10.43
“पहिला मुद्दा. आपण आत्तांच
वदीम वदीमोविच पेरेदाशला ऑडिट कमिटीतून काढून टाकलं आहे,
प्रश्न हा आहे, की काय आपण, सर्वसाधारणपणे,
त्याला कॉन्फ्रेन्सचा डेलिगेट समजंत राहू, तो
गैरहजर आहे तरीही, आणि ब-याच प्रमाणांत कार्य सक्षम नाहीये तरीही?”
“हा कसला प्रश्न आहे? स्पष्ट आहे, की समजंत राहू!” हॉलमधे
ज्युपिटेर्स्कीचे लोक ओरडतात.
“नाहीतर कसं?” कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष म्हणतो. “ह्यांत पेरेदाशचातर काही दोष नाहीये की पीटरबुर्गच्या रस्त्यांवर
चालणं धोकादायक आहे. दुर्घटनातर आपल्यापैकी कोणाहीबरोबर होऊं शकली असती. मला वाटतं
की वोटिंगच्या वेळेस पेरेदाशच्या परिस्थितिबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची काही गरज
नाहीये. हो, तो गैरहजर आहे. त्याच्या गैरहाजरीने कोरमवर काही
परिणाम होणार नाही. कोरम पूर्ण न होण्याची काही भीति नाहीये. आणि शिवाय, तुम्हीं स्वतःचं त्याला कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेटचा अधिकार दिलेला आहे!”
“तर, त्या परिस्थितीत,”
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट म्हणतो, “जेव्हां
गुप्त मतदान होईल, तेव्हां आपल्याला त्याच्यासाठी हॉस्पिटलमधे
बैलेट-बॉक्स पाठवावा लागेल.”
“पाठवू! काही हरकत नाही!” ज्युपिटेर्स्कीच्या गटातील लोक
ओरडतात.
“त्या परिस्थितीत आपण कधीच संपवू शकणार नाही! कधीच इथून जाऊ
शकणार नाही!” ‘श्याम-वन’च्या गटाचे लोक ओरडतात.
“हो, हा प्रश्न सोपा
नाहीये,” अध्यक्ष पुन्हां घडाळ्यावर नजर टाकतो.
10.45
“चला, वोटींगच्या आधी
त्याला सोडवायचा प्रयत्न करू. मित्रांनो, मैण्डेट कमिटी आणि
ऑडिट-कमिटीला निवेदन करतो की ह्या प्रश्नावर त्यांनी एकत्र विचार करावा आणि बोर्ड
आणि प्रेसिडेंटच्या मतदानापूर्वी आपला सल्ला द्यावा.”
“तर, मी कॉन्फ्रेन्सला
सूचित करतो, की कालच्या तुलनेंत कॉन्फ्रेन्सच्या
डेलिगेट्सच्या संख्येत अश्याप्रकारे परिवर्तन झालेलं आहे. ‘आउट’ – पेरेदाशच्या संदर्भात काही निर्णय होईपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित
राहील. ‘इन’ – पहिला – आपला परिचित
कपितोनव, जोपर्यंत दुस-याचा संबंध आहे, तर माझ्या भाषणाचा संबंध ह्याच गोष्टीशी आहे.”
“प्लीज़, शक्य असल्यास
थोडक्यांत सांगा,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विनंती करतो.
“थोडक्यांत सांगेन. तुम्हांला माहीतंच आहे, की आपल्यामधे तथाकथित रिमोटिस्ट्ससुद्धां
आहेत...”
“हे ‘तथाकथित’ कशाला?!” ‘तलाव’ उत्तेजित
होतो.
“माफ करा, फक्त
‘रिमोटिस्ट्स. तसं त्यांच्या संदर्भांत सगळंच इतकं सोपं
नाहीये. एका रिमोटिस्टने, जो ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणून
ओळखला जातो, काल आपल्याकडे आला होता आणि आज आपल्यामधे आहे,
आमच्यावर प्रतिबंध लावलांय की त्याला न केवळ त्याच्या नावाने,
वडिलांचा नावाने आणि आडनावाने संबोधित करू नये, तर कोणत्याही ऑफिशियल डॉक्यूमेन्ट्समधे सुद्धा त्याच्या नावाचा, वडिलांच्या नावाचा आणि आडनावाचा उल्लेख करू नये, आणि
विशेषकरून मैण्डेट कमिटीच्या मिनिट्समधे. तसंच हे पण सूचित करतो, की दोन इतर रिमोटिस्ट्स, महाशय नेक्रोमैन्सर (ओझा)
आणि काळ-भक्षक, बराच वेळ समजावल्यावर ह्या गोष्टीसाठी तयार
झाले की ऑफिशियल डॉक्युमेन्ट्समधे त्यांचं आडनाव, नाव आणि
वडिलांच नाव पासपोर्टमधे दिलेल्या माहितीप्रमाणे लिहिण्यांत यावं. फक्त
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आपल्याचं म्हणण्यावर अडून आहे. मी कॉन्फ्रेन्सला विनंती करतो
की इथे हजर असलेल्या ईवेन्ट्स-आर्किटेक्टवर वजन टाकावं.”
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट दिसायला कसा आहे आणि तो कुठे बसला आहे हे
सगळ्यांनाच माहीत नाहीये. जर काळ-भक्षक दुर्बोध असूनही लोकांच्या नजरेंत आलेला आहे, आणि नेक्रोमैन्सर महाशय सगळ्यांच्या डोळ्यांत
काट्यासारखा खुपतोय, तर कॉन्फ्रेन्समधे उशीरा पोचल्यामुळे
ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा अजूनपर्यंत कोणाशीही परिचय झालेला नव्हता. लोक डोके फिरवून
एकमेकाला विचारतांत की तो कुठे आहे.
पण तो ओठंगून खुर्चीत लपून गेला.
पण मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट त्याला लपून नाही राहू देत.
“हा आहे!” त्याच्याकडे बोटाने खूण करतो.
“तुम्हीं हे काय करतांय, डियर? असं कां करता आहांत? हा
फालतूपणा आहे!” त्याच्या बाजूला बसलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स त्याला टोमणे
देतात.
कपितोनव आपल्या रांगेतून लक्ष देतो की ह्यावेळेस ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
कालसारखा नाही दिसंत आहे, जसं त्याला रिसेप्शन
डेस्क जवळ बघितलं होतं – आज तो अगदी उत्साही वाटतोय आणि आज त्याने अगदी
माणसांसारखे कपडे घातले आहेत, तसे हे ही विचित्रंच होते –
एखाद्या सहायक कामगाराच्या ‘ओवर-आल’
सारखं, स्वच्छ, निळ्या रंगाचं, पण, असं वाटतंय की दुस-या कोणाचं उतरवलेलंच आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उसळतो आणि म्हणतो:
“मी ‘कोणी’ नाहीये! मी काही नाव-बीव नाहीये! मी ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे! मी काल
हॉटेलमधेसुद्धां आपलं नाव नव्हतं सांगितलं!”
“हो, खरं सांगतोय,”
‘तलाव’ म्हणतो. “खरंच त्याने हॉटेलमधे
राहण्यास नकार दिला होता.”
“कारण की ते रजिस्ट्रेशनसाठी माझ्यावर जोर टाकंत होते – माझ्या
ख-या नावासह! पण मी – ना तर सीदोरोव आहे, ना पेत्रोव! ना माइकल जैक्सन, आणि ना राबिनोविच! मी –
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे!”
“तुम्हीं रात्री कुठे होता?” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विचारतो.
“बाकुनिन एवेन्यूवर बाथ-हाउसमधे!” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट गर्वाने
उत्तर देतो.
हॉलमधे कोणीतरी शिट्टी वाजवली,
कोणी ‘आह!’ म्हणालं,
कोणी जोराने हसलं.
“तिथे काय एखाद हॉटेल आहे?”
“तिथे जेटी-कामगारांचा मुशाफिरखाना आहे, ते माझे शिष्य आहेत!”
अध्यक्षाच्या चेह-यावर चरम विस्मयाचा भाव आला.
“तुमच्या सिद्धांतांच्या प्रति सम्मानाचा भाव राखंत आम्ही
तुम्हांला एखादा फ्लैट देऊं शकलो असतो! तुम्हीं ऑर्गेनाइज़िंग कमिटीला कां नाही भेटलांत?”
“विचित्रंच गोष्ट आहे, की
ह्याला पासपोर्ट नसतांना तिकिट कोणी दिलं असेल?” पिवळ्या
सूटातला माइक्रोमैजिशियन ओरडतो. “काय तेपण शिष्य आहेत? हा
पीटरपर्यंत आला कसा?”
“’लिफ्ट’ घेऊन-घेऊन!”
“ ‘लिफ्ट’ घेऊन-घेऊन?...हिवाळ्यांत?...”
हॉलमधे हल्ला-गुल्ला होऊं लागला. वेगवेगळ्या प्रकारच्या
प्रतिक्रिया ऐकूं येतात :
“शाबास!”, “क्लीनिक!”
“पण, तरीही मैण्डेट
कमिटीतर्फे,” कमिटीचा प्रेसिडेंट घोषणा करतो, “मी इथे हजर असलेल्या रिमोटिस्ट्सला निवेदन करतो. काळ-भक्षक, महाशय नेक्रोमैन्सर! आपल्या कॉम्रेडला समजावून सांगा!”
“नेक्रोमैन्सर नाहीये! तो कॉन्फ्रेन्सला डावलतोय!”
लोक आपापल्या जागेवरून ओरडतात. “नेक्रोमैन्सर कां नाहीये?”
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट विनंती करतो:
“काळ-भक्षक, कमीतकमी
तुम्हीं तरी आपल्या कॉम्रेडला समजवा!”
तो मोठ्या मुश्किलीने उठला. चेह-यावर हिरवळ, पापण्या सुजलेल्या. कपितोनवने आपल्या
अनिद्रेबद्दल विचार केला, की ह्याच्या आजारांपुढे तर ती
काहीच नाहीये.
“आम्हीं कॉम्रेड्स नाही,” काळ-भक्षक हळूच म्हणतो. “आमच्यापैकी प्रत्येकजण स्वतःत सम्पूर्ण आहे.”
“एक विशेष सूचना,” ‘तलाव’ने हात उचलला. “सगळ्या कार्यकारी कागद-पत्रांत त्याचं
नाव तसंच ठेवावं, जशी त्याची इच्छा आहे, पण काही विशेष रिपोर्ट्सचा संदर्भ देत, ज्यांत आडनाव,
नाव आणि वडिलांच नाव दर्शवलेलं आहे.”
“ह्या आणखी कोणत्या सीक्रेट रिपोर्ट्स आहेत?” मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेंटला ‘तलाव’च्या म्हणण्याचा अर्थ नाही कळंत.
“म्हणजे, ज्या
सीक्रेट आहे!” ‘तलाव’ म्हणतो.
“मी विरोध करतो,” ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा आवाज निघतो.
“तुम्हांलातर त्यांच्याबद्दल कधीच माहीत नाही होणार!”
“ह्यांत काही तथ्य आहे, काहीतरी सकारात्मक,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष ‘तलाव’चं समर्थन करतो. “मैण्डेट कमिटीने ह्याबद्दल
व्यवस्थितपणे विचार करावा. आणि एडिटोरियल बोर्डनेसुद्धां विचार करावा. हा विषय
संपला. खूप झालं. अशाने तर आपण कधीही,” त्याने घड्याळीकडे
पाहिलं, -
11.02
मुख्य गोष्टीपर्यंत पोहोचू नाही शकणार.”
माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी, मोट्ठा बो-टाय लावलेला, आणि एकंदर सम्माननीय
व्यक्तिमत्व असलेला, माइक्रोफोन काबीज करतो.
“मी बहुमताच्या विचारांनी अंशतः आणि पूर्णतः सहमत आहे, पण, आपल्याला ह्या
अत्यंत वैयक्तिक प्रकाराच्या समस्या कां उद्विग्न करतात आहेत? जरा बघा, की देशांत काय चाललंय. आणि ग्रहावर? आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या
अंतरात्म्यांत. काल
तुम्हीं मला आपली गोष्ट पूर्ण करू दिली नाही, म्हणून मी आज
म्हणतोय. तुम्हांला प्रचलित वैधानिकतेच्या बारकाव्यांची फिकर आहे, जेव्हां मानवता आपल्याच प्रकारचं जीवन जगते आहे! असं कसं शक्य आहे?
जर समस्येकडे व्यवस्थेच्या उंचीवरून बघितलं, तर
आपल्याला कळतं की आपल्या व्यवस्थेला, मग ती कितीही
प्रभावशाली कां न असो, एक वस्तू जगू नाही देत आहे :
कागदपत्रांचा अनियंत्रित प्रवाह. आणि निरंतरतेसाठी आपल्याला ह्याच्याशी लढा द्यावा
लागेल!”
“ठीक आहे,”
अध्यक्ष सहमति दाखवतो, पण, बोललेल्या प्रत्येक
मुद्द्यावर नाही.
“कागदपत्रांचा प्रवाह, आपल्या कार्यक्षेत्रांत नाहीये. बसून जा.”
“मी बसतो!” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी म्हणतो आणि आपल्या जागेवर
बसतो. “मी बसलो. पण तरीही आपलं! आपलं कार्यक्षेत्र! आपलं!”
“मित्रांनो, चार्टरच्या
ड्राफ्टकडे वळू या,” अध्यक्ष व्यस्ततेच्या भावाने
कागदपत्रांची उलटापुलट करंत म्हणतो. “ह्याचा मजकूर तुमच्या हातांत आहे, तुम्हीं त्याच्याशी परिचित आहांत. आपल्या गिल्डच्या चार्टरला मंजूर करायचा
प्रस्ताव ठेवतोय. कोण ह्याच्या पक्षांत आहे? कोण विरोधांत?
कोण गैरहजर आहे? एकमताने.”
काही क्षण हॉलमधे शांतता राहिले,
मग एक दोन टाळ्या ऐकू आल्या, बस, ह्याच्यापेक्षां जास्त काहीच नाही.
अचानक कोणीतरी ओरडतं:
“ही जादूची ट्रिक आहे!”
“काही ट्रिक-ब्रिक नाहीये!” अध्यक्ष गरिमापूर्वक म्हणतो, त्याला स्वतःलापण विश्वास नव्हता, की हे इतक्या सहजपणे होईल.
“ही ट्रिक आहे! कृपा करून ह्याची मिनिट्समधे नोंद करण्यांत
यावी!”
अध्यक्ष आपल्या बाह्या दाखवंत हात वर उचलतो. त्याच्यासाठी
टाळ्या वाजतांत.
“आणि आता – बोर्डाची निवडणूक!” अध्यक्ष घोषणा करतो. चार्टर
प्रमाणे बोर्डांत सात सदस्य असतील. कृपा करून गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन
प्रस्तुत करावे.”
मीटिंगमधे उत्तेजना पसरली. काही लोक हल्ला करतात आहेत, काही नामांकन देताहेत, मग
तेसुद्धा हल्ला बंद न करता नामांकन प्रस्तुत करू लागतात. बोर्डाच्या सदस्यतेच्या
गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन प्रस्तुत करण्याच्या प्रक्रियेला थांबवणं आता
अशक्य आहे. कॉन्फ्रेन्सद्वारे एकानंतर एक बारा नामांकन प्रस्तुत करण्यांत आले,
आणि तेराव्या नामांकनासाठी ‘तलाव’ कपितोनवच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रस्तुत करतो.
“व्हाट द हेल!” कपितोनव वळतो,
पण ‘तलाव’ हाताने
खुणावून सांगतो की सगळं ठीक आहे, तापण्याची गरज नाहीये.
“फक्त आपलं नाव परंत नका घेऊ,”
डावीकडे बसलेला शेजारी कपितोनवच्या कानांत कुजबुजतो. “ ‘तलाव’ला माहीत आहे की तो काय करतोय.”
“अरे, मला बोर्डांत काम करायचं
नाहीये!”
“तुम्हांला कोणी निवडणार नाहीये,
काळजी नका करू. हा अत्यंत हुशारीने खेळलेला डाव आहे.”
अध्यक्ष उमेदवारांच्या नावांची सूची वाचू लागतो, पण एका मोट्ठ्या किंचाळीमुळे पूर्ण न वाचतांच
थांबतो :
“माझं घड्याळ! माझं घड्याळ हरवलंय!”
तो दुर्दैवी कुणीही असला, तरी सगळ्यांत आधी लोकांना त्याचा नाही, तर वेळेचा
विचार येतो: किती वाजलेत? डेलिगेट्स कुपचाप आपल्या डाव्या
हाताच्या मनगटाकडे बघू लागतात.
11.29
“माझं
घड्याळ कुठे आहे?”
“माझंपण!”
कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष मुठींनी टेबलाचा आधार घेत हळूंच उठतो, आपल्या शरीराला पुढे वाकवून म्हणतो:
“ह्या
काय ट्रिक्स आहे, मित्रांनो? काल जेव्हां मी प्रसन्न वातावरण राखण्याची विनंती केली होती, तेव्हां माझं तात्पर्य
अगदी वेगळंच होतं. ते, जे तुम्हीं आता करता आहांत, हे आपल्या कौशल्याला कलंकित करतंय!”...
“हा
डिवचतोय!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात.
“कॉन्फ्रेन्सला
वाया जाऊ देणार नाही!”
कपितोनव
घड्याळ नाही बांधंत, त्याच्यासाठी मोबाइल फोनंच पुरेसा आहे, पण सौभाग्याने मोबाइल आपल्या जागेवरंच आहे.
“ज्याचं
घड्याळ हरवलंय, त्याने कृपा करून आपला हात उंच करावा,” अध्यक्ष कॉन्फ्रेन्सला संबोधित करतो.
“कृपा
करून लक्ष द्या,” माइक्रोमैजिशियन झ्दानोव म्हणतो, “फक्त त्यांचंच नुक्सान झालेलं आहे, ज्यांना उमेदवार म्हणून पुढे केलं होतं! – गिल्डच्या बोर्डासाठी!...सिद्ध करा
की मी चुकतोय! पण, जर माझ्या कयास बरोबर असेल, तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे!”
“ही
राहिली घड्याळं!” वस्तू शोधणारा मिखाइल श्राम ओरडतो, आणि सगळे तिकडे बघतात, जिकडे श्राम खूण करतोय: खिडकीच्या चौकटीवर पाच लिटर्सचा ‘पवित्र झरा’ पाण्याचा कैन ठेवलेला आहे, आणि त्याच्या तळाशी – घड्याळं.
त्यांचे
संभावित मालक लगेच खिडकीकडे धावतात.
“चला, शाबास!” हॉलमधून एक आवाज.
“शाबास, शाबास!”
“काही
‘शाबास-बीबास’ नाही! शेम!”
“कोणी
तरी खूप तीव्रतेने,” अध्यक्ष दुःखाने म्हणतो, “आपल्या मीटिंगला बर्बाद करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो मी तुम्हांला शांत राहण्याची
आणि व्यवस्था ठेवण्याची विनंती करतो! आपली एकता कायम ठेवा! वास्तवाची जाणीव असूं द्या!”
‘पवित्र झ-याच्या’ तळातून निघालेली घड्याळं
पुन्हां आपापल्या मालकांकडे पोहोचतांत.
हॉलमधून
ऐकू येतं “सैबटाझ”.
कपितोनवच्या
कानांत जणुं कोणीतरी कुजबुजतंय : ब्रीफकेस उघड.
तो
उघडतो.
त्यांत
कैबेजचे कटलेट्स आहेत. पॉलिथीनच्या पारदर्शक पाकिटांत.
“हे
माझे नाहीये!! कोणीतरी बदलली आहे!” कपितोनव उडीच मारतो.
“तुमच्याकडे
काय आहे? तुमच्या
ब्रीफकेसमधे काय घुसवलंय?”
“कटलेट्स!
कैबेजचे!”
सगळे
आपापल्या ब्रीफकेसेस उघडून बघतांत. पण कोणीच वैतागंत नाही, इतरांच्या ब्रीफकेसेसमधे
सगळं ठीक आहे.
“माझ्या
ब्रीफकेसमधून एक अत्यंत महत्वपूर्ण वस्तू चोरी गेलेली आहे,” कपितोनव सम्पूर्ण हॉलमधे
घोषणा करतो, “अत्यंत
महत्वपूर्ण वस्तू!”
“जर
महत्वपूर्ण वस्तू आहे तर तिला शोधलं पाहिजे! माइक्रोमैजिशियन मक्रानोगव (‘ओले-पाय’ – अनु.) घोषणा करतो.
“महाशय!”
श्याम-वन उठतो. “गिल्डच्या कौन्सिलच्या निवडणुकीच्या परिणामांनी कोणीतरी आधीच नाखुश
आहे. त्या निवडणुकीच्या – जी अजून झालेलीच नाहीये, पण जी नक्कीच होईल!”
खुर्च्यांच्या
मधल्या कॉरीडोरमधे एक ससा उड्या मारंत होता.
“माफ
करा, हा माझा आहे!”
“कतोव्स्की, आपला फालतूपणा बंद कर!”
कतोव्स्कीच्या
हातांत एक काळी चपटी वस्तू दिसते, जळक्या पैनकेकसारखी.
“आर्थर, माझ्याकडे!” पैनकेकला फरशीवर
ठेऊन कतोव्स्की ओरडतो : ससा वळतो, आणि लगेच उड्या मारंत मागे येऊं लागतो.
बघतां-बघता
पैनकेकची ‘उंची’ वाढू लागते आणि दर्शकांच्या
डोळ्यांसमोरंच (सगळे लोक कतोव्स्कीकडेच बघताहेत) ते डोक्यावर घालण्याच्या वस्तूंत बदलतं, ज्याला बोलचालीच्या भाषेंत
‘सिलिण्डर’ म्हणूं शकतो.
कतोव्स्की
सस्यासमोर सिलिण्डर ठेवतो, आणि तो फार काही विचार न करता, सिलिंडरमधे गायब होऊन जातो.
“माफ
करा, माफ करा, असं करायचं नव्हतं,” कतोव्स्की वाकून वाकून म्हणतो.
सिलिण्डर
जादुगाराच्या डोक्यावर दिसतोय, काही टाळ्या आणि हशा ऐकूं येतात. काही लोक उद्विग्न आहेत:
“कतोव्स्की, आपल्या फालतू ट्रिक्स बंद
कर!”
“स्टाइल-बदलू!”
“आपला
आयटम नाहीये!”
“मला
लॉबींत करायचं होतं,” कतोव्स्की स्पष्टीकरण देतो. “संधि हुकली. मोठ्या मनाने माफ करून टाका.”
“इंटरवल
होतोय,” अध्यक्ष घोषणा करतो.
“अशाने काम नाही चालणार. नंतर बघून घेऊं. कॉफी-ब्रेक.”
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें