून उठलासुद्धा, एखाद्या बॉक्सर सारखा, ज्याला नॉकडाउन केलंय, आणि ज्याला असं दाखवायचंय की तो ठीक-ठाक आहे.
ओवरकोटच्या खिश्यांतून फोन काढतो, कारण की तेव्हांच कॉल आला होता.
“हो, मरीना?”
“तू बिज़ीतर नाहीयेस? बोलूं शकतोस कां?”
बहाद्दुरीने म्हणतो:
“हो, बिल्कुल बोलूं शकतो! (ह्याच वेळेस त्याला ब्रीफकेस देतात.)
“काही झालं तर नाहीं, नं?”
“ओह, नाही, काही नाही, फक्त इथे बर्फ आहे...निसरडा बर्फ...(डोकं वाकवून सहयोग्यांना धन्यवाद देतो आणि हसून ओठांना खेचंत OK व्यक्त करतो.)
“तर, तू त्याबद्दल मला काय सांगशील?”
“आठवण दे, कशाबद्दल...(कपितोनव पुढे जातो.)
“तुला असं वाटतं का, की ते, जे त्याने तिथे लिहिलं, त्याचा, जे झालं त्याच्याशी काही संबंध नाहीये?”
“त्याच्याशी, जे झालं?”
“त्याच्या मृत्युशी,” मरीनाने पुढे जोडलं.
तो पुन्हां वार्तालापासाठी तयार नाहीये. पण, जेव्हां वार्तालापांत भाग घेण्याची गरंज असते, तेव्हां कपितोनव सहसा भाग घेतो.
“मरीन, प्लीज़, समजण्याचा प्रयत्न कर,” कपितोनव पायांच्याखाली बघंत म्हणतो, “मी काही शेरलॉक होम्स नाहीये, मला माहीत नाहीये की काय विचार करायला हवा. आम्हीं इथे जवळच्याच क्लब सी-9’कडे चाललोय, तिथेच मीटिंग होईल.”
“तर ऐक. तेव्हां – मुख्य मुद्दा. तुला असं नाही वाटलं का की ते सगळं, जे त्याने लिहिलं होतं, खरं आहे? की तो – तो नाहीये? आणि जर असं असेल, तर मग मी कुणाबरोबर राहात होते? आणि तो कुठेय, माझा वाला?”
मैजिशियन्स दोन बाहेर निघालेल्या खिडक्या असलेल्या बिल्डिंगजवळ आले, जुन्या काळांत ही बिल्डिंग दिवाळं निघालेल्या लोकांच्या वेल्फेयर-सोसाइटीची होती (कपितोनवला हे कसं ठाऊक आहे?), आणि आता सम्पूर्ण दुस-या मजल्यावर क्लब “सी-9” आहे, पहिल्या मजल्यावर (कपितोनवला अजून माहीत नाही) फोटो-गैलरी आणि वार्ड-रोब आहे.
“मरीनोच्का, मी प्रत्यक्षवादी आहे.”        
“तू कसा प्रत्यक्षवादी आहे!”
“कोणच्यातरी प्रकाराचा, पण माझं असं मत आहे, की प्रत्येका गोष्टीमागे काही न काही तर्क ज़रूर असतो. आणि तो अनुभवावर आधारित असला पाहिजे. तुझे प्रश्न मला समजंत नाहीये. हो, दुर्दैवी, दुःखद घटना आहे. पण, जर तसं नसतं आणि त्याने तुला नोटबुक दाखवली असती आणि म्हटलं असतं, मरीना, बघ, मी काहीतरी कल्पना केली आहे, वाच, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुझं काय मत आहे, मी हे वैज्ञानिक फ़ैन्टेसीच्या प्रतियोगितेसाठी पाठवावं कां, तर तू त्याला काय उत्तर दिलं असतं?”
मरीना म्हणते:
“मला वाटतं, की फैन्टेसी-प्रतियोगितेसाठी रचना वेगळ्या प्रकारे लिहिल्या जातांत.”
“मला नाही माहीत, की कश्या लिहिल्या जातांत,” प्रवेशद्वाराजवळ गर्दीतून बाहेर होत कपितोनव उत्तर देतो (फक्त दारांच्या जवळंच आंत जाणा-यांची गर्दी वाढते). “आणि, काय तुला माहीत आहे? त्याला स्वतःलापण तर माहीत नव्हतं, तो कुणी लेखक थोडांच होता, फैन्टेसी-लेखक नव्हता, तो विचार करू शकंत होता, की अश्या प्रकारे लिहिणंसुद्धां शक्य आहे, बरोबर आहे न, मरीना?”
त्याला वाटतं, की तो तिला धीर देतोय.
मरीना विचारते:
“तू त्या तरुण गुन्हेगाराबद्दल काय म्हणशील? तोच, ज्याचा चेहरा तुमच्या ब्यूस्टेत कम्पासने मापला गेला होता?”
आत गेला. लॉबी. कपितोनव, एकीकडे सरकून, लोकांकडे पाठ करून उभा राहिला:
“मला असा कुणी आठवंत नाहीये. मी, कदाचित, आधीच निघून गेलो होतो.”
“तर असं आहे. मला स्वप्न पडलं. मला स्वप्न पडलं, की माझा मूखिन...अजूनही कन्स्ट्रक्शन-टीममधे आहे...आणि तू तर त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन टीममधे होता नं?”
“ठीक आहे, होतो कधी, तर मग काय?”
“आणि, की मूखिन...तुलातर आठवतंय, त्याचं कोणाशी?...हे तर तुला माहिती असायला हवं होतं?”
“माहीत नाही, की तुला कसे-कसे स्वप्न पडतात,” तो रुक्षतेने म्हणतो.
“त्या स्टोअर कीपरशी. मला तिचं नावपण माहीत आहे. माहितीये, काय आहे?”
“नाही.”
तिचं नाव होतं याना.”
“तू काय हे सगळं स्वप्नांत पाहिलं?” कपितोनव भिंतीकडे सरकतो (पाठीमागे आहे गर्दी, पायांचं पुसणं, क्लोक-रूम, रस्त्यावरून येत असलेली थंडी).
“हो, हे फार विचित्र स्वप्न होतं, कोणत्याही फैन्टेसीशिवाय, जास्तंच विचित्र अश्यासाठी, की त्यांत काहीही अजब गोष्ट नव्हती. तिचं नाव होतं याना. दारुडी होती, पीतंच असयाची. सगळ्यांना द्यायची. सगळ्यांना. तुला नाही दिली?”
“मरीना, मी असल्या कोणत्यांच यानांना ओळखंत नव्हतो, आणि जर मी तुझ्या स्वप्नांत आलो होतो, तर तो मी नाही, जो तुझ्या स्वप्नांत आला होता, तुला कळतंय कां?”
“नाही, तू माझ्या स्वप्नांत नाही आला. माझ्या मूखिनने झिंगलेल्या अवस्थेत तिच्याशी संभोग केला, जेव्हां तीपण झिंगलेली होती. स्टोअरमधे, चौथ्या सेक्शनमधे...”
“तू कोणत्या सेक्शन्सबद्दल बोलते आहेस? काही सेक्शन-बिक्शन नव्हते...”
“स्टोअरमधे, चौथ्या सेक्शनच्या मागे. पडद्यामागे, जायच्या दिवशी. गैसचा वास येत होता, ती पूर्णपणे झिंगलेली होती, जेव्हां तो जात होता. गैस लीक होत होती...तिथे खूप सारे कापसाचे जैकेट्स होते, कापसाच्या जैकेट्सचा मोट्ठा ढीग होता...आणि रेल्वे स्टेशनवर त्याने ऐकलं, कश्या उलट्या होत होत्या...तुम्हीं सगळे झिंगलेले होते, घाबरू नको...आणि मग, ती खरोखरंच चालली गेली, जाऊ शकली...आणि हा, तिचा मुलगा, मूखिनचा मुलगा मोठा झाला...सावत्र वडिलांना मारून टाकलं...आपल्या बापाचा पत्ता लावला...आणि त्याला पण मारायचा निश्चय केला...पण तोपर्यंत तो त्या विषयावर पोहोचला होता...तुम्हां लोकांच्या तपासाच्या क्षेत्रांत...त्याला शोधंत होते...आणि, हे, त्यालाच कम्पासने...”
“मरीना, लगेच गप्प बस! अशी स्वप्नं नसतात. तू म्हणतेस काय आहे! कुणी याना नव्हती, कोणचेच स्टोअर्स नव्हते. आम्ही लैण्ड-रिक्लेमेशनवर (भूमिसुधारणा) काम करंत होतो...त्या काळांत प्रत्येक ठिकाणी लैण्ड-रिक्लेमेशन चाललं होतं!...तुला झालं काय आहे? तू आहेस कुठे? आपल्या डोक्यांतून ही फालतू गोष्ट काढून फेक! तुला ह्या नोटबुकबद्दल विसरायलांच हवं!”
“नाही! जशीचं मी तुला ती नोटबुक दिली, असं वाटलं की माझ्या आतला एखादा भाग तुटून पडलाय. तिच्याशिवाय राहू नाही शकंत. मी तिला घ्यायला येतेय, ठीक आहे? ती तुझ्याजवळ आहे कां?”
“माझ्याजवळंच आहे. पण तुला तिच्यापासून लक्ष दूर करायलांच पाहिजे.”
“क्लब सी-9’…मला माहीत आहे, तिथे मास्क्सचं प्रदर्शन भरलं होतं...आणि जेव्हां तू वाचंत होता, तर तुला असं नाही वाटलं का की मूखिन...”
ती गप्प झाली.मोबाइल एका हातांतून दुस-या हातांत घेत तो ओवरकोट काढतो.
“मूखिन काय?...”
“हे, की मूखिन तुझ्यासारखा आहे?”
“नाही, मरीना, आम्हां दोघांत किंचितही साम्य नव्हतं.”
“मी ख-या मूखिनबद्दल बोलतेय, मी त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, ज्याने हे सगळं लिहिलं होतं.”
कपितोनव दीर्घ श्वास घेऊन जणु थिजून जातो.
“मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे.”
आता तो गप्प राहतो.
“मी येऊन घेऊन घेईन.”
 “ठीक आहे,” कपितोनव म्हणतो.

09.49

त्याला कळतं की तो दुस-या मजल्यावर इन्स्टेंट कॉफीत उकळलेलं पाणी ओततोय : मूखिनवर कोणी कसं प्रेम करू शकतं?...किटली परत जागेवर ठेऊन देतो. विचारांना झटकून, एक चमचा साखर घेतो. ब्रीफकेस पायाजवळ ठेवली आहे, आणि पाय नोटबुक असलेल्या ब्रीफकेसला स्वतःजवळ ठेवलेलं अनुभवतोय. कपितोनव बहुधा इन्स्टेंट कॉफी टाळतो, बहुतकरून तो उकळलेली कॉफी पितो. त्याच्याकडे तांब्याचं कॉफ़ीपॉट आहे – खरोखरचं, नीनानेच इस्ताम्बुलमधे विकत घेतलं होतं. बिस्किट घेतलं, एक तुकडा तोंडात टाकला. प्रवेशद्वाराजवळ टेबलाशी रजिस्ट्रेशन चाललंय, पण अगदी वेळेवर त्याला लक्षांत आलं, की त्याने यंत्रवत् रजिस्ट्रेशन करवून घेतलं आहे : जसांच तो लॉबीमधे आला, त्याला नाव विचारण्यांत आल होतं. एक घोट घेऊन कपितोनव विचार करतो : मी काही ईवेन्ट्स-आर्किटेक्ट थोडाच आहे ( त्याची आठवण आली – हॉटेलमधे काउन्टरच्या जवळ असलेल्या).

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें