बुधवार, 17 जनवरी 2018

धनु कोष्ठक - 13



11.51

कॉफी-ब्रेक. प्रवेश-हॉल.
कपितोनव ब्रीफकेस घेऊन उभा आहे आणि कॉफी पीत नाहीये. तो रागाने डेलिगेट्सकडे बघतो आहे. त्याला प्रत्येकांत शत्रू दिसतो आहे. लोक त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताहेत. श्याम-वनस्वतः त्याच्याजवळ येऊन सांत्वना देत म्हणतो:
“तुम्हांला टार्गेट करण्यांत येत आहे, कारण की आम्हीं गिल्ड-कौंसिलसाठी तुमची उमेदवारी प्रस्तुत केली होती. तुम्हीं धीर धरा, आपण सगळं व्यवस्थित करूं, असं नाही सोडणार!”
“ह्यासाठी थोडा वेळ लागू शकतो,” जादुगार झारापेन्किन म्हणतो, “तुम्हीं फक्त येवढं लक्षांत ठेवा “प्रत्येका ट्रिकची एक काउन्टर-ट्रिक अवश्य असते.”
“माझ्या उमेदवारीमागे काय उद्देश्य आहे?” कपितोनव सर्द आवाजांत तलावला विचारतो.
“साइकोलोजिकल अटैक,” ‘तलावत्याला उत्तर देतो, “लहानसा – तुमच्या-आमच्या विरोधकांवर. आम्हीं अगदी वेळेवर त्यांच्या खेळीचा बट्ट्याबोळ करून टाकला. तुम्हीं बघितलं नाही का, की जेव्हां मी तुमचं नाव प्रस्तुत करंत होतो, तेव्हां ते किती वैतागले होते? तुम्हांला त्रास होतोय? वर्तमान परिस्थितीत तुमच्या जिंकण्याचा काही चान्स नाहीये, आणि तुम्हांला स्वतःलासुद्धां बोर्डांत जायची इच्छा नाहीये, मी बरोबर म्हणतोय न? पण इफेक्ट...जबर्दस्त झाला, इफेक्ट.”
मिखाइल श्राम, वस्तू शोधणारा जादुगार जवळ आला:
“तेव्हां, हॉटेलमधे, तुम्हांला माझं म्हणणं ऐकायची इच्छा नव्हती, पण ब्रीफकेसतर उघडायला पाहिजे होती...”
आता कपितोनव ब्रीफकेसपासून दूर नाही होत आहे, तिला हातांत धरून ठेवलंय. ब्रीफकेस – कमीतकमी एक तरी प्रमाण आहे. कपितोनवची संदिग्ध नजर सगळ्या चेह-यांवरून घसरते, ह्या आशेंत की कोणत्यातरी गुन्हेगाराला शोधेल. पकडा-तर, प्रयत्न तर करा. नाही पकडूं शकणार.
कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्सचा मूड गेलेला आहे.
साधारण शिष्ठाचाराने, सीमेत राहूनंच बोलतात आहेत.
अधिका-यांमुळे, हवामानामुळे, जिगरी दोस्त आणि कॉम्रेडचा मुखवटा लावलेल्या माणुसकीच्या चलाख्यांनी वैतागून कोणी आपल्या कपांत चहाचं पैकेट टाकतोय, तर कोणी इन्स्टेन्ट कॉफीचा एखादा चमचा. बॉयलरमधून उकळतं पाणी कपांत टाकतो आहे.
प्लेट्समधून कोणी रस्क, कोणी वेफर्स, कोणी क्रीम-जैम बिस्किट्स उचलतोय.
काही लोक कपितोनवला ते दुर्दैवी कटलेट्स दाखवण्याचा आग्रह करतात, आणि जेव्हां पब्लिकचं मूड बघून तो पट्कन ब्रीफकेसमधे ठेवलेले कटलेट्स दाखवतो, तेव्हां लोकांना आठवतं की, असेच कटलेट्सतर बुफेच्या टेबलावर होते, आणि अनेक लोकांच्या प्लेट्समधून ते गायब झाले होते.
वोरोब्योव म्हणतो:
“आम्हीं तुमच्याबरोबर एकाच टेबलाशी बसलो होतो, आणि तुम्हांला, नक्कीच, ह्याबद्दल आठवतंय...मी समजतोय की तुम्हांला माझ्या प्रतिष्ठेबद्दल मनांतल्या मनांत शंका आहे, आणि मी ही घोषणा करतो, की एक तर माझा ह्या भानगडीशी काहीही संबंध नाहीये, उलंट, मी स्वतःसुद्धां कटलेट्सनी वंचित झाल्यामुळे, ह्या ट्रिकची निंदा करायला तयार आहे.”
“आणि मी आधीचं तिथून उठून गेलो होतो,” सीज़रने आठवण दिली. “तुम्हांला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझं कटलेट खाऊन टाकलं होतं, पण त्याने काही फरक पडंत नाही. टेक्निकल पॉइंट ऑफ व्यूने बघतां, हे अगदी कठीण नाहीये – एकदम, म्हणजे, एकाच वेळेस, पब्लिकची एखादी लहानशी वस्तू खेचून घेणं. एखाद्या वेगळ्या परिस्थितीत मीपण हे करूं शकलो असतो, पण मी कधीच सगळेच्या सगळे कटलेट्स तुमच्या माथी मारले नसते.”
तलावपुन्हां प्रकट होतो:
“चेहरा नको लटकवूं, लाडक्या! मी तुम्हांला खूष करतो. भेटा. नीनेल. तुमच्या प्रोग्रामची डाइरेक्टर. जसं मी प्रॉमिस केलं होतं. ही तुमच्या प्रोग्रामचं प्लानिंग करेल. मस्त राहील!”
“फार आनंद झाला, नीनेल,” कपितोनव सुमारे चाळीस वर्षाच्या महिलेला म्हणतो. “आणि तुम्हीं,” (‘तलावला) म्हणतो, “दुस-या कुणाला कां नाही शोधंत, जो हा प्रोग्राम प्रोफेशनल पद्धतीने प्रस्तुत करूं शकेल?”
“तुमच्या शिवाय?” नीनेलला उपरोध कळला नाही.
“माफ करा, मला फोन करायचांय,” कपितोनव जिन्याने वर जातो.
तिथे तो खिडकीजवळ थांबतो, ब्रीफकेस खिडकीवर ठेवतो आणि विचार करूं लागतो  की मरीनाला काय सांगेल. हिमकण पडतांत आहे, पण ते इतके कमी आहेत, की बर्फा सारखे वाटंत नाहीये. आणि, तेपण थांबून जातांत. कपितोनव ह्या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तयार नाहीये, की त्याला फक्त भास झाला होता, किंवा ते खरोखरंच पडंत होते. रस्त्याच्या दुसरीकडे त्याला कैफे दिसतो – लवकरंच त्यांना लंचसाठी तेथे घेऊन जातील.
त्याने ठरवलं की फोन नाही करणार – मैसेज पाठवून देतो:
“लहानशी समस्या. नोटबुक नंतर परंत करीन. सगळं ठीक आहे.”    

12.05

खालच्या मजल्याच्या टॉयलेटमधून निघून निळ्या चोग्यांत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट जडशीळ पावलांनी वर येतो आहे. कपितोनवला त्याची एकटक नजर बोचूं लागते, तो स्वतःसुद्धां ताठरतो, जणु त्याच्यांत आणि पाय-यांने वर येणा-याच्या मधे एखादी दोरी खेचली आहे. ईवेन्ट्स-आर्किटेक्टने जवळ येऊन म्हटलं:
“एड्स, भ्रष्ठाचार, आतंकवाद, ओळख विसरणं, युद्ध, आणि तुम्हांला, बघताय ना, कोण्या कटलेट्सच्या हरवण्याचं दुःख. मानवशास्त्र विषयक स्थिरांक धोक्यांत आहेत, आणि तुम्हीं कटलेट्सबद्दल काळजी करताय. तुमचा काही दृष्टिकोण आहे का? तुमचा काय दृष्टिकोण आहे, मला कळेल कां?”
तो वर येऊन धापा टाकू लागला.
“आत्ता तुम्हीं काहीतरी म्हणंत होते,” कपितोनवने फोन दूर केला. “पण तुम्हांला विश्वास आहे कां, की जे म्हटलं होतं, ते तुम्हांला समजतंय?”
एकमेकांच्या डोळ्यांत पाहतात.
“आणि तुम्हीं...तुम्हीं जे करतांहात, त्यांत तुमचा विश्वास आहे?” सूँ-सूँ करंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो.
“त्यांत एक नोटबुक होती,” कपितोनव नजर न काढतां म्हणतो, “एका माणसाची मैन्युस्क्रिप्ट, जो आतां ह्या जगांत नाहीये. तिची मला नाही, पण कोण्या दुस-या माणसाला गरंज आहे. ती त्याला फार प्रिय आहे. आणि अत्यंत विश्वासाने ती मला देण्यांत आली होती. आणि माझ्याकडून तिला कटलेट्समधे बदलून देण्यांत आलंय! पण ते तुम्हांला नाही कळणार, तुम्हीं फक्त ब्ला-ब्ला-ब्लाच करूं शकता! जरा सांगा तर, तुम्हीं कोणच्या ईवेन्ट्सचे आर्किटेक्ट आहांत?”
“तुम्हांला काय हे म्हणायचंय की ह्या भानगडीत माझा हात आहे?” कपितोनवपासून तोंड वळवंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो. “माझ्यासाठी हे क्षुल्लक आहे, अगदीच क्षुल्लक,” आणि जातां-जातां टोमणा मारून गेला: “विचार नका करू.”

12.12

पण कपितोनव विचार करतोच आहे. हॉलमधे आपल्या जुन्या जागेवर बसल्या-बसल्या, तो ह्याबद्दल विचार नाहीं करंत, की वक्ता काय बोलतोय, तो आपल्याच कोणच्यातरी गोष्टीबद्दल विचार करतोय, ज्याच्याबद्दल दुसरे लोक विचार करंत नाहीये. अध्यक्षाच्या डोक्यावर – छताला चिकटलेल्या फुग्ग्याकडे बघंत कपितोनव आपल्याच विचारांत मग्न आहे. फुग्गा प्रकट झाल्याने कोणालाच आश्चर्य झालेलं नाहीये. कपितोनवला सोडून कोणीच फुग्ग्याकडे लक्ष देत नाहीये, फुग्ग्याकडे बघायची कोणाची इच्छाच नाहीये, पण त्याला, कपितोनवला, कसं माहीत, की कोणीच नाही? हे खरं नाहीये की कपितोनव इतरांच्या कवट्यांच्या डब्यांमधे डोकावूं शकतो, - ह्या अवयवाच्या संदर्भात तो फक्त येवढंच करू शकतो, की मनांत धरलेली संख्या ओळखायची, आणि तीपण फक्त दोनंच अंकांची. आणि, तो निस्संदेह, कोणी डोक्यांत घुसणारा चोर नाहीये – तसंच, जसा तो खिडकींत घुसणारा, पोटमाळ्यांत घुसणारा चोर नाहीये; खिसेकापूसुद्धा नाहीये, घरांत घुसणारापण नाही आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे, ब्रीफकेसमधे घुसणारा चोरपण नाहीये. आणि आपल्या ब्रीफकेसप्रमाणेच, भले ही मग त्यांत काहीही कां नसो, तो कुणालाही आपल्या कवटीच्या डब्यांत घुसूं नाही देणार, त्याच्याबद्दल कुणी काहीही विचार केला तरी. म्हणून प्रस्तुत परिस्थितीत कपितोनव कसला विचार करतोय, तो त्याच्या स्वतःचा प्रश्न आहे, आणि दुस-या कुणी कपितोनवच्या विचारांबद्दल काहीही विचार केला तरी, तो, दुसरा, प्रस्तुत परिस्थितीत चूकंच असेल.
मध्यांतरांत वेण्टिलेटर्स उघडून ताजी हवा हॉलमधे येऊं दिली, आता टवटवीत आणि गार वाटूं लागलं. लोकांचे डोकेपण गार झाले, किंवा मुख्य वक्ता, नेमेत्किनच्या भाषणाने त्यांना शांत केलं होतं?...(नेमेत्किन?...पद्मेत्किन?...अत्मेत्किन?...कपितोनव आता आपल्या आजूबाजूला होत असलेल्या घटनांपासून अलिप्त होता.) कपितोनवला हेसुद्धा नाही माहीत की हा मरगळलेला नामेत्किन, ह्याचं नाव गिल्डच्या प्रेसिडेण्टच्या पदासाठी कोणी प्रस्तावित केलं होतं – ज्युपिटेर्स्कीच्या पार्टीने, की श्याम-वनच्या पार्टीने. कपितोनवला आश्चर्य होतंय (तसं, आश्चर्याने ह्याबद्दल विचार नाही करंत आहे), की ना तर ज्युपिटेर्स्की, श्याम-वन’(पण तो ह्याबद्दल विचार नाही करंत आहे), ना अध्यक्ष मोर्शिन, आणि ना तलाव’, प्रसिद्ध व्यक्तींपैकी कोणीच माहीत नाही कां प्रेसिडेण्टच्या पदाचा प्रत्याशी नाहीये. वेड्या-वाकड्या लोकांनाच पाठवतांत आहे. (आणि ह्याबद्दलही नाही.) ज़ामेत्किनच्या विरुद्ध उभं केलंय रेचूगिनला (...लाचूगिन?...पिचूगिन?...), त्याचं भाषण आता होणार आहे.
आश्चर्यकारकरीत्या कपितोनव दुस-याच कोणत्या गोष्टीबद्दल विचार करतो आहे.
“तुम्हीं झोपले आहांत कां?”
“नाही.”
काही वेळ शांत राहून:
“आणि जर होतर? उठवणं जरूरी आहे कां?”
“मी बस, असंच बघितलं, की तुम्हीं झोपलेले नाहीये.”
कपितोनवने स्वतःवर ताबा ठेवला, म्हणजे डावीकडच्या शेजा-याला अपमानास्पद उत्तर द्यायला नको. वयस्कर माणूस आहे आणि त्याला माहीत असायला हवं, की काही लोक उघड्या डोळ्यांनी झोपूं शकतात, असं बरेचदां होतं, विशेषकरून आजकाल. पण कपितोनव आपलं लक्ष वक्त्याकडे वळवतो: तो योग्यता-सूचकांकबद्दल बोलतोय. जादूच्या प्रभावांच्या योग्यता-सूचकांकची गणना करण्याच्या प्रभावहीन पद्धतिबद्दल. असं वाटतंय की ही आंतरिक समस्या तिथे उपस्थित लोकांना फार तापदायक आहे. गिल्ड-प्रेसिडेण्टशिपचा उमेदवार वचन देतो की जादुगारांना सर्टिफिकेट देण्यासाठी 100%पेक्षां जास्त वांछित योग्यता-सूचकांक पद्धति बंद करेल. प्रोग्रामच्या ह्या मुद्द्याचं हॉलमधे गरमजोशीने स्वागत करतात.
“बस, आता वेळ आलीये, आपलं कौशल्य मापण्याची स्केल बदलण्याची! वेळ आलीये संदिग्ध योग्यता-सूचकांकाच्या दुरुपयोगाला “नको” म्हणायची!         
दोनदा बीप-बीप झालं.
कपितोनवला मैसेज आला:
{{{ती माझ्याकडे आहे}}}
कपितोनव प्रयत्नपूर्वक डोळ्यांची उघडझाप करतो, जणु ह्या टेक्स्टवर डोळे मिचकावले जाऊ शकतात. पहिल्यांदातर तो टेक्स्टच नाही वाटला, असं वाटलं की जबर्दस्ती घुसून आलेला एखादा फोटो आहे, आणि एक अप्रियशी गोष्ट होती त्या धनुकोष्ठकांमधे, जे ओढून-ताणून आणलेल्या मंद हास्यामुळे पसरलेल्या तोंडाच्या कोप-यांसारखे वाटंत होते. त्याने अक्षर ओळखले आणि आता भावहीन नजरेने ती माझ्याजवळ आहेकडे बघतोय, जे माहीत नाही कां दोन्हीं कडून स्मित करणा-या धनु-कोष्ठकांच्यामधे आहे.
एक भीतिदायक विचार मनांत येतो की त्याला मूखिनकडून मैसेज आलाय, पण हा मरीनाने पाठवला होता, आणि आता प्रश्न असा आहे – काय त्याला पाठवला आहे?
ही – “ती” – कोण आहे – तिच्याकडे?
कपितोनव लिहितो:
कोण?     
पण पाठवंत नाही. काहीतरी त्याला लगेच विचारण्यापासून परावृत्त करते. तो संकोचतो, अस्पष्टतेने अनुभव करंत, की त्याला आणखीही काहीतरी करायचं आहे. हे करण्याआधी, तो मागे वळतो, कुठे लोक त्याच्याकडे बघंततर नाहीये. आणि जरी बघंत असले, तरी त्यांना काय पत्ता लागणार आहे? तो ते करतो आहे, जे स्वतःलापण समजावूं शकंत नाही: प्रश्नार्थक चिन्हानंतर धनु-कोष्ठक काढतो – पहिला, दुसरा आणि तिसरा. मग तो कर्सरला डावीकडे नेतो आणि सुरुवातीला तीन धनु-कोष्ठक बनवून टाकतो.
तो त्याच्याकडे बघतो, जे बनलंय, आणि त्याला वाटतं, की त्याने कोणचीतरी सीमा-रेषा पार केली आहे.
पाठवून दिला:
{{{कोण?}}}
उत्तर लगेच येतं:
{{{इन्नोकेन्ती पेत्रोविच}}}
चला, गंमत सोडा (जर ही गंमत असती, तर सगळं काही समजलं असतं), पण मरीना गंमत नाही करणार. पण, काय ही मरीना आहे? नाहीतर, अचानक कळेल की मरीना नाहीये?
पण प्रेषक नक्कीच “मरीना”च आहे.
पण, असंही असूं शकतं, की तिच्या मोबाइलवरून त्याला ती लिहीत नसावी?
त्याला धनु-कोष्टकांबद्दल आणि नोटबुकबद्दल झालेला कालचा वार्तालाप आठवतो, जिच्याबद्दल, जर तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला, तर कोणालाच माहीत नव्हतं.
मरीना. फक्त मरीना.
आणि, तिचाच एक आणखी मैसेज:
{{{थैंक्यू}}}
तिला नक्की फोन केला पाहिजे. तो उठतो, आणि ब्रीफकेस घेऊन दाराकडे जातो.
आता माइक्रोमैजिशियननावाबद्दल. माझ्या मते, ते चांगलं नाही वाटंत, मला माहितीये की ब-याच लोकांना हा विचित्रसा माइक्रोअपमानजनक वाटतो, पण प्रिय मित्रांनो...” त्याला आपल्यामागे ऐकूं येतं.
कदाचित त्याच्या चेह-यावर काहीसा बावरल्याचा भाव आहे, कारण की फॉयरमधे टेबल्स स्वच्छ करणा-या दोन्हीं असिस्टेंट्स कप-प्लेट्स सोडून काहीशा भीतिने त्याच्याकडे बघतात. तो त्यांच्यासमोरून जिन्याच्या लैण्डिंगवर जातो, आणि तिथे, आधीसारखाच, खिडकीतून बाहेर बघंत मरीनाला फोन करतो. खाली एक कार येऊन थांबली, दोन लोक डिक्कीमधून बैलेट-बॉक्सेस काढतात, ते घाईंत आहे, इथे कार थांबवण्याची परवानगी नाहीये, बर्फाचे ढीग त्यांच्या कामांत अडथळा घालतात आहे. तो बराच वेळ वाट पाहतो – बीप्स, पुन्हां बीप्स, - कदाचित मरीनाला सिग्नल ऐकूं नसेल जात, तसं, हे कठीणंच वाटतं, आत्ताच तर तिने कोष्ठकांनी बांधलेलं “थैंक्यू” पाठवलं होतं. त्याच्याशी बोलायचं नाहीये कां?
तो पुन्हां फोन करतो, पण तिचा फोन स्विच-ऑफ आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें