सोमवार, 8 जनवरी 2018

धनु कोष्ठक - 11



डेलिगेट्स काळाच्या अंतराळांत वार्तालाप करताहेत
09.53

आणि स्थानाच्या अंतराळांत अगदीच हालचाल करंत नाहीयेत – आपल्या जागेवरंच उभे आहेत, जास्तकरून – जोडीने, आणि जिथे कुठे ग्रुप तयार झालेला आहे, तिथे तेच आहेत – हाइपरचीट्स आणि हाइपर-खिसेवाले, हे माहीत नाही कां ग्रुप्समधेच राहणं पसंत करतात.
टी.वी. वाले इथे आधीच पोहोचले आहेत. कॉरेस्पोंडेण्ट मुलगी जुपिटेर्स्कीचा इंटरव्यू घेते आहे. आता कपितोनव तिचा चेहरा एका बाजूने नाही, जसा तेव्हां पाहिला होता, तर समोरून बघतो आहे, आणि तो तिच्या मोट्ठ्या-मोट्ठ्या डोळ्यांनी चकित झाला आहे. मनांत येतं की जवळ जाऊन बघावं, कुठे नजरेचा धोकातर नाहीये, किंवा मेक-अपचा कमाल तर नाहीये?
पण तेवढ्यांत तलावत्याच्याजवळ येतो:
“तुमच्या प्रोग्रामला एका डाइरेक्टरची गरज आहे. माझ्याकडे एक आहे. पण, मला शंका आहे, की त्याला उशीर होत आहे, म्हणून नंतर...तुम्हांला भेटायचंय, खूप. बाइ दि वे, महाशय नेक्रोमैन्सर कुठे आहेत? ते हॉटेलमधून निघाले होते कां?”
“नाही, मी फक्त काळ-भक्षकाला बघितलं होतं. तसं, खरं म्हणजे, ऐकलं होतं. तो माझ्या मागेच चालंत होता, आणि थंडीचे दिवस संपण्याबद्दल काही तरी कुजबुजंत होता.”
त्याच्याशी सहानुभूतीने वागूं या,” ‘तलावहळूच म्हणाला. “आमचे छोकरे – रिमोटिस्ट्स आहेत. समस्या एकंच आहे – एकमेकांना पसंत नाही करंत. तसं ह्या काळ-भक्षकाची मोठी समस्या नाहीये, पण ते दोघं...”
आणि तलावज्युपिटेर्स्कीबद्दल सांगतो:
“माहितीये, आत्ता तो कशाबद्दल सांगतोय? हे, की पीटरबुर्गचे नॉनस्टेजर्स मॉस्कोच्या नॉनस्टेजर्सशी कसे भिन्न आहेत. जसं की फक्त भिन्नतेबद्दलंच बोलायला पाहिजे! आणि तुम्हीं ऐकलं न, की मी कसा इंटरव्यू देत होतो? मी सगळ्यांबद्दल चांगलंच बोललो. सगळ्यांच्याचबद्दल. कोणालाही वगळलं नाही, कोणालाही वेगळं केलं नाही. आता बघा, किती फरक आहे आमच्या दोघांत?”
हॉलमधे येण्याबद्दल अनाउन्समेंट करतात.
कपितोनवला हे सांगून की, “डावीकडे बस”, ‘तलावसगळ्यांत आधी लॉबीतून जातो. ज्युपिटेर्स्की पण पिच्छा सोडवंत, ह्या भीतिने की मागे न राहून जावो, त्याच्यामागे धावतो, पण आपल्या लोकांना बरोबर बोलावतो. कपितोनव कॉफी संपवतो, आणि तेवढ्यांत त्याची नजर कॉरेस्पोंडेंट मुलीवर पडते. ती हसते आणि ऑपरेटरला काहीतरी सांगते.
ते त्याच्याजवळ येतात.
“आम्हीं तुमचापण वीडियो घेण्याचं ठरवलं आहे. काही हरकत तर नाही? तुम्हींतर संख्या ओळखता ना?”
“हो,” कपितोनव अत्यंत संक्षिप्त उत्तर देतो.
“मी बाजूला उभी राहीन. तर, वितालिक?” ती ऑपरेटरला विचारते.
“थोडंसं आणखी डावीकडे...बस, बस, घेतो आहे.”
“तर, आम्हीं मनांतल्या मनांत संख्या धरतो आणि ओळखतो,” ती कॅमे-यासमोर मुद्दाम चिडवण्याच्या आविर्भावांत म्हणते. “काही तरी असंभवशी गोष्ट होणार आहे! आत्ता! तुमच्या डोळ्यांसमोर...”          
मोठ्या-मोठ्या डोळ्यांसमोर पापण्यासुद्धा आहेत...माझे वीस वर्ष कुठेयंत?’ कपितोनवला म्हणावसं वाटतं. ती त्याच्याकडे बघते. आणि – किंचित श्वास घेत म्हणते:
“मी तयार आहे.”
“दोन अंकांची संख्या मनांत धरा.”
दोन अंकांची?” आणि तिच्या आवाजांत कपितोनवला निराशा जाणवली. “मोठी संख्या धरू शकतो कां?”
“कोणतीही. बस, फक्त दोन अंकांची.”
“धरली.”  
तो तीन जोडायला आणि दोन वजा करायला सांगतो.
बेरीज आणि वजाबाकी करताना ती छताकडे डोळे फिरवते.
“झालं. सांगू?”
“कोणत्याही परिस्थितीत नाही! मी स्वतः सांगेन.”
इथे त्याला कळतं, की सांगण्यासारखं काहीच नाहीये. त्याला नाही माहीत, की तिने कोणती संख्या धरली होती.
तो तिच्या अथांग डोळ्यांत बघतो आणि त्याला कळतं, की तिची इच्छा आहे, की त्याचं उत्तर बरोबर निघावं. ती भुवया किंचित उंचावते. आपली लांब, पातळ मान बाहेर काढते, ओठांचं बिगुल बनवंत तोंड किंचित उघडते, जणु ती कठिण प्रयत्न करण्यासाठी त्याची शेवटची मदत करते आहे, आणि वाट पाहते, वाट पाहते, पण तो – नाही सांगू शकंत.
“नाही.”
निःश्वास सोडतो.
ती सहानुभूतिने स्मित करते.  तो वैतागतो. ऑपरेटर कॅमेरा बंद करतो.
“तुम्हीं खरंच संख्या धरली होती?”
“नक्कीच, हो!”
दोन अंकांची संख्या?”
“स्पष्ट आहे. तुम्हींच सांगितलं होतं.”
“नाही सांगू शकलो. ओफ़.”
“सॉरी,” ती म्हणते, “बस, तुम्हीं काळजी करू नका, दुस-यांदा जमेल. दर वेळेस तर नाही ना होऊं शकंत.”
“जर गुपित नसेल तर, तुम्हीं कोणची संख्या धरली होती?”     
“222.”
“पण ही तर तीन अंकांची आहे!”
“नाही, काय म्हणतां! तीन अंकांची होईल – 333.”
तेवढ्यांत कपितोनवला हॉलमधे बोलावतांत – तो शेवटचा डेलिगेट आहे, जो आत नव्हता गेला.
“माफ करा,” कपितोनव म्हणतो.

10.05

हॉल. स्टेज. टेबल. हात-सफ़ाईवाला मोर्शिन ए.वी. – मीटिंगचा अध्यक्ष.
“आदरणीय मित्रांनो! कॉन्फ्रेन्सच्या दुस-या दिवसाची कार्र्वाई सुरू करताना, मला स्वागताशिवाय पुढे जाण्याची परवानगी द्या. जर मी हे म्हटलं असतं, की ह्या हॉलमधे आपलं स्वागत करताना मला आनंद होत आहे, तर मी खोट बोललो असतो. नाही, नक्कीच, आपलं स्वागत करताना मला आनंद होत आहे, पण तरीसुद्धां माझा, आणि त्याबरोबरंच तुमचाही आनंद, माझ्या मते, सम्पूर्ण आनंद असता, जर आपली मीटिंग इथे नाही, तर, कालच्यासारखी – हॉटेलच्या मोठ्या हॉलमधे झाली असती, पण, दुर्दैवाची गोष्ट आहे, की आपल्यासाठी अज्ञात विध्वंसकाच्या त्या गुण्डगिरीच्या, स्पष्ट सांगायचं तर, गुन्हेगारीच्या युक्तीनंतर, आपण सटीक शब्दांच्या प्रयोगाला घाबरणार नाही: विध्वंसक! – त्या सगळ्या घोळानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाने, आपण त्यांची परिस्थिति समजू शकतो, आपल्याला तुमची परिचित बिल्डिंग भाड्यावर देण्यास नकार दिला, पण त्याने ह्या आर्ट क्लब “सी-9”च्या प्रति आपल्या कृतज्ञतेंत काही फरक नाही पडंत, ज्याने आपल्याला आसरा दिला. पुन्हां एकदा हार्दिक आभार.”
“आणि रात्रि-भोज?” हॉलमधून एक आवाज आला.
“काय रात्रि-भोज? रात्रि-भोजाच्या कार्यक्रमांत सध्यां काही परिवर्तन नाहीये. फायर-प्लेस असलेला हॉल, आशा करतो, की आपल्याकडून नाही हिसकावणार. पण फक्त ह्याच्यासाठी, की हे आयोजन नॉन-ऑफिशियल आहे. व्यवस्थापनाची आपत्ति फक्त ऑफिशियल आयोजनांवर आहे. पण, मी रात्रि-भोजाच्या मूडला प्रोत्साहन नाही देणार. आपल्या समोर कामाचा दिवस पडला आहे, आणि जर कालच्या दिवसाबद्दल बोलायचं तर आपण संकटांत आहोत. आणखी एकदा – जोपर्यंत कालच्या दिवसाचा प्रश्न आहे – ज्याने तो विषय संपवता येईल. कॉन्फ्रेन्सला ध्वस्त करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न करण्यात आला. कोणाच्यातरी डोळ्यांत आपण खुपंत होतो. मी आठवण देईन की हॉलमधे बॉम्ब ठेवल्याबद्दलचा अज्ञात फोन पोलिसला अगदी त्याच वेळेस मिळाला, जेव्हां आपल्या गिल्डच्या चार्टरबद्दल जोरदार वाद चालू होता. मी आशा करतो, की हा शत्रू आपल्यापैकीच कुणी नसून कोणी बाहेरचा असावा. प्रत्येका परिस्थितीत, मी सांगेन, की असले बेकायदेशीर कृत्य, खरं म्हटलं तर अपराधाच्या, सरळ कायद्याच्या परिधीत बसतात, आणि मला माहीत नाही, की पोलिस काय कार्र्वाई करतील, पण, जर अचानक आपल्याचमधे तो व्हिलन, विध्वंसक निघाला, भले ही मग तो मी का नसो, किंवा इथे हजर लोकांपैकी आणखी कुणी असो, खरे शब्द वापरायला घाबरणार नाही : व्हिलन, विध्वंसक...पुन्हां : विध्वंसक!...त्याच्याबद्दल कोणतीच दया-माया दाखवली जाणार नाही, त्याच्या समर्थनांत कोणतेही संयुक्त पत्र लिहिले जाणार नाही!...त्याने आमच्याकडून जराही दयेची आशा ठेवूं नये! स्वतःच्या कृत्याची जवाबदारी स्वीकार करावीच लागेल! आणि फुल-स्टॉप लावूं या.”
टाळ्या.
“आणि, जर कुणाला आमच्या समर्थनाची गरज आहे, तर तो आहे आमचा मित्र, उच्चकोटिचा जादुगार–हात-सफ़ाई, वदीम वदीमोविच पेरेदाश ह्याला, मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे, पण त्याला काल दवाखान्यांत भर्ती करावं लागलं. जर कुणाला माहीत नसेल, तर मी सांगतो : वदीम पेरेदाश काल संध्याकाळी रस्त्यावर घसरून पडला होता आणि त्याचा पाय मोडला. तुम्हांला आठवंत असेल, की कॉन्फ्रेन्सच्या ऑर्गेनाइज़िंग कमिटीने दुस-या शहरांतून आलेल्या पाहुण्यांना सावधगिरीचा इशारा दिला होता, की सेंट-पीटरबुर्ग जमलेल्या कडक बर्फाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. उन्हाळ्यांत सेंट-पीटरबुर्गमधे श्वेत-रात्री असतात, पण हिवाळ्यांत कडक, खूपंच निसरडा बर्फ. आइसिकल्सबद्दल तर बोलूंच नका. कृपा करून सावध रहा, लक्षांत ठेवा की तुम्हीं कुठे आहांत...मी संपादकीय समितीला विनंती करतो, की कॉन्फ्रेन्सतर्फे पेरेदाशला नैतिक समर्थनाचं पत्र पाठवण्यांत याव, आपण मरीन्स्की हॉस्पिटलमधे, जिथे पेरेदाश पडलाय, आपल्या शुभेच्छा पाठवूं या, त्याला बरं वाटेल. वदीम पेरेदाश लवकर बरा होवो. काही आपत्तीतर नाही न?”
टाळ्यांनी उत्तर देतात.
“धन्यवाद,” प्रेसिडेंट म्हणतो, “पण तरीही, आपण काल थोडं फार काम तर केलंच आहे. आपल्याकडे आहे प्रेसिडियम, सेक्रेटरी, कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष, हा मी. म्हणजे मी अध्यक्ष आहे, वेळेवर निवडलेल्या काही कार्य-समिती आहेत – संपादन समिति, मैंडेट कमिटी, ऑडिट कमिटी, आणि – मला आशा आहे – आपल्याकडे प्रमुख गोष्ट आहे : प्रॉडक्टिव कामासाठी मूड’. आज इतर गोष्टींबरोबर आपल्याला आपल्या चार्टरला मंजूरी द्यायची आहे, गिल्डच्या बोर्डची आणि प्रेसिडेंटची निवड करायची आहे. पण आता...आता आपल्यापुढे एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे...मिखाइल विताल्येविच,” तो ऑडिट कमिटीच्या अध्यक्षाकडे वळतो, “प्रॉब्लेम्सबद्दल सांगा.”
ऑडिट कमिटीचा अध्यक्ष माइकजवळ येतो.
“प्रॉब्लेम तीच आहे. कॉन्फ्रेन्सच्या निर्णयानुसार, ऑडिट कमिटीत तीन सदस्य असायला हवेत. पण वदीम वदीमोविचचा पाय मोडलाय आणि ते ऑडिट कमिटीच्या सदस्याची जवाबदारी पूर्ण करू शकंत नाही. पुन्हां मतदान करावं लागेल.”
“धन्यवाद,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो. वदीम वदीमोविचच्या आजाराकडे बघता ऑडिट कमिटीच्या सदस्याची पुन्हां निवडणूक करण्याच्या प्रस्तावाला मी मतदानासाठी प्रस्तुत करतो. कोण ह्याच्या पक्षांत आहे? कोण विरुद्ध आहे? कोण आपलं मत नाही देत आहे? प्रस्ताव सर्व सम्मतीने पास झाला कां? नाही? माफ करा – फक्त एकाने मत नाही दिलं. ह्या सकारात्मक दृष्टिकोणासाठी धन्यवाद. कृपा करून आपापल्या उमेदवारांची नावं द्या.”
तलावउठतो.
“ऑडिट कमिटीसाठी मी एव्गेनी गेनादेविच कपितोनवचं नाव प्रस्तुत करतो. तो प्रोफेशनल मेथेमैटिशियन आहे, आणि मला वाटतं की त्याची उमेदवारी सर्वांत चांगली आहे.”
ज्युपिटेर्स्कीच्या गटांत लगेच हालचाल होऊं लागली : त्यांने लगेच कपितोनवचेच नाव असलेल्या – जादुगार एव्गेनी अर्कादेविच बोझ्कोच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. कारण : बोझ्को ऑडिट कमिटीतून निघून गेलेल्या पेरेदाशसारखाच डाइनिंग टेबलवर जादूचे प्रयोग दाखवण्यांत प्रवीण आहे. कधी ते बरोबर साल्ट-पेपर शेकर्सचा खेळ दाखवायचे.
अध्यक्ष दोन्हीं उमेदवारांसाठी वोटिंग करण्याबद्दल सुचवणारंच होता, की कॉन्फ्रेन्सने(विशेषकरून ज्युपिटेर्स्कीच्या गटाच्या लोकांनी) प्रारंभिक चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. बोझ्कोच्या उमेदवारीबद्दल तर काही प्रश्नंच नाहीये, पण कपितोनवच्या उमेदवारीवर जोरदार चर्चा होते.
चर्चेचा आरंभ करतो लिओनीदोव- ज़ापोल्स्की, जो खूप पोचलेला माइक्रोमैजिशियन आहे.                               
“ह्या तथ्याला, की माननीय कपितोनव महाशय एक प्रोफेशनल मेथेमैटिशियन आहेत, ऑडिट कमिटीच्या सदस्यतेसाठी त्यांच्या उमेदवारीच्या योग्यतेच्या स्वरूपांत स्वीकार करता नाही येत. आम्ही आपल्या सम्माननीय सहयोग्याच्या दोन अंकांच्या संख्या ओळखण्याच्या कलेचा अत्यंत सम्मान करतो, पण प्रस्तुत परिस्थितीत मेथेमैटिक्सच्या मूलभूत मान्यतांबरोबर कमाल करण्याचं त्यांचं विशेष कौशल्य आपल्यासाठी, जे मेथेमैटिशियन्स नाहीयेत, आणि ज्यांना फक्त कोणत्याही गोष्टीच्या साध्या-सुध्या गणनेतंच रुचि आहे, एखादी गंभीर समस्या उभी करू शकते. कपितोनव महाशयांचा मी अतिशय सम्मान करतो, पण तरीही मी आवाहन करतो, की त्यांना वोट देऊ नये.”
तलावह्यावर आपत्ति करतो.
“प्रिय मित्रांनो, हे व्यावसायिक गुण केव्हांपासून आपल्याला अडसर वाटू लागलेत? एका काळांत ऑडिट कमिटीत गणना–विशेषज्ञ, संख्यांशास्त्राचे विशेषज्ञ, सांख्यिक सिद्धांताच्या प्रोफेशनल्सना प्राधान्य दिलं जायचं, आणि इथे आम्ही त्याच विशेषतेमुळे भेदभाव करतो आहे. आपल्यांत फक्त एक मेथेमैटिशियन आहे. ऑडिट कमिटीत तो नाही तर कुणी असायला पाहिजे?”
लिओनीदोव-ज़ापोल्स्की ह्याचा विरोध करतो:
“माफ करा, जर ही कॉन्फ्रेन्स जादुगार- नॉनस्टेजर्सची नसून दुसरी एखादी, जसं जंगली जनावरांच्या ट्रेनर्सची, किंवा आणखी कोणती कॉन्फ्रेन्स असती, किंवा मेथेमैटिशियन्सचीच असती, तर मग कोणी वाद घातला असता? त्या परिस्थितीत आपण निश्चितंच मेथेमैटिक्सच्या विद्वानाला ऑडिट कमिटीसाठी निवडले असते, पण आपण ना तर ट्रेनर्स आहोत, ना ही कोणी दुसरे, आपण, तुम्हांला माहीतंच आहे, जादुगार आहोत, आणि आपल्या विशेषज्ञाला आपण अवघड परिस्थितींत का टाकावे, जर त्याच्याबद्दल पूर्ण विश्वासाची भावना असूनही, आपण कोणत्याही प्रकारे त्याच्याबद्दल अविश्वासाच्या भावनेला दूर नाही करूं शकंत? कृपा करून ह्याला व्यावसायिक अविश्वास समजावं.”
हेरा-फेरी करणारा माखोव:
“मी आधीच्या वक्त्याशी सहमत आहे. कोणाचांच अपमान करू इच्छित नाहीये, पण तुम्हांला माहीतंच आहे, की बागेत, मी नाही सांगणार की कोणाला सोडायला नको. मला, उदाहरणार्थ, मैण्डेट कमिटीत ह्या उमेदवारीबद्दल काही आपत्ति नाहीये. पण, फक्त ऑडिट-कमिटीत नाहीं!”
“ही सपशेल अवमानना आहे!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात. “त्याने मनुष्याचा अपमान केला आहे! त्याने कॉन्फ्रेन्सचा अपमान केला आहे!”
“मी अपमान केलाय! कुठे अपमान केला आहे?”
“माखोव महाशय, आम्ही बाग नाहीये!” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो. “सगळ्यांना आवाहन करतो की शांत रहावे. चला, शेवटी मतदानंच करून घेऊ. हा सगळ्यांत महत्वपूर्ण प्रश्न नाहीये. वलेन्तीन ल्वोविच, तुम्हीं तर आधीच बोललात...”
“एक सेकंड, एक सेकंड!” तलावखूप वैतागलाय: त्याला बोलायचंच आहे.
“वलेन्तीन ल्वोविच, कृपा करून काळावर मेहेरबानी करा!”

10.27

“जादुगार-मित्रांनों!” तलावमाइक्रोफोनपासून दूर नाही जात, “प्रामाणिकपणे बोलूं या, इथे, आपण सगळे जादुगार आहोत, आपण सगळे मैनिप्युलेटर्स आहोत, ही आपली कला आहे, आणि आपण त्यांत प्रवीण आहोत. पण, तुम्हींच विचार करा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या: मैनिप्युलेशनच्या विषयाच्या दृष्टीने संख्यापत्त्यांहून, रुमालाहून, दोमिनोच्या फास्यांहून आणि अशाच काही इतर आपल्या पसंतीच्या वस्तूंहून कोणत्या गोष्टींत वेगळ्या आहे? जर आपण संख्यांच्या मैनिप्युलेटरला ऑडिट कमिटीचा सदस्य निवडायला नकार देतो, तर त्याच आधारावर मैण्डेट कमिटीतसुद्धां पत्त्यांच्या विशेषज्ञाला, आगपेटीच्या काड्यांच्या माइक्रोमैजिशियनला, आणि स्लीव्ज़-जादुगाराला घ्यायला नको. जर ते अचानक आपल्या वैधतेशी हेरा-फेरी करूं लागले, मैण्डेट्सवर जादू करू लागले तर? जर आपण कपितोनवला ऑडिट कमिटीत ह्या आधारावर नाही निवडंत आहोत, की तो मेथेमैटिशियन आहे, तर आपण एका भयानक परंपरेची सुरुवात करतो आहे, आपण स्वतःच आपल्या पायांखाली टाइम-बॉम्ब ठेवंतोय, स्वतःला पंगुत्वाच्या दिशेने वळवतोय, समस्यांचं जेनेरेटर स्थापित करतोय, ज्या कधी न कधी आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावतील! कमीत कमी म्हणूनंच आपल्याला कपितोनवला मत दिलं पाहिजे!”
अनुभवी जादुगार म्शीन्स्की स्टेजवर येतो – तो शांत आहे, त्याच्या चेह-यावर – ज्ञानाचं तेज झळकतंय.
“तुम्हीं मला ओळखता, मी वरिष्ठ जादुगार आहे. मला सांगा, आपल्यामधे कुणी असा आहे का, ज्याला शंभर पर्यंत मोजता नाही येत? आणि दीडशे पर्यंत? उत्तम! सगळ्यांना येतं. मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे स्वीकार करतो, की इंटीग्रल-कैल्कुलस काय असतं, मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे, की 62 आणि 67पैकी कोणची संख्या मोठी आहे. माझी खात्री आहे, की तुम्हांलापण माहीत आहे, की 62हून 67 किती जास्त आहे?”
“पाच!” सगळे आपापल्या जागेवरून ओरडले. “बरोब्बर पाच!”
“अगदी बरोबर! तर, मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा आहे की, कपितोनवला, इंटीग्रल-कैल्कुलसच्या विद्वानाला, ऑडिट कमिटीत घेण्याचा अर्थ आहे – तार्किक बुद्धीचा उपहास करणे! हे म्हणजे, चिमण्यांना मारण्यासाठी तोपेचा प्रयोग करण्यासारखं झालं! हे...तथ्यांना अतिरंजित करणं झालं! आणि, ऑडिट कमिटीचं तथ्य फक्त एक आहे – मोजण्याची योग्यता असणं! – एक, दोन, तीन!...शंभरपर्यंत मोजण्याची योग्यता असणं! जास्तीत जास्त दीडशेपर्यंत!”               
वोटिंग होते, कपितोनव ऑडिट कमिटीत नाही निवडून येत. बोझ्कोला निवडतांत.
“वाईट नका वाटून घेऊ,” उजवीकडे बसलेला माइक्रोमैजिशियन ज़ाद्नेप्रोव्स्की कुजबुजंत कपितोनवला म्हणतो.
“काय म्हणता, मी तर खूश आहे.”
“तरीपण, अपमान तर वाटतोच.”
“हूँ, ‘अपमान’. अपमान – जेव्हां अपमान होतो, तेव्हां, खरोखरंच – अपमान वाटतो!” कपितोनव सुरुवात करतो.
त्याला आवडंत नाही, की त्याचं सांत्वन करताहेत.
“माफ करा. बस, बराच काळ मीटिंग्समधे गेलेलो नाहीये.”
बोर होतां आहे का?”
“जास्त नाही.”
चर्चेत फक्त एकंच गोष्ट प्रमुख होती – कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्स द्वारे कपितोनववर जणु दोन बाजूंनी विचार केला जात होता : एकीकडे – फक्त कपितोनव आणि दुसरीकडे – फक्त कपितोनवची उमेदवारी. समजणं कठीण आहे, की ह्यांत कोणच्या बाजूची हार झाली होती – कदाचित दोघांचीही झाली असावी?”
हार ज्याची झाली, तो होता तलाव’. तसं तो हे दाखवंत नव्हता.
“मित्रांनो, आपल्यापुढे बरंच काम आहे. तुमच्याकडून सक्रियतेची आशा करतो!”
अध्यक्षाने घड्याळाकडे बघितलं.
10.41

मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट बोलण्याची परवानगी मागतोय. प्लीज़.
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट माइक्रोफोनजवळ येतो.
“मित्रांनो, दोन गोष्टींकडे तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो.”

“बोला,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो आणि पुन्हां घड्याळाकडे पाहतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें